एक्स्प्लोर

Uddhav Thackeray on Devendra Fadnavis : ते फडण'वीस' असले तरी आपण '20' आहोत आपण पुरून उरू; उद्धव ठाकरेंनी पुन्हा रणशिंग फुंकले

Uddhav Thackeray on Devendra Fadnavis : शिवसेना ठाकरे गटाची आज नवनिर्वाचित 20 आमदारांची बैठक बोलावण्यात आली. या बैठकीमध्ये उद्धव ठाकरे यांनी आमदारांना पुन्हा एकदा आश्वस्त करण्याचा प्रयत्न केला.

Uddhav Thackeray on Devendra Fadnavis : विधानसभा निवडणुकीमध्ये प्रचंड अशा असतानाही दारुण पराभवला सामोरे गेलेल्या शिवसेना ठाकरे गटाकडून आज नवनिर्वाचित 20 आमदारांची बैठक बोलावण्यात आली. या बैठकीमध्ये शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आमदारांना पुन्हा एकदा आश्वस्त करण्याचा प्रयत्न केला. ते फडण'वीस' असले तरी आपण 'वीस' आहोत, आपण त्यांना पुरून उरु, असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला. दरम्यान, आज शिवसेना ठाकरे गटाकडून ज्येष्ठ नेते भास्कर जाधव यांची गटनेतेपदी निवड करण्यात आली. पक्ष प्रतोदपदी सुनील प्रभू यांचीच निवड करण्यात आली. आदित्य ठाकरे यांची यांची विधिमंडळ पक्षनेतेपदी निवड करण्यात आली आहे.

उद्धव ठाकरे यांनी आमदारांच्या बैठकीत मार्गदर्शन करताना आश्वस्त करण्याचा प्रयत्न केला. दरम्यान गटनेतेपदी निवड झाल्यानंतर भास्कर जाधव यांनी प्रतिक्रिया दिली. भास्कर जाधव यांनी सांगितले की, गटनेता म्हणून माझी नियुक्ती करण्यात आली आहे. मला सात टर्म आमदारकीचा अनुभव आहे. खरं तर माझं म्हणणं होतं की आदित्य ठाकरे यांना गटनेता म्हणून नियुक्त करण्यात यावे, पण उद्धव ठाकरे यांनी हा आदेश दिला. त्यामुळे मी गटनेता म्हणून शिवसेनेचं काम करणार असून सर्व प्रश्न मांडणार असल्याचे त्यांनी सांगितलं. दरम्यान विरोधी पक्षनेते पदावर बोलताना त्यांनी सांगितले की सरकार सक्षमपणे चालवण्यासाठी विरोधी पक्ष असावा आणि त्यासाठी विरोधी पक्षनेतेपद असावं. सत्ताधाऱ्यांनी सुद्धा अशा प्रकारचा विचार करून विरोधी पक्ष पदासाठी विचार करायला हवा, असं त्यांनी सांगितले. 

तर नक्कीच विरोधी पक्षनेता व्हायला आवडेल

सरकार स्थापन झाल्यानंतर हा सगळा निर्णय होईल. विधानसभा अध्यक्षांकडे आम्ही विरोधी पक्षनेता महाविकास आघाडीचा एकत्र मिळून व्हावा यासाठी विनंती करणार असल्याचे त्यांनी सांगितले. महाविकास आघाडीमध्ये संख्याबळ आमचं जास्त असल्याने विरोधी पक्षनेता आमचा म्हणजे शिवसेनेचा होईल. मला जबाबदारी दिली तर नक्कीच विरोधी पक्षनेता व्हायला आवडेल, असे त्यांनी यावेळी नमूद केले. ते म्हणाले की राज्यात पहिल्यांदाच एवढ्या मोठ्या संख्येने सत्ताधारी झाले आहेत आणि विरोधी पक्ष संख्येने छोटा झाला आहे. तरीपण विरोधी पक्ष हा सत्ताधाऱ्यांना पुरून होईल असा विश्वास सुद्धा त्यांनी व्यक्त केला.

दुसरीकडे अंबादास दानवे यांनीही विश्वास व्यक्त केला. ते म्हणाले की इतर पक्षांप्रमाणेच आमच्या पक्षातील विधिमंडळ नेत्यांची निवड करण्यात आली आहे. आमचा कोणी आमदार फुटणार नसल्याची ग्वाही त्यांनी दिली. शिंदेंकडून चुकीचे आरोप करण्यात येत असल्याचे ते म्हणाले. आदित्य ठाकरे यांची निवड नियमाप्रमाणे करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. 

