एक्स्प्लोर

बिहार निवडणूक निकाल 2025

(Source:  ECI | ABP NEWS)

Cough Syrup advisory Maharashtra: विषारी कप सिरपमुळे लहान मुलांचे मृत्यू, नागपूर महानगरपालिकेने काढले महत्त्वाचे आदेश

Cough Syrup Deaths: चिमुकल्यांना विषारी कफ सिरप लिहून देणाऱ्या डॉक्टरला बेड्या; नागपुरातही तीन लहानग्यांची मृत्यूशी झुंज, प्रशासन अलर्ट मोडवर. नागपूर मनपाच्या आरोग्य विभागाचे निर्देश

Cough Syrup advisory Maharashtra: भारत सरकारच्या आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्रालयाद्वारे लहान मुलांना ‘कफ सिरप’च्या वापराबाबत दिशानिर्देश जारी करण्यात आले आहेत. या दिशानिर्देशाचे पालन करण्यासंदर्भात नागपूर महानगरपालिकेच्या आरोग्य विभागाने नागपूर शहरातील (Nagpur News) सर्व शासकीय व खासगी रुग्णालयांना पत्र दिले आहे. दुषित ‘कफ सिरप’मुळे (Cough Syrup) काही बालकांचा मृत्यू झाल्याच्या घटना पुढे आल्यानंतर भारत सरकारने यासंदर्भात दिशानिर्देश जारी केले. या दिशानिर्देशाचे शहरात पालन व्हावे यादृष्टीने मनपा आरोग्य विभागातर्फे रुग्णालयांना सूचना देण्यात आली आहे. 

सद्यस्थितीत नागपूर शहरातील शासकीय व खासगी रुग्णालयांमध्ये 0 ते 16 वर्ष वयोगटातील संशयित मेंदूज्वराचे (एइएस) एकूण 12 रुग्ण विविध शासकीय व खासगी रुग्णालयांमध्ये भरती आहेत. यातील मध्यप्रदेशातील 10 व महाराष्ट्रातील 1 आणि तेलंगणाचा 1 रुग्ण आहे. यापैकी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय (मेडिकल) मध्ये सहा रुग्ण उपचार घेत आहेत. एम्स मध्ये २ रुग्ण, न्यू हेल्थ सिटी हॉस्पिटलमध्ये १ रुग्ण, लता मंगेशकर हॉस्पिटलमध्ये १ रुग्ण, कलर्स हॉस्पिटलमध्ये १ आणि गेट वेल हॉस्पिटल १ रुग्ण उपचार घेत आहेत.

Cough Syrup Deaths: मेडिकल दुकानांमध्ये 'ते' विषारी औषध दिसले तर लगेच फोन करा, राज्य सरकारकडून टोल फ्री नंबर सुरु

कोल्डरिफ कफ सिरप बनवणाऱ्या कंपनीच्या कांचीपुरम युनिटमध्ये केलेल्या तपासणीत कोल्डरिफ कफ सिरपमध्ये 48.6% डायथिलीन ग्लायकोल आढळून आले होते. कप सिरपमध्ये हे प्रमाण अवघे 0.1 टक्के असणे अपेक्षित आहे. या विषारी कप सिरपमुळे अनेक लहान मुलांचे मुत्रपिंड निकामी होऊन त्यांचा मृत्यू झाला होता. यामुळे मध्य प्रदेशात 14 मुलांचा मृत्यू झाला आहे, तर राजस्थानमध्ये 3 मुलांचा मृत्यू झाला होता. या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने देशभरात सावधानतेचा इशारा दिला होता.  राज्य सरकारच्या अन्न औषध प्रशासन विभागाकडून या प्रकरणीची दखल घेत खबरदारीचा उपाय म्हणून टोल फ्री नंबर सुरू करण्यात आला आहे. कोल्ड्रिप सिरप (MP Cough Syrup) हे मे 2025 ते एप्रिल 2017 या कालावधीतील औषध मेडिकलमध्ये असल्यास तात्काळ टोल फ्री क्रमांकवर माहिती देण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.

