Maharashtra Live blog: मोठी बातमी! 2 सप्टेंबरच्या शासन निर्णयाला अंतरिम स्थगिती देण्यास न्यायालयाचा नकार
Maharashtra Live blog updates: राज्यातील आणि देश-विदेशातील ताज्या घडामोडी आणि लेटेस्ट अपडेट्स मिळवण्यासाठी क्लिक करा. महाराष्ट्राच्या राजकारणात नेमकं काय घडतंय?
LIVE

Background
Maharashtra Live blog: वन्य प्राण्यांपासून शेतातील पिकांचं संरक्षण करता यावं, यासाठी शेतीला सोलरवर प्रवाहित विद्युत तारांचं कुंपण करण्यात आलं होतं. मात्र, काल दुपारच्या सुमारास साकोलीत वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसानं हजेरी लावली. यात विद्युत तारा शेतात तुटून पडल्या होत्या. या तारांना स्पर्श झाल्यानं गाईच्या गोऱ्यासह मयलेकाचा मृत्यू झाला. ही घटना भंडारा जिल्ह्याच्या साकोली तालुक्यातील मालूटोला या गावात काल सायंकाळी घडली. वादळी वाऱ्यानं विद्युत तारा शेतात पडून असताना गाईचा गोरा तिथून गेल्यानं त्या तारा स्पर्श झाल्यानं त्याचा मृत्यू झाला. गोरा का निपचित पडला हे बघण्याकरिता गेलेल्या मायलेेकांनाही तुटून पडलेल्या तारांचा स्पर्श झाल्यानं दोघांचाही शेतातचं दुर्दैवी मृत्यू झाला. मात्र, रात्र घेऊनही शेतात गेलेले मायलेक घरी नं आल्यानं कुटुंबीयांनी शेतात जाऊन बघितलं असता ही घटना उघडकीस आली. महानंदा इलमकर (50) आणि सुशील इलमकर (30) असं मृत मायलेकाचं नावं आहे.
मोठी बातमी! 2 सप्टेंबरच्या शासन निर्णयाला अंतरिम स्थगिती देण्यास न्यायालयाचा नकार
2 सप्टेंबरच्या शासन निर्णयाला अंतरिम स्थगिती देण्यास मुंबई उच्च न्यायालयाचा नकार
राज्य सरकारला मोठा दिलासा
मुख्य न्या श्री चंद्रशेखर आणि न्या गौतम अंखड यांच्या खंडपीठाचा निर्वाळा
हैदराबाद गॅझेटियरच्या अंमलबजावणीला मान्यता देणाऱ्या शासन निर्णयाविरोधात मुंबई उच्च न्यायालयास दाखल करण्यात आल्या होत्या याचिका
कुणबी सेना, महाराष्ट्र माळी समाज महासंघ, अहिर सुवर्णकार समाज संस्था, महाराष्ट्र नाभिक महामंडळ आणि सदानंद मंडलिक यांच्याकडून रीट याचिकांच्या माध्यमातून शासन निर्णयाला आव्हान देण्यात आलं आहे.
२ सप्टेंबरचा शासन निर्णय असंवैधानिक असून तो रद्द करण्याची आहे याचिकाकर्त्यांची मागणी