एक्स्प्लोर

If on a Winter's Night Movie Review: महानगरं आणि तिथल्या घडल्या-बिघडल्या नात्यांची गोष्ट - खिडकी गाव (2025)

If on a Winter's Night Movie Review: स्वप्नांच्या शोधात प्रत्येकजण महानगरात येतो. पण ही शहरं त्यांना सामावून घेतात का? शहरातल्या गर्दीत ते सामील होतात. तिथल्या धावपळीचा भाग बनतात. पण तरीही ते एकटे असतात. ‘भीड में अकेले होना’, ही गावाकडून शहरात येणाऱ्या प्रत्येकाची गोष्ट आहे. खासकरुन मुंबई, दिल्ली आणि कोलकाता सारख्या महानगरांमध्ये येणाऱ्या लोकांची गोष्ट समसमानच असते. दिग्दर्शक पायल कपाडियानं ऑल व्युई इमॅजिन एज लाईट (2024) या सिनेमातून मुंबईत राहणाऱ्या तीन महिलांचं एकटीपण, रितेपण प्रकर्षानं दाखवून दिलं. जागतिक पातळीवर त्याचा सन्मान झाला. महानगरात आपण उपरेच ठरतो. नव्या शहरात आपण आपली माणसं शोधतो, बनवतो. नवी नाती तयार करतो. पण आतलं एकटंपण अनेकदा तसंच राहतं. बाहेर प्रचंड गोंगाट, गर्दी सुरु असताना आतून एकटंपण, रिकामपण जाणवत असतं. म्हणूनच लाईफ इन मेट्रो (2007) मधला माँटी (इरफान खान) म्हणतो तसं ‘यह शहर हमें जितना देता है ना, उससे जादा हमसे ले लेता है’. बाहेरुन महानगरात आलेल्या प्रत्येकाची भावना काहीतरी गमावल्याची असते. संजू सुरेंद्रनचा मल्याळम सिनेमा खिडकी गाव - If On A Winter’s Night (2025) अश्याच अवस्थेत असलेल्या साराची गोष्ट सांगतो. 

If on a Winter's Night Movie Review: महानगरं आणि तिथल्या घडल्या-बिघडल्या नात्यांची गोष्ट - खिडकी गाव (2025)

दक्षिण कोरियातल्या बुसान इंटरनॅशनल फिल्म फेस्टिव्हलच्या (BIFF) व्हिजन एशिया (Vision Asia) या कॅटेगरीतल्या स्पर्धेची सुरुवात खिडकी गावनं झाली. पायल कपाडिया या सिनेमाची कार्यकारी निर्माती आहे. संजूचा हा पहिला सिनेमा आहे. गेल्यावर्षी एशियन कंटेंट मार्केटमधून (ACM) या सिनेमाची निर्मीती झाली. सिनेमाचं पोस्ट-प्रोडक्शन बुसानमध्येच झालं. त्यामुळं सहाजिकच या सिनेमाची उत्सुकता जास्त होती. 

माँटीनं म्हटल्याप्रमाणे शहर हमसे बहोत कुछ ले लेता है, तसंच साराच्या (Bhanu Priyamvada) बाबतीत घडतं. ती तिच्या बॉयफ्रेन्ड आदिसोबत (Roshan Abdul Rahoof) दिल्ली शहरात आलीय. कुटुंबापासून फारकत घेऊन दिल्ली गाठलेय. सहाजिकच केरळातल्या गावातल्या तिच्या कुटंबाला तरुण मुलीच्या दिल्लीतल्या हालचालीची काळजी वाटतेय. हिंदी येत नसताना तू दिल्लीत कशी तग धरुन राहशील ? हा तिच्या आईचा सवाल सिनेमाभर साराची पाठ सोडत नाही. सारा घरची कमवती लेक आहे. म्हणूनच नवीनं संधी शोधायला सारानं दिल्लीत नोकरी पकडलेय, आता तिला आदिसोबत मस्त जगायचंय. आदि स्ट्रगलर म्युझिशियन आहे. तो दिल्लीत स्वप्न घेऊन आलाय. इथं करियर करायचं, साराला ही आपल्यासोबत त्याची स्वप्न पूर्ण झालेली पाहायचीय. घराकडून भावाच्या शिक्षणासाठी होणारी सतत होणारी पैश्याची मांगणी आणि तुटपुंजा पगारात आदिसोबत स्वप्नांना गवसणी घालण्याचा प्रयत्न अश्या परिस्थितीत अडकलेली सारा अशी सिनेमाची गोष्ट.  