Nagpur News: मुलांच्या मृत्यूनंतर नागपूरमधील प्रशासनाला खडबडून जाग

कफ सिरपमुळे लहान मुलांच्या मृत्यूनंतर प्रशासन खडबडून जागे झाले आहे.  वैद्यकीय शिक्षण आणि संशोधन संचालनालयच्या (DMER) पथकाने शासकीय मेडिकल रुग्णालयात पोहचून परिस्थितीचा आढावा घेतला.  DMER च्या चमू मध्ये बीजे महाविद्यालयातील बालरोग विभाग प्रमुख डॉ आरती किनीकर,जेजे महाविद्यालयातील बालरोग विभाग प्रमुख डॉ छाया वळवी,जे जे महाविद्यालयाच्या न्यायवैद्यकशास्त्र विभाग प्रमुख भालचंद्र चिकलकर यांचा समावेश आहे.

यावेळी उपचार सुरू असलेल्या रुग्णांची स्थिती,त्यांच्यावर सुरू असलेले उपचार आणि मेडिकल हिस्ट्री तपासण्यात आली. तर 'एम्स नागपूर'च्या नेतृत्वात केंद्राच्या पथकाने छिंदवाडा जिल्ह्यातील परासीया तालुक्यात जाऊन पाहणी केली. कफ सिरपमुळे सर्वाधिक मुले परासीया तालुक्यातील प्रभावित झाली आहेत. केंद्रीय पथक पुढील तीन दिवसांत आपला अहवाल सादर करण्याची शक्यता आहे.

Nagpur Mystery Death: 10 मुलांच्या मृत्यूचं गूढ कायम, NIV रिपोर्ट कधी येणार?

* 10 बालकांच्या मृत्यूचे नेमके कारण काय?

* विदर्भ आणि मध्यप्रदेशातील छिंदवाडा परिसरात संशयित ए इ एस या मेंदूज्वराचे (Acute Encephalitis Syndrome) रुग्ण सापडत आहे का?

* असे असताना एइएस जापानी एन्सेफेलायटिस आणि चांडीपुरा व्हायरसचे चाचणी अहवाल नकारार्थी? मग मृत्यूचे नेमके कारण काय?

* पुण्याच्या राष्ट्रीय विषाणू प्रयोगशाळेतील (NIV) तपासणी अहवाल केव्हा येणार?

आणखी वाचा

चिमुकल्यांना विषारी कफ सिरप लिहून देणाऱ्या डॉक्टरला बेड्या; नागपुरातही तीन लहानग्यांची मृत्यूशी झुंज, प्रशासन अलर्ट मोडवर

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

दोन कोटी भारतीयांच्या नोकऱ्या जाऊ शकतात, AI आणि व्यापारातील अस्थिरतेमुळे मध्यमवर्गीयांसमोर मोठं संकट
दोन कोटी भारतीयांच्या नोकऱ्या जाऊ शकतात, AI आणि व्यापारातील अस्थिरतेमुळे मध्यमवर्गीयांसमोर मोठं संकट
मुंबईत इमारतीच्या पायाभरणीवेळी दुर्घटना, मातीच्या ढिगाऱ्याखाली 2 कामगारांचा मृत्यू, 3 जखमी
मुंबईत इमारतीच्या पायाभरणीवेळी दुर्घटना, मातीच्या ढिगाऱ्याखाली 2 कामगारांचा मृत्यू, 3 जखमी
Bihar Election Result 2025: नितीश कुमार सरकारवर 62 हजार कोटींच्या घोटाळ्यांचा आरोप केला अन् निकाल लागताच भाजपकडून माजी केंद्रीय मंत्र्याची हकालपट्टी
नितीश कुमार सरकारवर 62 हजार कोटींच्या घोटाळ्यांचा आरोप केला अन् निकाल लागताच भाजपकडून माजी केंद्रीय मंत्र्याची हकालपट्टी
PM नरेंद्र मोदी चंद्रावरही शिवशक्ती कॉलनी उघडणार; भाजपच्याच मंत्र्यांचा दावा, आदित्य ठाकरेंना टोला 
PM नरेंद्र मोदी चंद्रावरही शिवशक्ती कॉलनी उघडणार; भाजपच्याच मंत्र्यांचा दावा, आदित्य ठाकरेंना टोला 
Advertisement
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

