Saffron Project : सॅफ्रनचा देखील महाराष्ट्रातून काढता पाय, नागपूरच्या मिहानऐवजी हैदराबादमध्ये होणार
विमान व रॉकेटचे इंजिन बनवणारी फ्रान्सची बहुराष्ट्रीय कंपनी सॅफ्रनने देखील महाराष्ट्रातून काढता पाय घेतलाय.. हा विमान इंजिन दुरुस्ती देखभाल प्रकल्प नागपूरच्या मिहानऐवजी हैदराबादमध्ये होणार आहे, त्यामुळे वेदांता फोस्ककॉन, बल्क ड्रम, मेडिकल डीवन पार्क, एअरबस पाठोपाठ रोज नवनवीन प्रकल्प महाराष्ट्राच्या बाहेर जाताना दिसत आहे. बाहेर जाण्याऱ्या प्रकल्पांची ही यादी वाढत जात असल्याने महाराष्ट्रात काहीसं चिंतेचे वातावरण पाहायला मिळत आहे. या प्रकल्पाच्या माध्यमातून 1,115 कोटींची गुंतवणूक होणार होती. कंपनीच्या सीईओंनी संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांची भेट घेऊन हा प्रकल्प हैदराबादला हलवण्याची माहिती दिली. महत्वाचं म्हणजे राज्यातील सत्तानाट्याच्या काळातच सॅफ्रन प्रकल्प हैदराबादमध्ये करण्यावर निश्चिती झाल्याची माहिती समोर आली आहे.























