Sanju Samson News : टीम व्यवस्थापनेला नको असलेल्या संजू सॅमसनची तुफानी खेळी! वाघानं भारताला सेमी फायनलमध्ये पोहोचवलं, सूर्याचा वाकून नमस्कार
India beat West Indies T20 World Cup 2026 : वेस्ट इंडिजविरुद्धच्या 'करो किंवा मरो' अशा अटीतटीच्या सामन्यात संजूने केवळ बॅट चालवली नाही, तर आपल्या टीकाकारांना चोख प्रत्युत्तरही दिलं.

Sanju Samson lead India to Semi-Final : जेव्हा नशीब वारंवार हुलकावणी देत असते, तेव्हाच खऱ्या नायकाचा जन्म होतो. संजू सॅमसनच्या बाबतीत हेच घडलं... वेस्ट इंडिजविरुद्धच्या 'करो किंवा मरो' अशा अटीतटीच्या सामन्यात संजूने केवळ बॅट चालवली नाही, तर आपल्या टीकाकारांना चोख प्रत्युत्तरही दिलं. संजूच्या या खेळीने केवळ टीकाकारांची तोंडे बंद केली नाहीत, तर खुद्द कर्णधार सूर्यकुमार यादवलाही त्याला मैदानावर वाकून नमन करायला भाग पाडले. त्याच्या नाबाद 97 धावांच्या जोरावर भारताने टी-20 विश्वचषकाच्या इतिहासातील सर्वात मोठ्या लक्षाचा यशस्वी पाठलाग केला आणि दिमाखात उपांत्य फेरीत प्रवेश केला. आता भारताची लढत इंग्लंडशी होणार आहे.
BIG occasion 🤝 BIG knock
— BCCI (@BCCI) March 1, 2026
Sanju Samson is adjudged the Player of the Match at the Eden Gardens ✨
Scorecard ▶️ https://t.co/ur4pr8Bi3K#TeamIndia | #T20WorldCup | #MenInBlue | #INDvWI | @IamSanjuSamson pic.twitter.com/tmKNBWbFNA
संघर्षातून सावरलेला 'संजू'
संजू सॅमसनचा या विश्वचषकापर्यंतचा प्रवास एखाद्या रोलर-कोस्टर राईडसारखा राहिला आहे. कधी अभिषेक शर्माचे पुनरागमन, तर कधी ईशान किशनला मिळालेली पसंती... संजूचे संघातील स्थान नेहमीच टांगत्या तलवारीसारखे होते. मात्र, जेव्हा ईडन गार्डन्सवर भारताचे भवितव्य पणाला लागले होते, तेव्हा संजूने मैदानात पाय रोवले आणि शेवटपर्यंत तो हलला नाही.
संजूने अवघ्या 50 चेंडूत नाबाद 97 धावा केल्या. ही धावसंख्या विश्वचषकातील यशस्वी पाठलाग करताना कोणत्याही भारतीय फलंदाजाने केलेली सर्वोच्च धावसंख्या ठरली आहे. तसेच 195 धावांचे डोंगरासारखे लक्ष्य पार करताना भारताने टी-20 विश्वचषक इतिहासातील आपला सर्वात मोठा यशस्वी पाठलाग नोंदवला.
या विजयामुळे भारताचा आत्मविश्वास उंचावला असून आता सेमीफायनलमध्ये इंग्लंडशी गाठ पडणार आहे. संजूच्या या खेळीने हे सिद्ध केले आहे की, संघात येण्याऱ्याण्याच्या चक्रात अडकलेला हा खेळाडू मोठ्या सामन्याचा मोठा खेळाडू आहे.
सूर्याचा आज वाकून नमस्कार
संजूने सामना जिंकवल्यानंतर सूर्यकुमार यादवने दिलेली प्रतिक्रिया सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. आपल्या सहकाऱ्याची मेहनत आणि टॅलेंट पाहून सूर्याने भर मैदानात संजूला वाकून नमस्कार केला. कर्णधाराने दिलेल्या या सन्मानामुळे संजू सॅमसनच्या संघातल्या स्थानाबद्दल आता चर्चांना पूर्णविराम मिळण्याची शक्यता आहे.
📸📸
— BCCI (@BCCI) March 1, 2026
A memorable night at Eden Gardens 🥳#TeamIndia register their highest successful chase in ICC Men's T20 World Cups ✅
Scorecard ▶️ https://t.co/ur4pr8Bi3K#T20WorldCup | #MenInBlue | #INDvWI pic.twitter.com/lEpN4LIWXU
हे ही वाचा -





















