(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Wardha News : वर्धा जिल्ह्यातील हिंगणघाटमध्ये कृषी केंद्रात चोरी, तीन मिनिटांत एक लाख रुपये घेऊन चोरटे पसार
Wardha News : हिंगणघाट शहरात एका कृषी केंद्रात (Krushi kendra) धाडसी चोरी झाल्याची घटना घडली आहे. अवघ्या तीन मिनिटांत चोरट्यांनी एक लाख तीन हजार रुपये पसार केले.
Wardha News : वर्धा (Wardha) जिल्ह्यातील हिंगणघाट शहरात एका कृषी केंद्रात (Krushi kendra) धाडसी चोरी झाल्याची घटना घडली आहे. अवघ्या तीन मिनिटांत चोरट्यांनी एक लाख तीन हजार रुपये पसार केले. ही संपूर्ण चोरची घटना सी.सी. टीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे. याप्रकरणी हिंगणघाट पोलिसात (Hinganghat Police Station) गुन्हा नोंद करण्यात आला आहे. याप्रकणी पोलिसांकडून चोरट्यांचा शोध घेतला जात आहे.
हिंगणघाट (Hinganghat ) शहरातील मोहता चौकालगत असलेल्या पराग कोचर यांच्या कृषी सेवा केंद्रात आज पहाटे साडेचार वाजता चोरी झाली. शटर तोडून चोट्यांनी एक लाख रुपयांची रक्कम चोरली. हा संपूर्ण चोरीचा प्रकार सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला आहे. तीन अज्ञात चोरट्यांकडून ही चोरी केली आहे. अवघ्या तीन मिनिटात एक लाख तीन हजार रुपये चोरट्यांनी चोरुन नेले आहेत. सध्या पेरणीचा हंगाम सुरु असल्यानं कृषी केंद्रात ग्राहकांची गर्दी पाहायवा मिळत आहे. त्यामुळं कृषी केंद्रात पैसे मिळू शकतात याच उद्देशाने कृषी सेवा केंद्रात चोरी करण्यात आल्याचे बोलले जात आहे.
नेमकी कशी झाली चोरी
पराग कोचर (Parag Kochar) यांच्या कोचर बियाणे कृषी सेवा केंद्रासमोर येऊन दोन चोरट्यांनी लॉक तोडत दुकानाच्या आत प्रवेश केला. तर यातील एक चोर हा बाहेर देखरेखीस उभा होता. या दोघांनी आत जाऊन एक लाख तीन हजार रुपयांची रक्कम घेऊन लगेच तेथून पळ काढला. याप्रकरणी हिंगणघाट पोलिसात गुन्हा नोंद करण्यात आला आहे. अद्याप आरोपींचा शोध लागला नसून, पोलिसांकडून त्यांचा शोध घेतला जात आहे.
Maharashtra Rain : राज्यात पावसाला सुरुवात, शेती कामांना वेग
सध्या राज्यात विविध ठिकाणी पावसाला सुरुवात झाली आहे. काही भागात जोरदार पाऊस कोसळत आहे, तर काही भागात हलका ते मध्यम स्वरुपाचा पाऊस सुरु आहे. या पावसामुळं शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. कारण यावर्षी पावसानं चांगलीच ओढ दिली आहे. शेतकरी पावसाची आतुरतेने वाट बघत होते. अखेर पावसाचं आगमन झालं आहे. त्यामुळं शेती कामांना वेग आला आहे. अशातच शेतकरी बी बियाणे, खते, किटकनाशकांची कृषी केंद्रातून खरेदी करत आहेत. सध्या कृषी केंद्रावर खरेदीसाठी शेतकऱ्यांच्या रांगा दिसत आहेत.
महत्त्वाच्या बातम्या: