एक्स्प्लोर

Dilip Khedkar : क्लिनर अपहरण केस, माजी IAS दिलीप खेडकरच्या जामिनाला पोलिसांचा तीव्र विरोध

Dilip Khedkar Case : दिलीप खेडकरला जामीन मिळाल्यास त्याचा तपासावर परिणाम होण्याची शक्यता असल्याचा युक्तिवाद रबाळे पोलिसांनी न्यायालयात केला.

नवी मुंबई : वादग्रस्त माजी आयएएस अधिकारी दिलीप खेडकरच्या (Dilip Khedkar) जामीन अर्जावर सोमवारी बेलापूर कोर्टात सुनावणी घेण्यात आली. या सुनावणीत सरकारी वकील आणि रबाळे पोलीस अधिकाऱ्यांनी दिलीप खेडकरला जामीन दिल्यास केसवर परिणाम होवू शकतो असा युक्तिवाद केला. तर मनोरमा खेडकरला जामीन मिळूनही तपासात सहकार्य करीत सल्याचे न्यायालयाच्या लक्षात आणून दिले. यानंतर न्यायालयाने जामीनावरील निकाल 8 ऑक्टोबरपर्यंत पर्यंत राखून ठेवला.

दोन्ही पक्षकारांच्या बाजू ऐकून घेतल्या

रबाळे पोलिस ठाण्याच्या हद्दीत झालेल्या मिक्सर क्लिनर प्रल्हाद कुमार या तरुणाच्या अपहरणात मुख्य आरोपी दिलीप खेडकर, प्रफुल्ल साळुंखे आणि मनोरमा खेडकर यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला होता. यातील प्रफुल्ल साळुंखेला अटक करण्यात आली आहे. तर मुख्य आरोपी दिलीप खेडकर अद्याप फरार आहे. त्याला जामीन मिळावा यासाठी बेलापूर कोर्टात सोमवारी सुनावणी घेण्यात आली. या सुनावणीत दोन्ही पक्षकारांच्या बाजू ऐकून घेण्यात आल्या.

खंडणीचा प्रकार असल्याचा युक्तिवाद

प्रल्हाद कुमारला पुणे येथे आणले असले तरी त्याला मारहाण करण्यात आली नाही किंवा जीवितास हानी पोचवली नसल्याचे आरोपी दिलीप खेडकरच्या वकिलांनी कोर्टासमोर सांगितले. यामुळे खेडकरला जामीन मिळावा अशी त्यांनी मागणी केली.

यावर सरकारी वकीलांनी विरोध केला. क्लिनर प्रल्हादकुमार किडनॅप केल्यानंतर त्यांचा मोबाईल बंद ठेवण्यात आला. त्याला पुणे येथे घेन गेले. रात्रभर तळघरात ठेवण्यात आले. त्यामुळे हा अपहरण आणि खंडणीचा प्रकार असल्याने जामीन देवू नये अशी मागणी केली.

खेडकरच्या जामिनाला पोलिसांचा विरोध

रबाळे पोलीस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक बाळकृष्ण सावंत यांनी दिलीप खेडकरच्या जामीनाला जोरदार विरोध केला. यावेळी त्यांनी खेडकर आणि परिवारावर याआधी असलेल्या गंभीर गुन्हांचा पाढा वाचला. गंभीर गुन्हे दाखल असलेल्या दिलीप खेडकरला जामीन दिल्यास याचा केसवर परिणाम होवू शकतो. फिर्यादीवर दबाव येवू शकतो असे स्पष्ट केले.

आरोपीने घरातील डीव्हीआर (CCTV रेकॉर्डिंग) गायब केले आहेत. गुन्ह्यातील गाडी आणि मोबाईल फोन लपवण्यात आले आहेत. क्लिनरच्या अपहरणानंतर आरोपींनी रात्री कोणाशी संवाद साधला, याचा शोध घेणे आवश्यक आहे. या कारणांमुळे पोलिसांनी आरोपींना पोलीस कस्टडीत घेऊन तपास करण्याची गरज असल्याचे न्यायालयास सांगितले आहे.

मनोरमा खेडकरांच्या वर्तनावर आक्षेप

पोलिसांनी न्यायालयाला दिलेल्या माहितीनुसार, मनोरमा खेडकर जामीन मिळाल्यानंतरही तपासात सहकार्य करीत नाहीत. सकाळी 10 ते सायंकाळी 6 पर्यंत चौकशीसाठीची वेळ असताना वेळ गेल्यानंतर चौकशीसाठी उशीरा येत आहेत. सुर्यास्तानंतर महिलेची चौकशी करण्यास कायद्याने मनाई असल्याचे याचा फायदा मनोरमा खेडकर घेत आहे.