Mahapalikecha Mahasangram Solapur : सोलापूर महापालिकेतील राजकीय गणित बदलणार? कोण बाजी मारणार?
Mahapalikecha Mahasangram Vasai Virar पालिकेत कोणाची बाजी? अनधिकृत बांधकामामुळे पालिका चर्चेत
Congress On Bihar Vote Chori : काँग्रेस बिहारमधील व्होटर्स डेटा चेक करणार - सूत्र
Pimpri NCP: पिंपरी चिंचवडमध्ये पवार काका-पुतण्यांची आघाडी होणार? की काँग्रेस, शिवसेना बिघाडी करणार?
Mumbai Gundawali Metro : गुंदावली मेट्रो स्टेशनवर आढळली बेवारस संशयास्पद बॅग; सुरक्षा यंत्रणा सतर्क

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
दोन कोटी भारतीयांच्या नोकऱ्या जाऊ शकतात, AI आणि व्यापारातील अस्थिरतेमुळे मध्यमवर्गीयांसमोर मोठं संकट
दोन कोटी भारतीयांच्या नोकऱ्या जाऊ शकतात, AI आणि व्यापारातील अस्थिरतेमुळे मध्यमवर्गीयांसमोर मोठं संकट
मुंबईत इमारतीच्या पायाभरणीवेळी दुर्घटना, मातीच्या ढिगाऱ्याखाली 2 कामगारांचा मृत्यू, 3 जखमी
मुंबईत इमारतीच्या पायाभरणीवेळी दुर्घटना, मातीच्या ढिगाऱ्याखाली 2 कामगारांचा मृत्यू, 3 जखमी
Bihar Election Result 2025: नितीश कुमार सरकारवर 62 हजार कोटींच्या घोटाळ्यांचा आरोप केला अन् निकाल लागताच भाजपकडून माजी केंद्रीय मंत्र्याची हकालपट्टी
नितीश कुमार सरकारवर 62 हजार कोटींच्या घोटाळ्यांचा आरोप केला अन् निकाल लागताच भाजपकडून माजी केंद्रीय मंत्र्याची हकालपट्टी
PM नरेंद्र मोदी चंद्रावरही शिवशक्ती कॉलनी उघडणार; भाजपच्याच मंत्र्यांचा दावा, आदित्य ठाकरेंना टोला 
PM नरेंद्र मोदी चंद्रावरही शिवशक्ती कॉलनी उघडणार; भाजपच्याच मंत्र्यांचा दावा, आदित्य ठाकरेंना टोला 
Bihar Election Result 2025: बिहारमधील दारुण पराभवानंतर राहुल गांधी थेट मल्लिकार्जुन खरगेंच्या घरी पोहोचले; दोन आठवड्यात पुरावे मांडणार
बिहारमधील दारुण पराभवानंतर राहुल गांधी थेट मल्लिकार्जुन खरगेंच्या घरी पोहोचले; दोन आठवड्यात पुरावे मांडणार
खळबळजनक! प्राणी संग्रहालयातील 28 काळविटांचा अचानक मृत्यू; वनमंत्र्यांकडून चौकशीचे आदेश
खळबळजनक! प्राणी संग्रहालयातील 28 काळविटांचा अचानक मृत्यू; वनमंत्र्यांकडून चौकशीचे आदेश
Home :  स्वप्नातील घर खरेदी करण्यापूर्वी 'या' गोष्टींवर लक्ष ठेवा, अन्यथा मोठं नुकसान होण्याची शक्यता
नवं किंवा जुनं घर, दुकान खरेदी करण्यापूर्वी या गोष्टींची काळजी घ्या, अन्यथा मोठा फटका बसण्याची शक्यता
...तर पिंपरी चिंचवडच्या 128 जागा स्वबळावर लढणार; श्रीरंग बारणेंचा अजित पवारांच्या राष्ट्रवादीला इशारा
...तर पिंपरी चिंचवडच्या 128 जागा स्वबळावर लढणार; श्रीरंग बारणेंचा अजित पवारांच्या राष्ट्रवादीला इशारा
Embed widget