एक्स्प्लोर
sri lanka : पतंग तर हवेत उडाला पण या पतंगासोबत तो व्यक्तीसुद्धा हवेत उडू लागला : ABP Majha
श्रीलंकेतील जाफनामधील पॉइंट पेड्रो येथे पतंग उडवण्याचा सामना भयावह ठरला. पतंग उडवत असताना अचानक एक व्यक्ती पतंगासोबतच आकाशात उडून गेल्याची धक्कादायक घटना घडलीय. याचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होतोय.हा व्यक्ती त्याच्या टीमच्या मदतीने दोरी पकडून एक मोठा पतंग हवेत उडवण्याचा प्रयत्न करत होता. पतंग तर हवेत उडाला पण या पतंगासोबत तो व्यक्तीसुद्धा हवेत उडू लागला. बघता बघता हा व्यक्ती उंच आकाशात जवळजवळ ३० फूट उंचावर गेला.
आणखी पाहा























