(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Nashik Manmad Drought : पिण्याच्या पाण्यासाठी वणवण, हातपंपाजवळच करावा लागतोय मुक्काम
Nashik Yeola Drought : पिण्याच्या पाण्यासाठी वणवण, हातपंपाजवळच करावा लागतोय मुक्काम
येवला, नाशिक – दुष्काळाचा दाह सोसवेना..जलस्रोत कोरडे ठाक. येवल्यात ११८ गाव वाड्यांना ५६ टँकरच्या माध्यमातून केला जातोय पाणीपुरवठा..हंडाभर पाण्यासाठी हातपंपाजवळ ठोकावा लागतो मुक्काम.. स्टोरी आली आहे.
राज्यातील इतर जिल्ह्यांमध्ये काय परिस्थिती?
धाराशिव : दुष्काळामुळे पाणी साठा कमी झाला त्यात 21% पाणीसाठा दूषित असल्याने पिण्याच्या पाण्याचे मोठे संकट..जिल्ह्यातील अकराशे दोन स्त्रोताच्या नमुन्याची तपासणी केल्यानंतर 21% दूषित असल्याचे झाले उघड निर्जंतुकीरण करून पाणी वापरण्याचा प्रशासनाचा सल्ला.
येवला, नाशिक : दुष्काळाचा दाह सोसवेना..जलस्रोत कोरडे ठाक. येवल्यात ११८ गाव वाड्यांना ५६ टँकरच्या माध्यमातून केला जातोय पाणीपुरवठा..हंडाभर पाण्यासाठी हातपंपाजवळ ठोकावा लागतो मुक्काम.
भंडारा - प्रखर उष्णतेत भंडारा जिल्ह्यातील शेकडो तलाव कोरडे पडण्याच्या मार्गावर आहेत. याचा फटका ग्रामीण नागरिकांना बसत आहे. ग्रामीण भागासह जंगलातीलही तलावांची हीच परिस्थिती आहे.
नवेगाव - नागझिरा व्याघ्र प्रकल्पाचे जंगल सफरीचे प्रवेशद्वार ज्या पिटेझरी गावात आहे, तेथील तलावाने कधीचाच तळ गाठला आहे. पिटेझरीचा हा तलाव अगदी निसर्गाच्या सानिध्यात आहे. चारही बाजूंनी जंगल आणि टेकळ्यांच्या मधोमध हा तलाव असल्यानं येथे मोठ्या प्रमाणात वन्य प्राणी आणि विवध प्रजातींचे पक्षी जलविहरासाठी येत असे. मोठ्या प्रमाणात वन्यजीव बघायला आणि त्यांच्या आवाज, किलबिलाट ऐकायला मिळत असल्याने वन्यजीव अभ्यासकांची या तलाव परिसरात कधीकाळी बरीच गर्दी राहत असे. मात्र, आता तलावात पाणी नसल्यानं वन्य प्राणी आणि पक्षांचे थवेही बघायला मिळत नसल्याने पशूपक्षी अभ्यासक मित्रही याकडे भटकत नाहीत. तलाव कोरडे पडल्याने इथं वन्य प्राणी किंवा पक्षीही दिसून येत नाही.