एक्स्प्लोर

Ali Reza Arafi : खामेनींच्या हत्येनंतर इराणचा सर्वोच्च नेता ठरला, कोण आहेत धर्मगुरू अली रेजा अराफी? 

Israel Iran Conflict :  खामेनी यांच्या हत्येनंतर इराणचं नेतृत्व एका धर्मगुरू आणि मदससा व्यवस्थेचे प्रमुख असलेल्या नेत्याकडे सोपवण्यात आलं आहे. 

Israel Iran War : अमेरिका आणि इस्त्रायलच्या संयुक्त हल्ल्यात इराणचे सर्वोच्च नेते अयातोल्ला अली खामेनी यांचा मृत्यू झाल्यानंतर आता नव्या नेतृत्वाच्या हाती सत्ता हस्तांतर करण्यात आली आहे. खामेनी यांच्या निधनानंतर इराणने वरिष्ठ धर्मगुरू अयातोल्लाह अली रेजा अराफी यांची अंतरिम सर्वोच्च नेते म्हणून नियुक्ती केली आहे. संविधानानुसार नव्या सर्वोच्च नेत्याची निवड होईपर्यंत अंतरिम नेतृत्व परिषद देशाची जबाबदारी सांभाळणार आहे.

अंतरिम नेतृत्व परिषद काय आहे? (Interim Leadership Council Structure)

इराणच्या संविधानानुसार सर्वोच्च नेत्याच्या निधनानंतर राष्ट्रपती, मुख्य न्यायाधीश आणि गार्डियन कौन्सिलमधील एक धर्मगुरू यांचा समावेश असलेली परिषद तात्पुरती सत्ता सांभाळते. ही परिषद महत्त्वाचे धोरणात्मक आणि लष्करी निर्णय घेते. अंतिम निर्णय मात्र 88 सदस्यीय ‘असेंब्ली ऑफ एक्स्पर्ट्स’ घेते, ज्यांच्याकडे देशाच्या राजकीय आणि लष्करी व्यवस्थेवर सर्वोच्च अधिकार आहेत.

अली रेजा अराफी कोण आहेत? (Who is Ali Reza Arafi)

67 वर्षीय अली रेजा अराफी यांचा जन्म 1959 मध्ये झाला. ते सध्या असेंब्ली ऑफ एक्स्पर्ट्सचे उपाध्यक्ष आहेत. 2029 मध्ये ते गार्डियन कौन्सिलचे सदस्य होते. ही संस्था निवडणूक उमेदवारांची छाननी आणि संसदेत मंजूर कायद्यांचे पुनरावलोकन करते. अराफी हे देशातील इस्लामी मदरसा व्यवस्थेचे प्रमुख मानले जातात. त्यांनी अल-मुस्तफा आंतरराष्ट्रीय विद्यापीठाचे नेतृत्वही केले असून तेथे देश-विदेशातील धर्मगुरूंना प्रशिक्षण दिले जाते.

खामेनी यांच्या मृत्यूनंतर तणाव वाढला (Iran Tensions After Khamenei Death)

खामेनी यांच्या मृत्यूनंतर इराणमध्ये 40 दिवसांच्या राष्ट्रीय दुखवट्याची घोषणा करण्यात आली आहे. इस्त्रायल-अमेरिकेच्या हल्ल्यात त्यांच्या कुटुंबातील चार सदस्यांचाही मृत्यू झाल्याची माहिती देण्यात आली आहे. तेहरानमध्ये मोठ्या प्रमाणावर सुरक्षा व्यवस्था तैनात करण्यात आली असून या हल्ल्याचा बदला घेण्याच्या घोषणा करण्यात आली आहे.

ट्रम्प यांची कठोर भूमिका (Trump Military Statement)

अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणविरुद्धचे लष्करी अभियान सुरूच राहील, असे स्पष्ट केले आहे. शांतता प्रस्थापित होईपर्यंत अचूक आणि तीव्र बॉम्बहल्ले सुरू राहतील, असे त्यांनी म्हटले आहे. तसेच इराणच्या इस्लामिक रिव्होल्यूशनरी गार्ड कॉर्प्स, सशस्त्र सेना आणि पोलिस दलाला शस्त्रे खाली ठेवण्याचे आवाहनही त्यांनी केले आहे.

या घडामोडींमुळे मध्यपूर्वेतील परिस्थिती अधिकच तणावपूर्ण बनली असून जागतिक राजकारणात मोठे बदल होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. 

