Thane Zebra Crossing : ठाण्यात झेब्रा क्राॅसिंग पट्ट्यांचा रंग बदलला
Thane Zebra Crossing : ठाण्यात झेब्रा क्राॅसिंग पट्ट्यांचा रंग बदलला ठाणे महानगरपालिका तसेच वाहतूक विभागाने एक नवा प्रयोग केलेला आहे.आत ठाणे शहरामध्ये झेब्रा क्रॉसिंग चा रंग देखील बदलण्यात आला आहे .झेब्रा क्रॉसिंगचे काळ्या आणि सफेद रंगाचे पट्टे नागरिकांना रस्ता ओलांडताना दिसत नसल्याने आता ठाणे महापालिका क्षेत्रात झेब्रा क्रॉसिंगच्या पट्ट्यांचा रंग बदलण्याचा निर्णय ठाणे महापालिका आणि वाहतूक विभागाने संयुक्तपणे घेतला आहे. सफेद आणि काळ्या रंगाच्या पट्ट्यांच्या ऐवजी लाल आणि सफेद रंगाचा वापर या पट्ट्यांसाठी करण्यात आला आहे. ठाण्यातील तीन हात नाका परिसरात प्रायोगिक तत्वावर हे बदल करण्यात आले असून येत्या काही काळात संपूर्ण चौकांमध्ये लाला सफेद रंगाचे झेब्रा क्रॉसिंगचे पट्टे दिसुन येणार आहे























