Mumbai Accident News : मुंबईत दारू पिऊन गाडी चालवताना भीषण अपघात, दोन अल्पवयीन मुलांचा दुर्दैवी अंत
Mumbai Accident News : मुंबईच्या पश्चिम द्रुतगती महामार्गावर विलेपार्ले या ठिकाणी दारू पिऊन भरधाव वेगाने कार चालवल्यामुळे कारचा भीषण अपघात झाला आहे.
Mumbai Accident News : मुंबईच्या पश्चिम द्रुतगती महामार्गावर विलेपार्ले (vile parle) या ठिकाणी दारू पिऊन भरधाव वेगाने कार चालवत असल्यामुळे कारचा भीषण अपघात झाल्याची घटना घडली आहे. या अपघातात दोन अल्पवयीन मुलांचा दुर्दैवी मृत्यू झाला असून आरोपी कारचालक साहिल मेहताला विलेपार्ले पोलिसांनी (Police) अटक आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, गोरेगावमधून (Goregaon) दारूची पार्टी करून शनिवारी पहाटे 3:30 च्या सुमारास साहिल मेहता, जॉर्डन जिमी यांच्यासह दोन अल्पवयीन मुलं, असे एकूण चार कॉलेजचे मित्र जेवण घेण्यासाठी बांद्राच्या दिशेने निघाले होते.बांद्रा परिसरातून जेवण घेऊन येत असताना साहिल मेहता भरधाव वेगाने कार चालवत असल्यामुळे कारचालकाचे कारवरून नियंत्रण सुटलं.
दोन अल्पवयीन मुलांचा मृत्यू
त्यानंतर कार विलेपार्लेजवळ डिव्हायडरला धडकल्याने भीषण अपघात झाला. या अपघातात कारमध्ये मागे बसलेले दोन अल्पवयीन मुलं सार्थक कौशिक आणि जलाल धीर यांचा जागेवरच मृत्यू झाला. तर दोन जण किरकोळ जखमी झाले आहेत. कार चालवणारा साहिल मेहता हा दारू पिऊन कार चालवत असल्याने अपघात झाल्याची माहिती त्याच्या मित्रांनी पोलिसांना दिली आहे.
ब्लड सॅम्पल तपासणीला पाठवले
विलेपार्ले पोलिसांनी या प्रकरणी कार चालकाविरोधात गुन्हा दाखल केला असून कार चालक साहिल मेहताला अटक केली आहे. साहिल मेहता कार चालवताना किती दारू प्यायला होता? दारूच्या नशेमुळे हा अपघात झाला का? यासंदर्भात ब्लड सॅम्पल घेऊन विलेपार्ले पोलिसांनी तपासासाठी लॅबमध्ये पाठवले आहे. या प्रकरणी पोलीस अधिक तपास करत आहेत.
इतर महत्त्वाच्या बातम्या