एक्स्प्लोर

क्लिनर अपहरण प्रकरणात दिलीप खेडकरचा जामिनासाठी प्रयत्न; मनोरमा खेडकर सहकार्य करेना, सुनावणी कधी?

दिलीप खेडकरवर अपहरणाचा गंभीर गुन्हा दाखल आहे. तसेच त्याच्याविरोधात यापूर्वी सात गुन्ह्यांची नोंद असल्यामुळे रबाळे पोलिसांकडून जामीनाला तीव्र विरोध केला जाणार आहे. 

Navi Mumbai: क्लीनरच्या अपहरण प्रकरणात गुन्हा दाखल असलेल्या मनोरमा खेडकरने (Manorama Khedkar) पोलिसांना चकवा देत अटकपूर्व जामीन मिळवल्यानंतर आता आरोपी दिलीप खेडकर याने बेलापूर कोर्टात आज जामिनासाठी अर्ज केला आहे . शनिवारी या प्रकरणाची सुनावणी झाली तेव्हा न्यायालयाने हा जामीन देण्यास नकार दिला होता .  

तर दुसरीकडे, या प्रकरणात पहिल्यापासून मनोरमा खेडकर पोलिसांच्या डोक्याचा ताप वाढवत असल्याचेच दिसून आले आहे . क्लीनर अपहरण प्रकरणात मनोरमा खेडकर ने थेट वकिलासोबत न्यायालय गाठत अटकपूर्व जामीन मिळवला होता . आता या प्रकरणाच्या सुनावण्या सुरू असताना मनोरमा खेडकर तपासात सहकार्य करत नसल्याची माहिती पोलिसांकडून देण्यात आली आहे . या प्रकरणाची पुढील सुनावणी 13 ऑक्टोबर रोजी होणार आहे.

आरोपी दिलीप खेडकरचा  जामिनासाठी अर्ज

चर्चेत असलेल्या क्लिनर अपहरण प्रकरणातील आरोपी दिलीप खेडकर याने बेलापूर न्यायालयात जामिनासाठी अर्ज दाखल केला असून, आज या प्रकरणावर पुन्हा सुनावणी होणार आहे. शनिवारी झालेल्या सुनावणीत न्यायालयाने जामीन मंजूर केला नव्हता. या प्रकरणात दिलीप खेडकरवर अपहरणाचा गंभीर गुन्हा दाखल आहे. तसेच त्याच्याविरोधात यापूर्वी सात गुन्ह्यांची नोंद असल्यामुळे रबाळे पोलिसांकडून जामीनाला तीव्र विरोध केला जाणार आहे. 

मनोरमा खेडकर तपासात सहकार्य करेना

दरम्यान, या प्रकरणातील एक महत्त्वाची साक्षीदार मनोरमा खेडकर तपासात सहकार्य करीत नसल्याची माहिती पोलिसांकडून देण्यात आली आहे. पोलिसांनी तिला सकाळी 11 ते संध्याकाळी 6 या वेळेत चौकशीसाठी हजर राहण्याची सूचना दिली होती. मात्र, निर्धारित वेळ संपल्यानंतर ती रबाळे पोलिसांकडे चौकशीसाठी पोहोचली. संध्याकाळी 6 नंतर महिलांची चौकशी करता येत नसल्याने या नियमाचा फायदा घेण्याचा मनोरमा खेडकर हिचा प्रयत्न असल्याचं सूत्रांनी सांगितलं. दरम्यान, या प्रकरणातील मुख्य फिर्यादी प्रल्हाद कुमार भीतीमुळे गावाकडे निघून गेला असल्याची माहिती समोर आली आहे.

दिलीप खेडकरने नवी मुंबईतून एका क्लीनरचे अपहरण केल्यानंतर रबाळे पोलीस तपासासाठी थेट पुण्यातील बाणेर रस्त्यावर असलेल्या खेडकर यांच्या बंगल्यावर पोहोचले होते. त्यावेळी मनोरमा खेडकरने पोलिसांना, "तुम्ही पोलीस स्टेशनला जा, मी नवऱ्याला घेऊन येते," असे आश्वासन दिले होते. पोलिसांनी तिच्या शब्दांवर विश्वास ठेवला. मात्र त्यानंतर दिलीप व मनोरमा खेडकर दोघेही पसार झाले होते.

महत्त्वाच्या बातम्या

देवदर्शनाहून परतणाऱ्या भाविकांच्या बोलेरोला अपघात, स्विफ्ट कारची जोरदार धडक; 12 जखमी, 6 गंभीर
देवदर्शनाहून परतणाऱ्या भाविकांच्या बोलेरोला अपघात, स्विफ्ट कारची जोरदार धडक; 12 जखमी, 6 गंभीर
Mumbai Crime Police: कुंपणानेच शेत खाल्लं! मुंबईत पोलीस कॉन्स्टेबलला ड्रग्ज खरेदी करताना रंगेहाथ पकडलं
कुंपणानेच शेत खाल्लं! मुंबईत पोलीस कॉन्स्टेबलला ड्रग्ज खरेदी करताना रंगेहाथ पकडलं
Jalgaon Crime News: नवरा-बायकोमधील वादानं संतापाचं टोक गाठलं; मुलाने बापाच्या डोक्यात सायकलचा पंप घातला, तर आईनं गळा....; चाळीसगावचं आंबेहोल हादरलं!
नवरा-बायकोमधील वादानं संतापाचं टोक गाठलं; मुलाने बापाच्या डोक्यात सायकलचा पंप घातला, तर आईनं गळा....; चाळीसगावचं आंबेहोल हादरलं!
Mumbai Ghatkoper Landslide: 'ती' भीती अखेर खरी ठरली, घाटकोपर दरड दुर्घटनेतील मृतांची संख्या वाढली, सात जणांचा मृत्यू
'ती' भीती अखेर खरी ठरली, घाटकोपर दरड दुर्घटनेतील मृतांची संख्या वाढली, सात जणांचा मृत्यू