जामीन अर्जातील खोटे दावे

पोलिसांच्या मते, मनोरमा खेडकर यांच्या जामीन अर्जात खोटे विधान करण्यात आले आहे. क्लिनरला चांगले खायला दिल्याचा दावा त्यामध्ये करण्यात आला. परंतु विक्टिम प्रल्हाद कुमार यांच्या जबाबात उलट स्पष्ट झाले की, त्याला शिळे अन्न दिले गेले. तसेच त्यांनी 'त्याला सकाळी सोडून दिले' हा दावा सुद्धा खोटा असल्याचे पोलिसांनी म्हटल.

दिलीप खेडकरच्या वर्तनाबाबत गंभीर निरीक्षणे

पोलिसांनी न्यायालयात म्हटलं की, 13 सप्टेंबर रोजी रबाळे परिसरात लँड क्रूझर आणि मिक्सरमध्ये झालेल्या किरकोळ अपघातानंतर दिलीप खेडकर यांनी मिक्सर चालकावर हल्ला करून त्याला जबरदस्तीने आपल्या गाडीत बसवले. त्याला पोलीस स्टेशनला नेण्याऐवजी, मोबाइल हिसकावून घेऊन पुण्यातील आपल्या बंगल्यात नेऊन तळघरात डांबून ठेवले.

पोलिसांवर कुत्रे सोडले

पोलिस लोकेशनच्या आधारे तिथे पोहोचले असता, मनोरमा खेडकर यांनी बंगल्याचा दरवाजा बंद करून बाहेर कुत्रे सोडले आणि पोलिसांना आत येण्यापासून परावृत्त केले. या कारवाई दरम्यान दिलीप खेडकर, ड्रायव्हर साळुंखे आणि गुन्ह्यातील गाडी आतमध्ये असतानाही पोलिसांना प्रवेश नाकारण्यात आला. त्यानंतर पोलिस स्टेशनला येतो असे सांगून आरोपी फरार झाले.

पोलिसांच्या म्हणण्यानुसार, आरोपी उच्चशिक्षित असले तरी त्यांनी कायद्याचा गैरवापर केला आहे. त्यांनी केलेली कृत्ये संघटित गुन्हेगारी स्वरूपाची आहेत. तपासाला ते अजिबात सहकार्य करत नाहीत आणि पुरावे नष्ट करत आहेत. त्यामुळे सत्यशोधनासाठी त्यांना पोलीस कोठडीत घेणे अत्यावश्यक आहे.

रबाळे पोलीस स्टेशनचे तपास पथक या प्रकरणात सतत चौकशी करत असून, दिल्ली, पुणे आणि नवी मुंबई या तिन्ही ठिकाणी तपासाचा विस्तार केला जात आहे. न्यायालयात पुढील सुनावणीदरम्यान आरोपींच्या जामीन अर्जावर निर्णय होणार असून, पोलिसांचा दावा आहे की आरोपींना जामीन मिळाल्यास तपासावर गंभीर परिणाम होईल.

महत्त्वाच्या बातम्या

Video: अन् क्रेटा कार दुभाजकाला धडकून तब्बल 10 फुट हवेत उडाली; गँगस्टर अतीक अहमदच्या लेकाच्या भीषण अपघाताचा भयावह Live व्हिडिओ समोर
Video: अन् क्रेटा कार दुभाजकाला धडकून तब्बल 10 फुट हवेत उडाली; गँगस्टर अतीक अहमदच्या लेकाच्या भीषण अपघाताचा भयावह Live व्हिडिओ समोर
B.Tech इंजिनिअरने ड्रायव्हर बनून चोरली लक्झरी कार; व्हर्च्युअल व्हॉट्सअप मोबाईल नंबर बनवून पसार, अखेर पुण्यात बेड्या
B.Tech इंजिनिअरने ड्रायव्हर बनून चोरली लक्झरी कार; व्हर्च्युअल व्हॉट्सअप मोबाईल नंबर बनवून पसार, अखेर पुण्यात बेड्या
देवदर्शनाहून परतणाऱ्या भाविकांच्या बोलेरोला अपघात, स्विफ्ट कारची जोरदार धडक; 12 जखमी, 6 गंभीर
देवदर्शनाहून परतणाऱ्या भाविकांच्या बोलेरोला अपघात, स्विफ्ट कारची जोरदार धडक; 12 जखमी, 6 गंभीर
Mumbai Crime Police: कुंपणानेच शेत खाल्लं! मुंबईत पोलीस कॉन्स्टेबलला ड्रग्ज खरेदी करताना रंगेहाथ पकडलं
कुंपणानेच शेत खाल्लं! मुंबईत पोलीस कॉन्स्टेबलला ड्रग्ज खरेदी करताना रंगेहाथ पकडलं

