एक्स्प्लोर
Google doodle honours Dr. Kamal Ranadive : डॉ. कमल रणदिवे यांनी गुगलकडूमन मानाचा मुजरा ABP Majha
बायो मेडिकल संशोधन करणाऱ्या मराठमोळ्या डॉ. कमल रणदिवे यांची आज 104 वी जयंती आहे. त्यानिमित्त गुगलने डुडलच्या माध्यमातून आज त्यांना अभिवादन केलंय.
डॉ. कमल रणदिवे या भारतीय महिला वैज्ञानिक संघाच्या संस्थापक सदस्य होत्या. कमल रणदिवे यांनी कॅन्सरवर अनेक संशोधनं केली. स्तन कॅन्सर आणि अनुवांशिकता यांचा परस्पर संबंध असल्याचा पहिला प्रस्ताव त्यांनी मांडला होता. याबाबत अनेक संशोधकांनी देखील दुजोरा दिला आहे. त्यांच्या या कार्याला गुगलने डुडलच्या माध्यमातून सलाम केलाय.
आणखी पाहा























