Chandrahar Patil Speech : ठाकरेंना सोडलं, शिंदेंकडे आले; चंद्रहार पाटलांचं खणखणीत भाषण!
Chandrahar Patil will join Eknath Shinde Shivsena सांगली : डबल महाराष्ट्र केसरी पैलवान चंद्रहार पाटील यांनी एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश करण्याचा निर्णय घेतला आहे. चंद्रहार पाटील यांनी सोशल मीडिया पोस्ट करुन या निर्णयाची माहिती दिली आहे. लोकसभा निवडणुकीपूर्वी चंद्रहार पाटील यांनी ठाकरेंच्या शिवसेनेत प्रवेश केला होता. चंद्रहार पाटील यांनी सांगली लोकसभा मतदारसंघातून उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेकडून निवडणूक लढवली होती, त्यामध्ये त्यांचा पराभव झाला होता. आता चंद्रहार पाटील यांनी सरकारसोबत जाण्याचा निर्णय घेतला आहे. म्हणजेच लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर बरोबर एक वर्षानं चंद्रहार पाटील यांनी ठाकरेंच्या शिवसेनेला जय महाराष्ट्र केला आहे.
चंद्रहार पाटील काय म्हणाले?
राज्यातील क्रीडा क्षेत्रामध्ये काम करत असताना, बऱ्याच त्रुटी, अडचणी, गैरप्रकार मी अनुभवलेले आहेत. अशा बाबींविरुद्ध मी वेळोवेळी आवाज देखील उठवला आहे. परंतु, प्रत्यक्ष शासन सहभागाशिवाय असे प्रश्न मार्गी लागणे कठीण आहे. म्हणून क्रीडा क्षेत्रामध्ये सुसूत्रता आणण्यासाठी व सामाजिक, राजकीय क्षेत्रात काम करण्यासाठी, मी आणि माझ्या सहकाऱ्यांनी सरकार सोबत जाण्याचा निर्णय घेतलेला आहे, असं चंद्रहार पाटील म्हणाले.