व्हिडीओ

Gatari Pune News: आधी मटण घेणार, मगच ऑफिसला जाणार...; गटारी स्पेशल पुणेकरांचा बेत
Manoj Jarange Mumbai Protest : मनोज जरांगेंची पुन्हा मुंबईकडे कूच? भगवं वादळ मुंबईत घडकणार?
Rahul Gandhi Amit Shah Special Report : संसदेच्या अधिवेशनात विद्यार्थ्यांच्या मुद्यावरुन घमासान
Manoj Jarange Patil Defender Car : 2 कोटींची आलिशान डिफेंडर गाडी कोणाची? मनोज जरांगे काय म्हणाले...
Manoj Jarange Patil Sangli : मराठा आमदार-खासदारांचे फोन; गुपचूप पाठिंबा असल्याचा जरांगेंचा दावा

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
देवदर्शनाहून परतणाऱ्या भाविकांच्या बोलेरोला अपघात, स्विफ्ट कारची जोरदार धडक; 12 जखमी, 6 गंभीर
देवदर्शनाहून परतणाऱ्या भाविकांच्या बोलेरोला अपघात, स्विफ्ट कारची जोरदार धडक; 12 जखमी, 6 गंभीर
व्हर्जिन, ₹2 लाख पगार, 6 फूट उंच हँडसम, स्वयंपाक येणारा, सोशल मीडिया न वापरणारा आणि 24×7 लाईव्ह लोकेशन शेअर करणारा अन् बरंच काही! तरुणीची भावी नवऱ्यासाठी 11 अटींची यादी
व्हर्जिन, ₹2 लाख पगार, 6 फूट उंच हँडसम, स्वयंपाक येणारा, सोशल मीडिया न वापरणारा आणि 24×7 लाईव्ह लोकेशन शेअर करणारा अन् बरंच काही! तरुणीची भावी नवऱ्यासाठी 11 अटींची यादी
Jalgaon Crime News: नवरा-बायकोमधील वादानं संतापाचं टोक गाठलं; मुलाने बापाच्या डोक्यात सायकलचा पंप घातला, तर आईनं गळा....; चाळीसगावचं आंबेहोल हादरलं!
नवरा-बायकोमधील वादानं संतापाचं टोक गाठलं; मुलाने बापाच्या डोक्यात सायकलचा पंप घातला, तर आईनं गळा....; चाळीसगावचं आंबेहोल हादरलं!
शिंदे समितीने 58 लाख नोंदी शोधल्या, पण 37 लाख जुन्याच; बबनराव तायवडेंची माहिती, म्हणाले जरांगेंच्या आंदोलनाशी संबंध नाही
शिंदे समितीने 58 लाख नोंदी शोधल्या, पण 37 लाख जुन्याच; बबनराव तायवडेंची माहिती, म्हणाले जरांगेंच्या आंदोलनाशी संबंध नाही
Mumbai Crime Police: कुंपणानेच शेत खाल्लं! मुंबईत पोलीस कॉन्स्टेबलला ड्रग्ज खरेदी करताना रंगेहाथ पकडलं
कुंपणानेच शेत खाल्लं! मुंबईत पोलीस कॉन्स्टेबलला ड्रग्ज खरेदी करताना रंगेहाथ पकडलं
Marathi Language mandatory for Auto Rickshaw drivers: हिंदी रिक्षावाल्यांना मराठी परीक्षेत कोणते प्रश्न विचारले जातात? व्हायरल व्हिडीओने लक्ष वेधलं, तोडक्यामोडक्या मराठीत मजेशीर उत्तरं
हिंदी रिक्षावाल्यांना मराठी परीक्षेत कोणते प्रश्न विचारले जातात? व्हायरल व्हिडीओने लक्ष वेधलं, तोडकंमोडकं मराठी बोलणाऱ्यांचा VIDEO
Nagpur Accident: मित्राच्या बर्थ डे सेलिब्रेशनला जाताना भरधाव कारचा भीषण अपघात; उभ्या ट्रकला जोरदार धडक, कारचा अक्षरशः चेंदामेंदा, अल्पवयीन दोघांचा जागीच मृत्यू
मित्राच्या बर्थ डे सेलिब्रेशनला जाताना भरधाव कारचा भीषण अपघात; उभ्या ट्रकला जोरदार धडक, कारचा अक्षरशः चेंदामेंदा, अल्पवयीन दोघांचा जागीच मृत्यू
Sanjay Raut: संजय राऊत म्हणाले, ठाण्यातून एकनाथ शिंदेंच्या तक्रारींचे नेतृत्व नरेश म्हस्के करत होते, मनपात भ्रष्टाचार कसा सुरुय सांगत होते, आमच्याकडे पत्रे, आता संतापलेल्या म्हस्केंनी केला मोठा खुलासा!
संजय राऊत म्हणाले, ठाण्यातून एकनाथ शिंदेंच्या तक्रारींचे नेतृत्व नरेश म्हस्के करत होते, मनपात भ्रष्टाचार कसा सुरुय सांगत होते, आमच्याकडे पत्रे, आता संतापलेल्या म्हस्केंनी केला मोठा खुलासा!
Embed widget