Amul Milk Prices Hike : महागाईचा झटका, अमूलच्या दूध दरात प्रतिलिटर तीन रुपयांनी वाढ; आजपासूनच नवे दर लागू
Amul Milk Prices Hike : अमूलने दुधाच्या दरात लिटरमागे तीन रुपयांनी वाढ केली आहे. दुधाच्या दरात प्रतिलिटर 3 रुपयांनी वाढ केल्याचं निवेदन अमूलने जारी केलं आहे.
Amul Milk Prices Hike : अर्थसंकल्पानंतर (Budget 2023) लगेचच जनतेला महागाईचा मोठा धक्का बसला आहे. अमूलने (Amul) दुधाच्या दरात लिटरमागे तीन रुपयांनी वाढ केली आहे. दुधाच्या दरात प्रतिलिटर 3 रुपयांनी वाढ केल्याचं निवेदन अमूलने जारी केलं आहे. दुधाचे वाढलेले दर आजपासून म्हणजेच 3 फेब्रुवारीपासूनच लागू होणार आहेत.
कंपनीच्या म्हणण्यानुसार, आता अमूलचे ताजाचं अर्धा लिटर दूध 27 रुपयांना मिळणार आहे. तर 1 लिटर पॅकेटसाठी 54 रुपये मोजावे लागणार आहेत. अमूल गोल्ड अर्थात फुल क्रीम दुधाचे अर्धा किलोचे पॅकेट आता 33 रुपयांना मिळणार आहे. तर 1 लिटरसाठी 66 रुपये मोजावे लागतील. अमूल गायीच्या एक लिटर दुधाचा दर 56 रुपयांवर पोहोचला आहे. अर्ध्या लिटरसाठी 28 रुपये मोजावे लागणार आहेत. तर म्हशीचे A2 दूध आता 70 रुपये प्रतिकिलो दराने उपलब्ध होणार आहे.
उत्पादन नवीन दर
अमूल ताजा 500 मिली 27
अमूल ताजा 1 लिटर 54
अमूल ताजा 2 लिटर 108
अमूल ताजा 6 लिटर 324
अमूल ताजा 180 मिली 10
अमूल गोल्ड 500 मिली 33
अमूल गोल्ड 1 लिटर 66
अमूल गोल्ड 6 लिटर 396
अमूल गायीचे दूध 500 मिली 28
अमूल गायीचे दूध 1 लिटर 56
अमूल A2 म्हशीचे दूध 500 मिली 36
अमूल A2 म्हशीचे दूध 1 लिटर 70
अमूल A2 म्हशीचे दूध 6 लिटर 420
अमूलने गेल्या वर्षी ऑक्टोबरमध्ये दुधाच्या दरात प्रतिलिटर दोन रुपयांनी वाढ केली होती. एकूणच कामकाजाचा खर्च आणि दुधाचे उत्पादन वाढल्याने ही दरवाढ करण्यात आल्याचं सांगण्यात आलं होतं.
काँग्रेसचा सरकारवर निशाणा
काँग्रेसने 'अच्छे दिन' असा उल्लेख करत भाजप सरकारवर निशाणा साधला आहे. काँग्रेसने ट्वीट केलं आहे की, "गेल्या 1 वर्षात अमूलने दुधाच्या दरात प्रतिलिटर 8 रुपयांनी वाढ केली आहे."
अमूल दूध 3 रुपए तक महंगा हो गया।
— Congress (@INCIndia) February 3, 2023
पिछले 1 साल में '8 रुपए' दाम बढ़े हैं।
• फरवरी 2022: अमूल गोल्ड 58 रुपए लीटर
• फरवरी 2023: अमूल गोल्ड 66 रुपए लीटर
अच्छे दिन❓️