Mumbai - Pune Express Way वरील कोंडी सोडवण्यासाठी पोलिसांची युक्ती, 15 मिनिटांमध्ये मार्ग खुला
मुंबई-पुणे एक्सप्रेस वेवर सुट्ट्यांच्या दिवशी प्रत्येकाला वाहतूक कोंडीचा सामना करावा लागतो. सुट्टीच्या दिवशी मार्ग मोकळा करण्यासाठी पोलिसांची नवी युक्ती लढवलीये. वाहतूक कोंडीची ही समस्या मुख्यत: शनिवारी आणि रविवारी उद्भवते. गेले दोन आठवडे तर या मार्गावरील वाहतूककोडींने वाहनचालक, प्रवासी हैराण झाले होते. दोन आठवड्यांपासून सुट्टीच्या दिवशी मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावर पाच ते सात किलोमीटरच्या वाहनरांगा होत्या. त्यावर तातडीचा उपाय म्हणून महामार्ग पोलिसांनी मुंबईकडील मार्गिकेवर १५ मिनिटांचा ब्लॉक घेण्यात आला. आणि या ब्लॉकनंतर वाहतूक कोंडीचा प्रश्नच सुटला. मुंबईकडे येणारी मार्गिका बंद करून पुण्याकडे जाणाऱ्या वाहनांसाठी सहा मार्गिका खुल्या केल्या गेल्या. त्यामुळे १५ मिनिटांत सुमारे १,५०० वाहनांना मोकळा मार्ग मिळाला. या उपाययोजनेमुळे वाहतूक कोंडीचा प्रश्न सुटत असल्याचे पोलिसांनी सांगितले.