If on a Winter's Night Movie Review: महानगरं आणि तिथल्या घडल्या-बिघडल्या नात्यांची गोष्ट - खिडकी गाव (2025)

शहरं तुमच्या नाते संबंधावर परिणाम करतात. दिल्ली म्हणजे मुंबई नाही. ऑल वुई इमॅजीन इज लाईट (2024) या सिनेमात मुंबईची बाहेरच्या लोकांना सामावून घेण्याची प्रक्रिया आहे. पण खिडकी गावमध्ये दिल्लीत बाहेरचे कसे उपरेच राहतात. याची गोष्ट आहे. दिल्ली शहरात बाहेरुन येणाऱ्या लोकांना परकेपणा जाणवतोच. तिथले लोक ही त्याची जाणिव करुन देतात. सतत पैश्यांचा विषय काढणारी आई, वीज-पाणी वापरण्यावरुन सतत टोकणारी साराची घर मालकीण, दिल्ली शहरातल्या लोकांची मानसिकतेचं दर्शन घडवते. तिथला घरमालक आणि भाडेकरु यांचा संघर्ष संजू सुरेंद्रननं चांगला टिपलाय. भाषा आणि दिल्लीकरांच्या संबंधांबद्दल संजूचं निरिक्षण कमालीचं चांगलं आहे. 

If on a Winter's Night Movie Review: महानगरं आणि तिथल्या घडल्या-बिघडल्या नात्यांची गोष्ट - खिडकी गाव (2025)

सारा आणि आदि दोघांची केमेस्ट्री खुप चांगली आहे. त्याच्यातला रोमांस पडद्यावर दिसतो. दोघांचं एकमेकांसोबत कंपेटेबल राहणं सुखावतं. आदि आर्टिस्ट असल्यानं त्याच्या स्वभावात काही दोष आहेत. जाणता-अजाणता त्याचा या दोघांच्या नात्यांवर होतो. शहरात टिकून राहण्याचं प्रेशर प्रचंड असतं. सारा या दिव्यातून जात असते. घरकडून सतत होणारी पैश्याची मागणी आणि तुटपुंज्या पैश्याचं गणित नेहमी बिघडवणारा आदि, अशा कचाट्यात अडकलेली सारा अशी सिनेमाची गोष्ट आहे. त्याचे मित्र  सायमन आणि गायत्रीची गोष्ट तर अगदी भन्नाट आहे. दिल्लीच्यी  गर्दीत ती दोघं आपली माणसं शोधतायत. त्यातून घडणारं नाट्य भारी आहे. 

If on a Winter's Night Movie Review: महानगरं आणि तिथल्या घडल्या-बिघडल्या नात्यांची गोष्ट - खिडकी गाव (2025)

संजूनं दिल्लीची नॉर्थ प्रवृत्ती चांगली दाखवलेय. उत्तरेकडची लोकं स्वत: नेहमी इतरांपेक्षा सुपिरीरीयर मानतात. बाहेरच्या लोकांबद्दल त्यांना आकस असतो. दिल्लीत राहणाऱ्या परप्रांतियांनी कधीना ना कधी हा अनुभव नक्कीच घेतलेला असतो. संजूची ही मांडणी फार कमालीची आहे. एकूणात खिडकी गाव ही महानगराच्या  फेऱ्यात अडकलेल्या सारा आणि आदिची गोष्ट आहे. दिल्ली शहर, तिथली गर्दी आणि तिथली लोकं हे या सिनेमाची मुख्य पात्रं आहेत. 