इतर महत्वाच्या बातम्या 

एबीपी माझा वृत्तवाहिनीमध्ये मागील 7 वर्षांपासून कार्यरत
Read More

महत्त्वाच्या बातम्या

पुणे पदवीधरची राष्ट्रवादीची जागा भाजपकडे, शशिकांत शिंदे म्हणाले, भाजप अॅनाकोंडा, तो मित्र पक्षाला गिळतोय
पुणे पदवीधरची राष्ट्रवादीची जागा भाजपकडे, शशिकांत शिंदे म्हणाले, भाजप अॅनाकोंडा, तो मित्र पक्षाला गिळतोय
सतेज पाटील काय आरोप करतात, याकडे लक्ष देण्याची गरज नाही, गोकुळमधील पराभवाच्या नैराश्यातूनच आरोप, 90 टक्के ठराव महायुतीकडेच; खासदार महाडिकांचा सतेज पाटलांना टोला
सतेज पाटील काय आरोप करतात, याकडे लक्ष देण्याची गरज नाही, गोकुळमधील पराभवाच्या नैराश्यातूनच आरोप, 90 टक्के ठराव महायुतीकडेच; खासदार महाडिकांचा सतेज पाटलांना टोला
नवनाथ बन उकीरडा बुद्धीचा माणूस, विवेकानंद पाटलांची बोचरी टीका, नवनाथ संप्रदायाचा उल्लेख करत दिलं चॅलेंज
नवनाथ बन उकीरडा बुद्धीचा माणूस, विवेकानंद पाटलांची बोचरी टीका, नवनाथ संप्रदायाचा उल्लेख करत दिलं चॅलेंज
Satej Patil: महायुतीचा सगळा कारभार मुंबईतून, उद्या गोकुळचा कारभारही मुंबईतूनच चालेल, म्हशीची धार कधी काढायची हे मुंबईत ठरू नये एवढीच अपेक्षा; सतेज पाटलांचा हल्लाबोल
महायुतीचा सगळा कारभार मुंबईतून, उद्या गोकुळचा कारभारही मुंबईतूनच चालेल, म्हशीची धार कधी काढायची हे मुंबईत ठरू नये एवढीच अपेक्षा; सतेज पाटलांचा हल्लाबोल

व्हिडीओ

Rahul Gandhi Protest : राहुल गांधी, प्रियांका गांधी पोलिसांच्या ताब्यात UNCUT VIDEO
Rahul Gandhi : ज्ञानेश कुमारांच्या राजीनाम्यासाठी दिल्लीत हायहोल्टेज ड्रामा, पोलिसांनी राहुल गांधींना पुन्हा उचललं
Sunetra Pawar : दादा खूप मोठ्या मनाचे होते,मी नाही; सुनेत्रा पवारांचा बंडखोरांना इशारा
Navnath Ban PC : रोहित पवारांवर गंभीर आरोप, नवनाथ बन यांची स्फोटक पत्रकार परिषद : ABP Majha
Rohini Khadse MPSC Protest Pune: काळ्याकुट्ट भुवया घेऊन..अगं बाई तू ये..रोहिणी खडसेंनी तोफ डागली, VIDEO

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Rahul Gandhi : ज्ञानेश कुमारांच्या राजीनाम्यासाठी आक्रमक, पोलिसांनी राहुल गांधींना पुन्हा उचललं
Rahul Gandhi : ज्ञानेश कुमारांच्या राजीनाम्यासाठी आक्रमक, पोलिसांनी राहुल गांधींना पुन्हा उचललं
मुंबईकरांनो घाबरु नका, 2 दिवस सायरनचा आवाज येणार; महापालिकेकडून नागरिकांना आवाहन, प्रोटोटाइप चाचणी
मुंबईकरांनो घाबरु नका, 2 दिवस सायरनचा आवाज येणार; महापालिकेकडून नागरिकांना आवाहन, प्रोटोटाइप चाचणी
Jayant Patil: पंढरपूरमध्ये शक्तिपीठ महामार्गासाठी पोलिस बंदोबस्तात जबरदस्तीने मोजणी, सरकारमध्ये बसलेल्यांना किंमत मोजावी लागेल; जयंत पाटलांचा इशारा
पंढरपूरमध्ये शक्तिपीठ महामार्गासाठी पोलिस बंदोबस्तात जबरदस्तीने मोजणी, सरकारमध्ये बसलेल्यांना किंमत मोजावी लागेल; जयंत पाटलांचा इशारा
दुष्काळामुळे भीषण परिस्थिती; धरणातील पाण्याच्या रक्षणासाठी खाकी, धामणा धरणावर पोलीस बंदोबस्त
दुष्काळामुळे भीषण परिस्थिती; धरणातील पाण्याच्या रक्षणासाठी खाकी, धामणा धरणावर पोलीस बंदोबस्त
Pune Police: पुणे पोलीस दलातील पोलिस उपनिरीक्षकाने राहत्या घरी डोक्यात गोळी झाडून आयुष्याचा शेवट कला
पुणे पोलीस दलातील पोलिस उपनिरीक्षकाने राहत्या घरी डोक्यात गोळी झाडून आयुष्याचा शेवट कला
नवनाथ बन यांच्याकडून चारित्र्यहननचा प्रयत्न,व्हिडिओतील तरुणी माध्यमांसमोर; म्हणाली, शिवराज माझ्या भावासारखा
नवनाथ बन यांच्याकडून चारित्र्यहननचा प्रयत्न,व्हिडिओतील तरुणी माध्यमांसमोर; म्हणाली, शिवराज माझ्या भावासारखा
सतेज पाटील काय आरोप करतात, याकडे लक्ष देण्याची गरज नाही, गोकुळमधील पराभवाच्या नैराश्यातूनच आरोप, 90 टक्के ठराव महायुतीकडेच; खासदार महाडिकांचा सतेज पाटलांना टोला
सतेज पाटील काय आरोप करतात, याकडे लक्ष देण्याची गरज नाही, गोकुळमधील पराभवाच्या नैराश्यातूनच आरोप, 90 टक्के ठराव महायुतीकडेच; खासदार महाडिकांचा सतेज पाटलांना टोला
बळीराजापुढं दुष्काळाचं ताट, जनावरांच्या चाऱ्याचाही गंभीर प्रश्न? 'कुट्टी'चा खर्च परवडेना; शेतकरी हवालदील
बळीराजापुढं दुष्काळाचं ताट, जनावरांच्या चाऱ्याचाही गंभीर प्रश्न? 'कुट्टी'चा खर्च परवडेना; शेतकरी हवालदील
Embed widget