Onion Procures : नाफेडच्या माध्यमातून सरकारकडून 52 हजार 460 टन कांद्याची खरेदी, ग्राहक व्यवहार मंत्रालयाची माहिती
Onion Procures : सरकारनं नाफेडच्या माध्यमातून 52 हजार 460 टन कांदा खरेदी केला आहे. ग्राहक व्यवहार मंत्रालयाच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्यानं याबाबतची माहिती सांगितली आहे.
Onion Procures : यावर्षी केंद्र सरकारनं मोठ्या प्रमाणावर कांद्याची खरेदी केली आहे. सरकारनं नाफेडच्या माध्यमातून आत्तापर्यंत 52 हजार 460 टन कांदा खरेदी केला आहे. ग्राहक व्यवहार मंत्रालयाच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्यानं याबाबतची माहिती सांगितली आहे. कांद्याचा बफर स्टॉक करण्यासाठी सरकारनं या कांद्याची खरेदी केली आहे. सरकार गेल्य काही वर्षांपासून कांद्याचा बफर स्टॉक करत आहे. कांद्याचा बफर स्टॉक केल्यामुळं पावसाळ्यात कांद्याच्या किंमती वाढल्या आहेत.
2022-23 ला 2.50 लाख टन कांदा खरेदीचं उद्दीष्ट
दरम्यान, सध्या नॅशनल अॅग्रिकल्चरल कोऑपरेटिव्ह मार्केटिंग फेडरेशन ऑफ इंडिया अर्थात नाफेडकडून कांद्याची खरेदी सुरु आहे. 2022-23 साठी 2.50 लाख टन रब्बी कांदा खरेदीचे उद्दिष्ट निश्चित करण्यात आले आहे. दरम्यान, सध्या 52 हजार 460.34 टन कांदा खरेदी करण्यात आला आहे. चालू वर्षासाठी निर्धारित केलेले उद्दिष्ट पुढील महिन्यापर्यंत गाठले जाईल, अशी माहिती देखील अधिकाऱ्यानं दिली आहे. 2021-22 मध्ये, खरीप हंगामात किंमती स्थिर ठेवण्यासाठी एकूण 2.08 लाख टन रब्बी (हिवाळी) कांद्याची खरेदी करण्यात आली. कृषी मंत्रालयाच्या अंदाजानुसार, 2021-22 पीक वर्षातील 26.64 दशलक्ष टनांच्या तुलनेत 2022-23 पीक वर्षात (जुलै-जून) देशातील एकूण कांद्याचे उत्पादन 16.81 टक्क्यांनी वाढून 31.12 दशलक्ष टन होण्याचा अंदाज आहे.
दर घसरल्यानं शेतकऱ्यांना फटका
दरम्यान, आपण सद्यपरिस्थिती कांद्याचा दराचा विचार केला तर अक्षरशः शेतकऱ्यांचा उत्पादन खर्च देखील निघणे मुश्कील झाले आहे. नाफेडच्या माध्यमातून कांदा खरेदीतून शेतकऱ्यांना थोडाफार दिलासा मिळेल अशी अपेक्षा होती. मात्र, नाफेडकडून सुद्धा कमी दरानं काद्यांची खरेदी केली जात आहे. उन्हाळी कांद्याचा हंगाम सुरू झाल्यापासून भावात सातत्याने घसरण सुरु आहे. गेल्या दोन-तीन महिन्यांपासून भाव इतके घसरले आहेत की शेतकऱ्यांच्या शेतात कांदा सडू लागला आहे. भाव पडल्यानं शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे. महाराष्ट्रात सुरु असलेल्या कांदा खरदी बाबत अतिशय गोपनीयता पाळली जात असून मोठ्या प्रमाणात गैरप्रकार सुरु असल्याच्या तक्रारी देखील येत आहेत. नाफेडमार्फत सुरु असलेल्या कांदा खरदीची चौकशी करून दोषी संस्था व अधिकार्यांवर तातडीने कारवाई करून योग्य प्रकारे कांदा खरेदी सुरु ठेवण्याची मागणी स्वतंत्र भारत पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष अनिल घनवट यांनी केली होती.
महत्वाच्या बातम्या:
- Nashik Kanda Parishad : कांदा बियाणे दराबाबत योग्य निर्णय घ्या, अन्यथा..., येवल्यात पुन्हा कांदा परिषद
- onion news : कांद्याबाबत थेट शेतकरी ते ग्राहक अशी विक्री व्यवस्था उभी करावी : कांदा उत्पादक शेतकरी संघटना