एक्स्प्लोर
Yavatmal : यवतमाळच्या आर्णी तालुक्यातील शेतकरी पुत्राची 'ग्रामहित' कंपनी फोर्ब्सच्या यादीत
'ग्रामहित' ही शेतमालाच्या बाजारपेठेतील उतार चढावात शेतकऱ्यांना सुरक्षितता मिळवून देणारी कंपनी फोर्ब्स द्वारे आशिया खंडातील नामांकित अग्रगण्य सामाजिक उद्योजकता क्रमवारीत निवडली गेली आहे. हे सगळे असे स्टार्टअप आहेत की जे जगातील गुंतागुंतीच्या समस्या नावीन्यपूर्ण रीतीने सोडवण्याच्या उद्देशाने वस्तू अथवा सेवा पुरवितात. फोर्ब्स चे यादीत स्थान मिळवणे ही अतिशय अवघड प्रक्रिया असते. फोर्ब्स अशा कंपन्यांची कामगिरी या निवडीच्या निमित्याने जगासमोर मांडून नव्या सामाजिक उद्योजकांना प्रोत्साहन देते. यंदा या निवड प्रक्रियेत 650 कंपन्यांनी आपला सहभाग नोंदवला होता.
आणखी पाहा























