एक्स्प्लोर

MPSC Exam : गुड न्यूज, MPSC कडून 938 जागांसाठी नवी जाहिरात, महाराष्ट्र गट-क सेवेची पूर्व परीक्षा 'या' दिवशी होणार

MPSC Exam : महाराष्ट्र लोकसेवा आयोगानं महाराष्ट्र गट क सेवेची जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे. ही जाहिरात 938 जागांसाठी काढण्यात आली आहे.

मुंबई : महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षांची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी मोठी बातमी आहे. एमपीएससीकडून महाराष्ट्र गट क सेवा संयुक्त पूर्व परीक्षेची जाहिरात प्रसिद्ध केली आहे. या जाहिरातीद्वारे 938 पदांच्या भरतीसाठी पूर्व परीक्षा घेण्यात येणार आहे. ही परीक्षा 4 जानेवारी 2026 रोजी होणार आहे. महाराष्ट्र लोकसेवा आयोग उद्योग निरीक्षक, तांत्रिक सहायक, कर सहायक आणि लिपीक टंकलेखक पदाच्या भरतीसाठी ही परीक्षा आयोजित केली जाणार आहे.

MPSC Group C Combined Pre Exam : गटसंयुक्त पूर्व परीक्षा किती जागांसाठी?

उद्योग निरीक्षक पदाच्या 9 जागा भरल्या जाणार आहेत. तांत्रिक सहायक पदाच्या 4 जागा, कर सहायक 73 जागा आणि लिपिक टंकलेखक पदाच्या 852 जागांसाठी ही परीक्षा आयोजित केली जाणार आहे.

महाराष्ट्र गटसेवा संयुक्त पूर्व परीक्षेसाठी ऑनलाईन अर्ज सादर करण्याची सुरुवात 7 ऑक्टोबरला दुपारी 1 वाजता होईल. तर, अर्ज सादर करण्याचा अखेरचा दिनांक 27 ऑक्टोबर रात्री 23.59 वाजेपर्यंत असेल. ऑनलाईन शुल्क देखील 27 ऑक्टोबर रात्री 23.59 वाजेपर्यंत स्वीकारलं जाणार आहे. तर, स्टेट बँक ऑफ इंडियाच्या शाखेत चलनाद्वारे शुल्क भरणार असल्यास ते 29 ऑक्टोबर रात्री 23.59 वाजेपर्यंत घेता येईल. त्यानंतर 30 ऑक्टोबरला कार्यालयीन वेळेत स्टेट बँकेच्या शाखेत चलन भरावं लागणार आहे.

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या महाराष्ट्र गटसेवा परीक्षेला अर्ज करणारा उमेदवार भारतीय असणं आवश्यक आहे. उद्योग निरीक्षक, गट-क संवर्ग वगळता इतर संवर्गासाठी मान्यताप्राप्त विद्यापीठाची पदवी किंवा महाराष्ट्र शासनाने पदवीस समतुल्य म्हणून मान्य केलेली अर्हता उमेदवाराकडे असणं आवश्यक आहे. उद्योग निरीक्षक पदासाठी उमेदवाराकडे सांविधिक विदयापीठाची, अभियांत्रिकी मधील (स्थापत्य अभियांत्रिकी तसेच स्थापत्य अभियांत्रिकी मधील विषयांच्या गटांशी संलग्न असलेल्या वास्तुविद्या, नगररचना इत्यादी विषयांव्यतिरिक्त) किंवा तंत्रज्ञानामधील किमान पदविका, किंवा विज्ञान शाखेतील सांविधिक विद्यापीठाची पदवी असणं गरजेचं आहे.

महाराष्ट्र गटसेवा परीक्षा दोन टप्प्यात पार पडणार आहे. संयूक्त पूर्व परीक्षा आणि त्यानंतर मुख्य परीक्षा घेतली जाईल. पूर्व परीक्षा 100 गुणांसाठी असेल तर संयुक्त मुख्य परीक्षा 400 गुणांची असेल. लिपिक टंकलेखक आणि करसहायक पदासाठी टंकलेखन कौशल्य याचणी द्यावी लागणार आहे.

