पाकिस्तानमधील एक शहर अनेकांचे लक्ष वेधून घेत आहे. पाकिस्तानमधील दाराअदमखेल भाग शस्त्रास्त्रांसोबत, दारूगोळ्यांसाठी प्रसिद्ध आहे. दाराअदमखेल पाकिस्तानच्या पश्चिमोत्तर भागात आहे. या भागात तुम्हाला स्मार्टफोनपेक्षा मशिनगन स्वस्त किमतीत मिळते.
2/6
काही मीडिया रिपोर्टनुसार, या शहरात तुम्हाला 4500 रुपयांमध्ये MP 5 बंदूक सहज मिळू शकते.
3/6
या शहरात शस्त्रास्त्रे बनवण्यासाठी, जहाजामधील अडगळीतील सामान आणि जुन्या सामानाचा वापर केला जातो. येथे शस्त्रास्त्रे बनवणारे कुशल कारागिर आहेत, आणि हे कारागिर कोणत्याही धातूपासून शस्त्रास्त्रांची निर्मिती करू शकतात. (सर्व फोटो प्रतिकात्मक)
4/6
तसेच 8,250 रुपयांना AK-47 सारख्या मशिनगनदेखील सहज उपलब्ध आहेत.
5/6
या शहरात तुम्हाला चोरीच्या शस्त्रास्त्रांसह नव्या शस्त्रांची दुकानेही पाहायला मिळतील. दारूगोळ्याच्या साठ्यामुळे या भागात पोलीस जाण्यास घाबरतात.
6/6
दाराअदमखेल पेशावरपासून फक्त 35 किलोमीटर दूर वसलेले शहर आहे. पाकिस्तानातील हे शहर शस्त्रास्त्रांचा काळाबाजार, आणि दारूगोळाच्या व्यापारासाठी प्रसिद्ध आहे.