आतले आणि बाहेरचे हा संघर्ष सिनेमात नेहमीच आलाय. तुम्ही बाहेरच्या जगाशी लढू शकता. किंबहुना त्यासाठीच तुम्ही आपली माणसं, आपली जमीन सोडता, नव्या शहरात येता. पण इथं आल्यानंतर आतला, स्वत:चा स्वत:शी जो संघर्ष सुरु होतो, तो सतत अस्वस्थ करत राहतो. तो संजूनं चांगला मांडला आहे. 

If on a Winter's Night Movie Review: महानगरं आणि तिथल्या घडल्या-बिघडल्या नात्यांची गोष्ट - खिडकी गाव (2025)

ऑल वुई इमॅजीन एज लाईटसोबत मला इथं आणखी एक सिनेमाची आठवण होते. पार्थ सौरभच्या पोकर के धुनु पार (2022) या सिनेमाची. यातली प्रियंका (Tanaya Khan Jha) आणि आपल्या साराची अवस्था समान आहे. त्यांनी साथीदार म्हणून ज्यांची निवड केलीय ते थोडे अल्लड आहेत. त्यामुळं आता कुटुंबची जबाबदारी त्यांची आहे. असा हा थेट स्त्रीवादी दृष्टीकोन संजूच्या खिडकी गावमध्ये ही आहे. तो फिमेल गेझ खिडकी गाव मध्ये जरा जास्त आहे. शिवाय सोशल मीडियाच्या माध्यमातून बाहेरगावी गेलेल्या सतत मुलीच्या हालचालीवर लक्ष ठेवून राहणारं टिपिकल भारतीय कुटुंब दोन्ही सिनेमात आहे. ही समानता भारतीय कुटूंब व्यवस्था, त्यातली स्त्री, तिची धडपड आणि आधुनिकता असे बरेचशे अंडर करंट या सिनेमात दिसतात.    

बुसान इंटरनॅशनल फिल्म फेस्टिव्हलमध्ये खिडकी गाव ला हाय-लाईफ (Hi Life Awards) हा प्रतिष्ठेचा पुरस्कार मिळाला. त्याची प्रचंड चर्चा झाली. गर्दीनं भरलेल्या शहरातलं एकटंपण दाखवण्यात यशस्वी झालेल्या संजूसाठी ही पोचपावती होती. 

मल्याळम सिनेमा त्याच्या गोष्टीसाठी गाजतो. संजू सुरेंद्रनच्या खिडकी गावची गोष्टही प्रेक्षकांना भुरळ घालते यात शंका नाही.

View More

ओपिनियन

Sponsored Links by Taboola
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

ऋतुराज गायकवाडची थेट उपकर्णधारपदी नियुक्ती, आफ्रिका दौऱ्यात मोठी जबाबदारी सोपवली, भारत अ संघात कोणाकोणाची निवड? 
ऋतुराज गायकवाडची थेट उपकर्णधारपदी नियुक्ती, आफ्रिका दौऱ्यात मोठी जबाबदारी सोपवली, भारत अ संघात कोणाकोणाची निवड? 
धक्कादायक! संभाजीनगर फलकाखाली लघुशंका केल्याने युवकाला धमक्या, नेटीझन्सकडून ट्रोल; तरुणाची विहिरीत उडी
धक्कादायक! संभाजीनगर फलकाखाली लघुशंका केल्याने युवकाला धमक्या, नेटीझन्सकडून ट्रोल; तरुणाची विहिरीत उडी
मोठी बातमी : ऋषभ पंतचं पुनरागमन, उपकर्णधारपदी नियुक्ती, दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या मालिकेसाठी टीम इंडियाची घोषणा
मोठी बातमी : ऋषभ पंतचं पुनरागमन, उपकर्णधारपदी नियुक्ती, दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या मालिकेसाठी टीम इंडियाची घोषणा
Tata Bike : टाटा बाईक फक्त 18 हजारांमध्ये? टू व्हिलर मार्केटला हादरवणाऱ्या बातमीमागचं सत्य काय?
टाटा बाईक फक्त 18 हजारांमध्ये? टू व्हिलर मार्केटला हादरवणाऱ्या बातमीमागचं सत्य काय?
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Pune Crime: 'मुली बऱ्या करायच्या असतील तर सगळी संपत्ती विका', महिला मांत्रिकाने IT Engineer ला 14 कोटींना लुटले
Maharashtra Politics: 'तुम्ही काय हलवताय?', कर्जमाफीवरून Uddhav Thackeray यांचा Ajit Pawar यांना थेट सवाल
Central Team Row: 'केंद्राचं पथक दाखवा आणि १०० रुपये मिळवा', Uddhav Thackeray यांचा सरकारला टोला
Farmer Aid Row: ‘तुमच्यामुळे 6 रुपये मिळाले’, Uddhav Thackeray यांच्या दौऱ्यात शेतकऱ्याचा संतप्त सवाल
Maharashtra Politics: 'एक अनर्थमंत्री, दुसरे गृहखलनमंत्री', Uddhav Thackeray यांचा Fadnavis, Pawar वर हल्लाबोल