किती फी भरावी लागणार?

खुल्या प्रवर्गासाठी 394 रुपये पूर्व परीक्षेचं शुल्क असेल. तर मागासवर्गीय, ईडब्ल्यूएस आणि अनाथ प्रवर्गासाठी 294 रुपये तर माजी सैनिकांसाठी 44 रुपये शुल्क असेल. मुख्य परीक्षेसाठी 544 रुपये खुल्या प्रवर्गासाठी,मागासवर्गीय, ईडब्ल्यूएस आणि अनाथ प्रवर्गासाठी 344 रुपये तर माजी सैनिकांसाठी 44 रुपये परीक्षा शुल्क असेल.

एबीपी माझा वेब टीममध्ये कॉपी एडिटर म्हणून कार्यरत | राजकारण,क्रीडा, राष्ट्रीय, आंतराराष्ट्रीय ते गाव खेड्यातल्या शेती क्षेत्रातल्या बातम्यांची आवड | यापूर्वी महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइन | टीव्ही 9 मराठी डिजीटल | ईटीव्ही भारत महाराष्ट्र मध्ये काम 
Read More

महत्त्वाच्या बातम्या

Bank of Baroda : गुड न्यूज, बँक ऑफ बडोदामध्ये 1100 जागांवर भरती, 67 हजारांपासून पगार सुरु 
गुड न्यूज, बँक ऑफ बडोदामध्ये 1100 जागांवर भरती, 67 हजारांपासून पगार सुरु 
Lay off : 4 हजार कर्मचाऱ्यांची नोकरी धोक्यात! टाटा समूहाची 'ही' कंपनी घेणार मोठा निर्णय, नेमकं कारण काय?
Lay off : 4 हजार कर्मचाऱ्यांची नोकरी धोक्यात! टाटा समूहाची 'ही' कंपनी घेणार मोठा निर्णय, नेमकं कारण काय?
नोकरीच्या शोधात आहात? बँकेत नोकरी मिळवण्याची मोठी संधी, तब्बल 2 हजार 49 पदांसाठी भरती सुरु, कसा कुठे कराल अर्ज? 
नोकरीच्या शोधात आहात? बँकेत नोकरी मिळवण्याची मोठी संधी, तब्बल 2 हजार 49 पदांसाठी भरती सुरु, कसा कुठे कराल अर्ज? 
सात वेळा अपयशी ठरला, पण हार न मानता लढला! 46 लाखाची नोकरी सोडून भारतीय लष्करात अधिकारी झाला 
सात वेळा अपयशी ठरला, पण हार न मानता लढला! 46 लाखाची नोकरी सोडून भारतीय लष्करात अधिकारी झाला 

व्हिडीओ

Pune DJ Morcha : पुण्यात डीजेविरोधात मोर्चा, विद्यानंद बापटांच्या दांडीची चर्चा | Special Report ABP Majha
Manoj Jarange Uposhan : जरांगेंची आरपारची लढाई, मिशन आरक्षण Special Report
Rahul Gandhi on MPSC : MPSC वर भाजपचा ताबा? Special Report
OBC Vs Maratha : 2 सप्टेंबरचा GR रद्द करा, मनोज जरांगेंच्या अंतरवालीत ओबीसी आक्रमक
Raj Thackeray Thane Speech : अमित ठाकरेंनी पंतप्रधानांचा फोटो हटवला; आता राज ठाकरे इशारा देत म्हणाले