ही बातमी वाचा:

महत्त्वाच्या बातम्या

पायलट नशेत होता, एअर इंडियाच्या दिल्ली-फुकेट विमानातील कॅप्टन इन कमांडची दुसरी डोप टेस्टही पॉझिटीव्ह
पायलट नशेत होता, एअर इंडियाच्या दिल्ली-फुकेट विमानातील कॅप्टन इन कमांडची दुसरी डोप टेस्टही पॉझिटीव्ह
इराणकडून जीविताला धोका, डोनाल्ड ट्रम्प यांचा चकवा, तुर्कीतून नाट्यमयरित्या पलायन, एका विमानातून दुसऱ्या विमानात कसे गेले? 
इराणकडून जीविताला धोका, डोनाल्ड ट्रम्प यांचा चकवा, तुर्कीतून नाट्यमयरित्या पलायन, एका विमानातून दुसऱ्या विमानात कसे गेले? 
Colombia Earthquake : कोलंबियात 7.4 रिश्टर स्केलचा विनाशकारी भूकंप; 20 जणांचा मृत्यू, अनेक इमारती कोसळल्या, परिस्थिती बिकट
कोलंबियात 7.4 रिश्टर स्केलचा विनाशकारी भूकंप; 20 जणांचा मृत्यू, अनेक इमारती कोसळल्या, परिस्थिती बिकट
AI Virus: चक्क AI ने बनवला नवा व्हायरस! वैद्यकीय क्षेत्रात क्रांतीची आशा, पण भविष्यातील धोक्याने जग चिंताक्रांत
चक्क AI ने बनवला नवा व्हायरस! वैद्यकीय क्षेत्रात क्रांतीची आशा, पण भविष्यातील धोक्याने जग चिंताक्रांत

व्हिडीओ

Manoj Jarange Mumbai Protest : मनोज जरांगेंची पुन्हा मुंबईकडे कूच? भगवं वादळ मुंबईत घडकणार?
Rahul Gandhi Amit Shah Special Report : संसदेच्या अधिवेशनात विद्यार्थ्यांच्या मुद्यावरुन घमासान
Manoj Jarange Patil Defender Car : 2 कोटींची आलिशान डिफेंडर गाडी कोणाची? मनोज जरांगे काय म्हणाले...
Manoj Jarange Patil Sangli : मराठा आमदार-खासदारांचे फोन; गुपचूप पाठिंबा असल्याचा जरांगेंचा दावा
Manoj Jarange On Maratha Protest: मराठा समाजाचा पुन्हा एकदा मुंबईकडे कूच करण्याचा विचार; मनोज जरांगे काय काय म्हणाले?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Dombivli Shastrinagar Hospital : पालकांची परवानगी न घेता 17 वर्षीय मुलीच्या गर्भधारणा तपासणीवरून गोंधळ; पालिका रुग्णालयात तीन वेळा रिपोर्ट पॉझिटिव्ह तर खासगीत निगेटिव्ह!
पालकांची परवानगी न घेता 17 वर्षीय मुलीच्या गर्भधारणा तपासणीवरून गोंधळ; पालिका रुग्णालयात तीन वेळा रिपोर्ट पॉझिटिव्ह तर खासगीत निगेटिव्ह!
शासकीय वाहनांसाठी VIP नंबर घेण्यावर अखेर बंदी; अर्थ खात्याचा आदेश जारी, मुख्यमंत्र्यांनी अधिकाऱ्यांचे कान टोचले
शासकीय वाहनांसाठी VIP नंबर घेण्यावर अखेर बंदी; अर्थ खात्याचा आदेश जारी, मुख्यमंत्र्यांनी अधिकाऱ्यांचे कान टोचले
Navi Mumbbai : 15 लाखांची लाच मागितली, आठ लाख स्वीकारले; GST उपायुक्तावर गुन्हा दाखल
15 लाखांची लाच मागितली, आठ लाख स्वीकारले; GST उपायुक्तावर गुन्हा दाखल
Gatari Amavasya News : 'जास्त गटार-बिटारात लोळू नका'; गटारीच्या शुभेच्छा देत शिंदेंच्या मंत्र्यांचा कार्यकर्त्यांना अजब सल्ला
'जास्त गटार-बिटारात लोळू नका'; गटारीच्या शुभेच्छा देत शिंदेंच्या मंत्र्यांचा कार्यकर्त्यांना अजब सल्ला
तब्बल 98 लाख रुपयांच्या बनावट नोटांचा साठा जप्त; एकाला अटक, 30 लाखांच्या बदल्यात 1 कोटींचा भाव
तब्बल 98 लाख रुपयांच्या बनावट नोटांचा साठा जप्त; एकाला अटक, 30 लाखांच्या बदल्यात 1 कोटींचा भाव
Bharat Gogawale : रायगडच्या पालकमंत्रिपदी भरत गोगावलेंची बाजी? आजच नाव जाहीर होणार, गोगावलेंचा मोठा दावा
रायगडच्या पालकमंत्रिपदी भरत गोगावलेंची बाजी? आजच नाव जाहीर होणार, गोगावलेंचा मोठा दावा
तुकाराम मुंढेंचा मोर्चा बस स्थानकांकडे; संभाजीनगर जिल्ह्यात FDA ची कारवाई, सिल्लोडमधील कँटीन सील
तुकाराम मुंढेंचा मोर्चा बस स्थानकांकडे; संभाजीनगर जिल्ह्यात FDA ची कारवाई, सिल्लोडमधील कँटीन सील
पायलट नशेत होता, एअर इंडियाच्या दिल्ली-फुकेट विमानातील कॅप्टन इन कमांडची दुसरी डोप टेस्टही पॉझिटीव्ह
पायलट नशेत होता, एअर इंडियाच्या दिल्ली-फुकेट विमानातील कॅप्टन इन कमांडची दुसरी डोप टेस्टही पॉझिटीव्ह
Embed widget