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
ऋतुराज गायकवाडची थेट उपकर्णधारपदी नियुक्ती, आफ्रिका दौऱ्यात मोठी जबाबदारी सोपवली, भारत अ संघात कोणाकोणाची निवड? 
ऋतुराज गायकवाडची थेट उपकर्णधारपदी नियुक्ती, आफ्रिका दौऱ्यात मोठी जबाबदारी सोपवली, भारत अ संघात कोणाकोणाची निवड? 
धक्कादायक! संभाजीनगर फलकाखाली लघुशंका केल्याने युवकाला धमक्या, नेटीझन्सकडून ट्रोल; तरुणाची विहिरीत उडी
धक्कादायक! संभाजीनगर फलकाखाली लघुशंका केल्याने युवकाला धमक्या, नेटीझन्सकडून ट्रोल; तरुणाची विहिरीत उडी
मोठी बातमी : ऋषभ पंतचं पुनरागमन, उपकर्णधारपदी नियुक्ती, दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या मालिकेसाठी टीम इंडियाची घोषणा
मोठी बातमी : ऋषभ पंतचं पुनरागमन, उपकर्णधारपदी नियुक्ती, दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या मालिकेसाठी टीम इंडियाची घोषणा
Tata Bike : टाटा बाईक फक्त 18 हजारांमध्ये? टू व्हिलर मार्केटला हादरवणाऱ्या बातमीमागचं सत्य काय?
टाटा बाईक फक्त 18 हजारांमध्ये? टू व्हिलर मार्केटला हादरवणाऱ्या बातमीमागचं सत्य काय?
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 5 नोव्हेंबर 2025 | बुधवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 5 नोव्हेंबर 2025 | बुधवार
इंदुरीकर महाराजांच्या लेकीचा राजेशाही थाटात साखरपुडा, व्हिडिओ व्हायरल; काय करतो होणारा जावई?
इंदुरीकर महाराजांच्या लेकीचा राजेशाही थाटात साखरपुडा, व्हिडिओ व्हायरल; काय करतो होणारा जावई?
गावखेड्यात गतीमान इंटरनेट पोहोचणार; महाराष्ट्र सरकारचा इलॉन मस्कच्या स्टारलिंकशी करार, जाणून घ्या डिटेल्स
गावखेड्यात गतीमान इंटरनेट पोहोचणार; महाराष्ट्र सरकारचा इलॉन मस्कच्या स्टारलिंकशी करार, जाणून घ्या डिटेल्स
Solapur VIDEO : केंद्रीय पथक रात्रीतून आलं, आपापासात हिंदीत बोललं, पण आमचं ऐकूनही घेतलं नाही; कोळेगावच्या ग्रामस्थांचा संताप
केंद्रीय पथक रात्रीतून आलं, आपापासात हिंदीत बोललं, पण आमचं ऐकूनही घेतलं नाही; कोळेगावच्या ग्रामस्थांचा संताप
Embed widget