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
अर्शदीप अन् समरीनचं प्रेम आता टॅटूत अवतरलं, एकानं 'SK' तर दुसऱ्यानं 'AS' गोंदवून घेतलं; समरीन कौर आहे तरी कोण?
अर्शदीप अन् समरीनचं प्रेम आता टॅटूत अवतरलं, एकानं 'SK' तर दुसऱ्यानं 'AS' गोंदवून घेतलं; समरीन कौर आहे तरी कोण?
Mangesh Sasane : मनोज जरांगे यांचा आंदोलन सरकार पुरस्कृत; मंगेश ससाणेंचा सरकारवर हल्लाबोल, म्हणाले, जरांगे मंत्र्यांना घाण घाण शिव्या देतो तेव्हा....'
मनोज जरांगे यांचा आंदोलन सरकार पुरस्कृत; मंगेश ससाणेंचा सरकारवर हल्लाबोल, म्हणाले, जरांगे मंत्र्यांना घाण घाण शिव्या देतो तेव्हा....'
'अशा लोकांना रस्त्यावर फिरण्याचा अधिकार नाही, जेलमध्येच टाका..' कल्याण डॉक्टर हल्ला प्रकरणी शिवसेनेचा मारकुटा नगरसेवक रमेश म्हात्रेवर सुप्रीम कोर्टाचे ताशेरे, पालघरमधील घटनेची सुद्धा कोर्टाकडून दखल
'अशा लोकांना रस्त्यावर फिरण्याचा अधिकार नाही, जेलमध्येच टाका..' कल्याण डॉक्टर हल्ला प्रकरणी शिवसेनेचा मारकुटा नगरसेवक रमेश म्हात्रेवर सुप्रीम कोर्टाचे ताशेरे, पालघरमधील घटनेची सुद्धा कोर्टाकडून दखल
Satara Crime News: गैरसोयींची पोलखोल केली अन्...; कॉलेजमधून काढण्याची धमकी, दबावाखाली आलेल्या विद्यार्थिनीची हॉस्टेलच्या तिसऱ्या मजल्यावरून उडी; साताऱ्यातील घटना
गैरसोयींची पोलखोल केली अन्...; कॉलेजमधून काढण्याची धमकी, दबावाखाली आलेल्या विद्यार्थिनीची हॉस्टेलच्या तिसऱ्या मजल्यावरून उडी; साताऱ्यातील घटना
MPSC Student Protest: 'तर कोल्हापुरी पायताण दाखवून जंतर मंतर पार्ट 2 झाल्याशिवाय राहणार नाही...' पुण्यानंतर कोल्हापुरातही एमपीएसी विद्यार्थ्यांचा रस्त्यावर उतरत आक्रोश
'तर कोल्हापुरी पायताण दाखवून जंतर मंतर पार्ट 2 झाल्याशिवाय राहणार नाही...' पुण्यानंतर कोल्हापुरातही एमपीएसी विद्यार्थ्यांचा रस्त्यावर उतरत आक्रोश
Vinod Tawde: उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीचे प्रभारी झाल्यानंतर विनोद तावडे पहिल्यांदाच उत्तर प्रदेशात
उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीचे प्रभारी झाल्यानंतर विनोद तावडे पहिल्यांदाच उत्तर प्रदेशात
Gold Rate : सोने चांदीच्या दरात घसरण, सोने दरातील घसरणीचं अमेरिका कनेक्शन समोर, जाणून घ्या नवे दर
सोने चांदीच्या दरात घसरण, सोने दरातील घसरणीचं अमेरिका कनेक्शन समोर, जाणून घ्या नवे दर
Nagpur Crime News: नागपूरच्या आमदार निवास परिसरात तरूणाला संपवलं, मध्यरात्री घडली घटना, जुन्या वादातून घटना घडल्याचा संशय; मृतक रेकॉर्डवरचा गुन्हेगार
नागपूरच्या आमदार निवास परिसरात तरूणाला संपवलं, मध्यरात्री घडली घटना, जुन्या वादातून घटना घडल्याचा संशय; मृतक रेकॉर्डवरचा गुन्हेगार
Embed widget