एक्स्प्लोर
पुण्यात ड्रंक अँड ड्राईव्हचा थरार, मद्यधुंद चालकाच्या कारचा चेंदामेंदा; दुचाकीस्वार जखमी
पुण्यातील पोर्शे कार अपघात कधीही न विसरता येण्यासारखा असून पुणे पोलिसांनी देखील तेव्हापासून बेदरकारपणे वाहन चालवणाऱ्यांवर थेट कारवाईला सुरुवात केल्याचं पाहायला मिळत आहे.
Pune car accident drunk and drive case police
1/8

पुण्यातील पोर्शे कार अपघात कधीही न विसरता येण्यासारखा असून पुणे पोलिसांनी देखील तेव्हापासून बेदरकारपणे वाहन चालवणाऱ्यांवर थेट कारवाईला सुरुवात केल्याचं पाहायला मिळत आहे.
2/8

पुण्यातील बालगंधर्व रंगमंदिराजवळ "ड्रंक अँड ड्राइव्ह" ची घटना घडल्याचं समोर आलं आहे. मद्यधुंद कारचालकाने दुचाकीस्वाराला दिली धडक आणि थेट वाहन दुभाजकावर चढवले
3/8

दुभाजकाला धडकल्याने वाहनाचा अक्षरशः चेंदामेंदा झाला आहे, डेक्कन पोलिसांकडून कार चालकावर ड्रंक अॅड ड्राईव्हचा खटला दाखल केला आहे.
4/8

चालकाकडे वाहन परवाना नसताना वाहन धाराशिवमधून चारचाकी चालवत पुण्यात हा प्रताप केल्याचं प्राथमिक चौकशीतून समोर आलं आहे. अनिकेत रमाकांत सोनटक्के (वय 25, चाकण, धाराशिव) असे या कारचालकाचे नाव आहे.
5/8

पुण्यातील बालगंधर्व रंगमंदिर येथील विठ्ठल रामजी शिंदे पुलाजवळ ही घटना शनिवारी संध्याकाळी ७ वाजता घडली. शिक्षणासाठी पुण्यात आलेल्या सोनटक्केने सायंकाळी गर्दीच्यावेळी भरधाव वाहन चालवत दुचाकीस्वाराला धडक दिली. त्यानंतर वाहन पुढे छत्रपती शिवाजीनगर परिसरातील दुभाजकावर चढवले
6/8

डेक्कन पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, या वाहन चालकाने आधी बालगंधर्व रंगमंदीरजवळ एका दुचाकीला धडक दिली, यात दुचाकीस्वार किरकोळ जखमी झाला.
7/8

या तरुणाने माझी काही नुकसान झाले नाही, म्हणून तक्रार देण्यास नकार दिला आहे. काही अंतरावर असलेल्या एका दुभाजकावर वाहन चढवल्याने वाहनाचे मोठे नुकसान झाले आहे.
8/8

सोनटक्के याच्यावर डेक्कन पोलिस ठाण्यात ड्रंक अॅन्ड ड्राईव्हचा खटला दाखल केला असून वाहनाचे मोठे नुकसान झाल्याचंही फोटोमध्ये पाहायला मिळत आहे.
Published at : 05 Oct 2025 07:53 PM (IST)
आणखी पाहा
Advertisement
Advertisement
























