एक्स्प्लोर
Nanded Police Bharati : पोलीस भरतीसाठी उमेदवाराने शारिरीक चाचणीत पात्र ठरण्यासाठी घेतलं इंजेक्शन
नांदेडमधून धक्कादायक बातमी येतेय. पोलीस भरतीसाठी आलेल्या उमेदवाराने शारिरीक चाचणीत पात्र ठरण्यासाठी उत्तेजित इंजेक्शन घेतल्याचं उघड झालंय. मैदानी चाचणीच्या आधी जाऊन एका तरुणाने उत्तेजित करणारं इंजेक्शन घेतलंय. . दरम्यान, ही इंजेक्शन्स जप्त करण्यात आली असून तरुणालाही चौकशीसाठी ताब्यात घेतलंय. काही जिमनॅस्ट कडून मसल बिल्टअप साठी हे इंजेक्शन वापरलं जातं. यामुळे अधिक उर्जा मिळून मैदानी कामगिरीत सुधारणा होईल या अपेक्षेने हे इंजेक्शन घेतल्याचं पुढे आलंय.
आणखी पाहा























