एक्स्प्लोर
Sangli 'Mulshi Pattern' : सांगलीच्या बामणोलीमध्ये सराईत गुन्हेगाराची हत्या
भर रस्त्यात पाठलाग करून खून करण्याची दुसरी घटना सांगली जिल्ह्यात घडली आहे. सराईत गुन्हेगाराचा पाठलाग करत सांगलीच्या कुपवाड जवळच्या बामणोली येथे निर्घृण खून करण्यात आला आहे. अमर उर्फ गुट्ट्या जाधव असं मृत गुन्हेगाराचं नाव आहे. मात्र हा खून कोणत्या कारणातून झाला हे स्पष्ट होऊ शकले नाही. रात्री दहाच्या सुमाराला ही घटना घडली.. मृत अमर जाधव हा आपल्या दुचाकीवरून कुपवाड नजीक असणाऱ्या बामनोली येथील आपल्या घरी निघाला होता. दुचाकीवरून हल्लेखोर आले, आणि काही कळायच्या आत त्याच्यावर कोयत्यानं वार सुरू केले. कुपवाड एमआयडीसी पोलिसांनी हल्लेखोरांना पकडण्यासाठी अनेक पथकं तयार केली आहेत..
आणखी पाहा























