Pune Heavy Rain : पुण्यात पूरस्थिती गाड्या पाण्याखाली मात्र यंत्रणा अजूनही सज्ज नाही : माधुरी मिसाळ
Pune Heavy Rain : पुण्यात पूरस्थिती पाणी साचलं, गाड्या घरं पाण्याखाली मात्र यंत्रणा अजूनही सज्ज नाही : माधुरी मिसाळ
Pune Rain Eknath Shinde Updates: पुण्यात मुसळधार पावसामुळे (Pune Heavy Rain)अनेक रस्त्यांना नद्यांचं स्वरुप आलं आहे. अनेकांच्या घरात पाणी शिरलं आहे. तर काही भागात जनजीवन देखील विस्कळीत झाल्याचं पाहायला मिळत आहे. लोकांना सुरक्षित ठिकाणी हलवण्यासाठी प्रशासन कामाला लागलं आहे. याचदरम्यान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी 'एबीपी माझा'शी बोलताना नागरिकांना आवाहन केलं आहे. सर्व नागरिकांनी काळजी घ्यावी, लोकांनी घाबरण्याचे कारण नाही. सर्व अधिकाऱ्यांना फिल्डवर उतरण्याचे आदेश देण्यात आले आहेत. त्यामुळे नागरिकांना लवकरच दिलासा मिळेल, असं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले. पुण्याचे जिल्हाधिकारी, पुणे महानगरपालिकेचे आयुक्त, एनडीआरएफ आणि लष्कराचे कर्नल यांच्याशी मी बोललो आहे. तसेच याआधीच त्यांनी एनडीआरफच्या बोटी वैगरे रवाना केल्या आहेत. लष्कर देखील आता पुण्यात पोहचते आहे. तसेच वेळ पडल्यास बचावकार्यासाठी हेलिकॉप्टरची मदत घेतली जाईल, असं एकनाथ शिंदे यांनी 'एबीपी माझा'शी बोलताना सांगितले