व्हिडीओ

Sanjay Raut PC : शिवसेना सुनावणी, शिंदेंवर हल्लाबोल ते गडचिरोली प्रकरण; संजय राऊतांचा हल्लाबोल!
Sanjay Kute On Manoj Jarange : जरांगेंच्या मागणीवर भाजप आमदार संजय कुटेंचं भाष्य, भाषेवरुन सुनावलं!
Gatari Pune News: आधी मटण घेणार, मगच ऑफिसला जाणार...; गटारी स्पेशल पुणेकरांचा बेत
Manoj Jarange Mumbai Protest : मनोज जरांगेंची पुन्हा मुंबईकडे कूच? भगवं वादळ मुंबईत घडकणार?
Rahul Gandhi Amit Shah Special Report : संसदेच्या अधिवेशनात विद्यार्थ्यांच्या मुद्यावरुन घमासान

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Sunetra Pawar : महिला नेतृत्वावर टीका करणाऱ्यांना कामातून उत्तर देणार; देवेंद्र फडणवीसांच्या पाठिंब्याबद्दल सुनेत्रा पवारांचे आभार
महिला नेतृत्वावर टीका करणाऱ्यांना कामातून उत्तर देणार; देवेंद्र फडणवीसांच्या पाठिंब्याबद्दल सुनेत्रा पवारांचे आभार
अखेर रायगडमध्ये भरत गोगावले झेंडावंदन करणार; सुनेत्रा पवारांच्याहस्ते बीडमध्ये ध्वजारोहण, पुण्यात कोण?
अखेर रायगडमध्ये भरत गोगावले झेंडावंदन करणार; सुनेत्रा पवारांच्याहस्ते बीडमध्ये ध्वजारोहण, पुण्यात कोण?
राष्ट्रवादीच्या महिला नेत्याचा वेगळाच अंदाज; शेतात 'धामण' साप पकडल्यानंतर रोहिणी खडसेंचं आवाहन
राष्ट्रवादीच्या महिला नेत्याचा वेगळाच अंदाज; शेतात 'धामण' साप पकडल्यानंतर रोहिणी खडसेंचं आवाहन
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 12 ऑगस्ट 2026 | बुधवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 12 ऑगस्ट 2026 | बुधवार
B.Tech इंजिनिअरने ड्रायव्हर बनून चोरली लक्झरी कार; व्हर्च्युअल व्हॉट्सअप मोबाईल नंबर बनवून पसार, अखेर पुण्यात बेड्या
B.Tech इंजिनिअरने ड्रायव्हर बनून चोरली लक्झरी कार; व्हर्च्युअल व्हॉट्सअप मोबाईल नंबर बनवून पसार, अखेर पुण्यात बेड्या
Video: अन् क्रेटा कार दुभाजकाला धडकून तब्बल 10 फुट हवेत उडाली; गँगस्टर अतीक अहमदच्या लेकाच्या भीषण अपघाताचा भयावह Live व्हिडिओ समोर
Video: अन् क्रेटा कार दुभाजकाला धडकून तब्बल 10 फुट हवेत उडाली; गँगस्टर अतीक अहमदच्या लेकाच्या भीषण अपघाताचा भयावह Live व्हिडिओ समोर
अशा पद्धतीने कोणतेही सरकार पाडू शकता, एखाद्या विधीमंडळ पक्षाची सत्ताधारी पक्षाला विक्री कशी होऊ शकते? कायद्याला लोकशाहीची विटंबना करू देऊ नका, कपिल सिब्बलांची कोर्टात 'सर्वोच्च' साद
अशा पद्धतीने कोणतेही सरकार पाडू शकता, एखाद्या विधीमंडळ पक्षाची सत्ताधारी पक्षाला विक्री कशी होऊ शकते? कायद्याला लोकशाहीची विटंबना करू देऊ नका, कपिल सिब्बलांची कोर्टात 'सर्वोच्च' साद
पेपरफूट गैरप्रकारबाबत केंद्राचा कायदा राज्यात लागू, परीक्षा पद्धती सुधारणांसाठी उच्चस्तरीय समिती; मुख्यमंत्र्यांचे निर्देश
पेपरफूट गैरप्रकारबाबत केंद्राचा कायदा राज्यात लागू, परीक्षा पद्धती सुधारणांसाठी उच्चस्तरीय समिती; मुख्यमंत्र्यांचे निर्देश
Embed widget