(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Sushma Andhare on Eknath Shinde : मुख्यमंत्र्यांची सभा, शिंदे गटाकडून जळगावात शिक्षकांना पैसे वाटप
Sushma Andhare on Eknath Shinde : मुख्यमंत्र्यांची सभा, शिंदे गटाकडून जळगावात शिक्षकांना पैसेवाटप करण्यात आला प्रकार घडला आहे. या घटनेचा व्हिडिओ सुषमा अंधारे यांनी ट्विट केला आहे..
हे देखील वाचा
अमरावतीचं खासदार कार्यालय पुन्हा सील; खासदार अनिल बोंडेंचाही कार्यालयावर दावा, तर यशोमती ठाकुरांवर गुन्हा दाखल
Amravati News: अमरावती : अमरावती खासदार कार्यालय (Amravati MP Office) कुलूप तोड प्रकरण आता चांगलंच तापल्याचं दिसत आहे. याप्रकरणी 15 जणांवर गुन्हे दाखल करण्यात आले असून यात आमदार यशोमती ठाकूर (Yashomati Thakur) यांच्यासह नवनिर्वाचित खासदार बळवंत वानखडे (Balwant Wankhede) यांचाही समावेश आहे. दरम्यान, काँग्रेसनं ताब्यात घेतलेलं अमरावती खासदार कार्यालय आता जिल्हाधिकाऱ्यांकडून पुन्हा सील करण्यात आलं आहे. आता पुन्हा कार्यालय सील केल्यानं पुन्हा वाद होण्याची शक्यता आहे.
अमरावतीमध्ये भाजप विरुद्ध काँग्रेस आमने-सामने आल्याचं बघायला मिळालं आहे. त्यासाठी कारण ठरलंय, अमरावती जिल्ह्यातील खासदार कार्यालय. अमरावती जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात खासदारांसाठी शासकीय कार्यालय आहे. त्यामुळे लोकसभेचे खासदार बळवंत वानखडे यांना खासदार कार्यालयाचा ताबा द्यावा, असं वारंवार सांगण्यात आलं होतं. पण विजयाच्या 17 दिवसानंतर सुद्धा खासदार कार्यालयाचा ताबा नवनिर्वाचित खासदार बळवंत वानखडे यांना देत नसल्यानं अमरावतीत काँग्रेस चांगलीच आक्रमक झाल्याचं पाहायला मिळालं. यशोमती ठाकूर आणि बळवंत वानखेडे यांनी थेट खासदार कार्यालय गाठून कार्यालयाचं कुलूप तोडलं आणि खासदार कार्यालयाचा ताबा घेतला. याचप्रकरणी काँग्रेस आमदार यशोमती ठाकूर आणि नवनिर्वाचित खासदार बळवंत वानखेडे यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.