Dharmaraj Kadadi यांना गोळ्या घालण्याच्या धमकीप्रकरणी उत्तर देण्यासाठी 10 दिवसांची मुदत
Dharmaraj Kadadi यांना गोळ्या घालण्याच्या धमकीप्रकरणी उत्तर देण्यासाठी 10 दिवसांची मुदत
भर रस्त्यात बंदूक दाखवत गोळ्या घालायची धमकी दिल्याप्रकरणी धर्मराज काडादी यांना पोलिसांची नोटीस. बंदुकीचा परवाना रद्द करण्यात का येऊ नये नोटीसद्वारे विचारणा. उत्तर देण्यासाठी दहा दिवसांची मुदत. भर रस्त्यात बंदूक काढून गोळ्या घालायची धमकी दिल्याप्रकरणी सिद्धेश्वर साखर कारखान्याचे मार्गदर्शक धर्मराज काडादी यांना पोलिसांनी नोटीस बजावलीेय. स्वसंरक्षणासाठी दिलेली बंदुक सार्वजनिक ठिकाणी बाहेर काढून धमकावल्याचा ठपका काडादी यांच्यावर आहे... दरम्यान बंदुकीचा परवाना रद्द करण्यात का येऊ नये अशी विचारणा या नोटीसद्वारे करण्यात आलीये.. धर्मराज काडादी यांना उत्तर देण्यासाठी दहा दिवसांची मुदत देण्यात आलीेय.. सिद्धेश्वर सहकारी साखर कारखान्याच्या चिमणीविरोधात जिल्हाधिकारी कार्यालयासमोर अनेक दिवसांपासून आंदोलन सुरू आहे. .यावेळी धर्मराज काडादी यांनी आंदोलनस्थळी येऊन केतन शहांना थेट गोळ्या घालण्याची धमकी दिली होती आणि धर्मराज काडादी यांनी बंदूक दाखवतानाचा व्हिडिओ व्हायरल झाला होता.