Manoj Jarange Patil : सातारा,मिरज,कोल्हापूर संस्थानचे गॅझेटिअर लागू करा अन्यथा, मनोज जरांगेंचा इशारा
Manoj Jarange Patil : सातारा,मिरज,कोल्हापूर संस्थानचे गॅझेटिअर लागू करा अन्यथा, मनोज जरांगेंचा इशारा
सातारा संस्थान,मिरज आणि कोल्हापूर संस्थानचे गॅझेटर लागू करण्यासाठी पश्चिम महाराष्ट्रात बैठका घेणार आहे.
पुढच्या महिन्यात सोलापुरात पहिली बैठक घेतली जाणार आहे.
सरकारने त्यापूर्वी पश्चिम महाराष्ट्रात सातारा गॅझेटिअर लागू करावे अन्यथा आंदोलन केले जाईल असा इशारा मराठा आरक्षण आंदोलन मनोज जरांगे पाटील यांनी दिला आहे.
राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत आंदोलन करणार असे सांगितले आहे. मी बैठकीला सुरुवात करणार आहे.
सातारा संस्थानच्या गॅझेटिअर मध्ये 15 लाख नोंदी आहेत. त्यामुळे पश्चिम महाराष्ट्रातील सुमारे 42 लाख मराठा समाजाला आरक्षणाचा लाभ होणार आहे.
स्वर्गीय अजितदादा पवार यांच्या अपघाताच्या चौकशीची मागणी जर कुटुंबाची असेल तर चौकशी केली पाहिजे अशी मागणी मनोज जरांगे पाटील यांनी यावेळी केली. अशा घटनेनंतर मात्र मराठा समाजाने सावध राहिले पाहिजे.
सारथी आणि अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाबाबत आंदोलन उभा करावी लागेल असा इशारा त्यांनी दिला.
























