Rohit Pawar On Nawab Malik : यूपीमध्ये ईडीच्या अधिकाऱ्याला भाजपने तिकीट दिलं, रोहित पवार यांचा आरोप
रोहित पवार काय म्हणाले?
Rohit Pawar : अनेक कागदपत्र दाखवली आहेत, कदाचित त्यामुळेच ईडीची कारवाई झाली असेल. अजून एक महतत्वाचं म्हणजे यूपीमध्ये निवडणुकीचा टप्पा सुरु आहे, त्यामध्ये भाजपचे मौर्यासारखे मोठे नेते, त्यांचं ते कार्यक्षेत्र आहे, गेल्या अनेक टप्प्यात सपाला जो प्रतिसाद मिळतोय, आणि भाजपचे छोटे नेते भाजपला सहकार्य करत नाहीत असं दिसतंय.. भाजपला एक संदेश यूपीच्या नेत्यांना द्यायचा असेल महाराष्ट्रात कॅबिनेट मंत्र्याला आम्ही ताब्यात घेऊ शकतो, त्यामुळे आमचं ऐका असा संदेश यूपीच्या नेत्यांना द्यायचा असेल..
मलिक साहेबांननी महाराष्ट्रातील ड्रग रॅकेट उघडकीस आणलं, भाजपचे काही पदाधिकारी उघडकीस आले, गुजरातमध्ये 22 हजार कोटीपेक्षा ड्रग अधिकृत सापडलं. इथं उघडलेलं रॅकेट गुजरातपर्यंत जाईल असं वाटलं असेल त्यामुळे कारवाई झाली असेल, आज संध्याकाळी मलिकसाहेब बाहेर आल्यानंतर सविस्तर माहिती मिळेल
यूपीमध्ये ईडीचे सिंग नावाचे अधिकारी होते, मोठ्या केस बघत होते, त्यांना भाजपने तिकीट दिलं आहे,त्यामुळे सत्तेत असताना, पदावर असताना आम्ही सांगू ते करा, निवृत्तीनंतर आम्ही पुनर्वसन करु असा संदेश भाजपचा आहे.
चंद्रकांत पाटील राज्यात की केंद्रात बदल होईल याबाबत माहिती नाही. उत्तर प्रदेशात नक्की बदल होईल, त्यांचे पडसाद केंद्रात उमटतील. यापूर्वी चंद्रकांत पाटील साहेबांनी यापूर्वी अनेकवेळा आकाशवाणी केली आहे, तीन महिने म्हणता म्हणता तीन वर्षे महाविकास आघाडीची झाली.
लोकशाहीसाठी ही धोक्याची घंटा आहे. एखाद्या मंत्र्याला नोटीस न देता ताब्यात घेणं हे लोकशाहीसाठी घातक. महापालिका निवडणूक लागणार आहे, मलिकसाहेब मुंबई राष्ट्रवादी अध्यक्ष आहे. हानी करुन फायदा करुन घ्यायचा हा भाजपचा हेतू आहे. मलिकसाहेब संध्याकाळी आपली भूमिका मांडतील .