एक्स्प्लोर

Weather Update: नाशिकसह उत्तर महाराष्ट्रात थंडीचा यलो अलर्ट; राज्यात पारा आणखी घसरणार; हवामान विभागाकडून हायअलर्ट, तुमच्या जिल्ह्यात काय परिस्थिती?

Weather Update: पुणे 8.1 अंशावर तर नाशिकचा पारा 8.2 परभणीत तापमान 5.5 अंश सेल्सिअसवर; थंडीची लाट कायम राहणार, हवामान विभागाकडून हायअलर्ट, तुमच्या जिल्ह्यात काय परिस्थिती जाणून घ्या सविस्तर

पुणे : राज्याच्या अनेक भागात पारा घसरायला सुरूवात झाली आहे. तर विदर्भ आणि मराठवाड्यातील तापमानाचा पारा हा 6 अंशांहून कमी झाल्याचं दिसून येत आहे. भारतीय हवामान विभागाने (Weather update) दिलेल्या ताज्या माहितीनुसार, राज्यात थंडीचा जोर वाढणार आहे. मध्य भारत आणि उत्तर भारतामध्ये कोल्ड वेवची स्थिती कायम राहणार असून, यामध्ये महाराष्ट्रातील विदर्भ, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्याच्या अनेक भागांत थंडीची लाट आणखी तीव्र होण्याची शक्यता आहे. (Weather update)

Weather Update: पुण्यात थंडीची लाट येण्याचा हवामान खात्याचा अंदाज

पुणे शहराचे तापमान 8.1 अंशावर घसरले आहे. यंदाचा हंगामात सर्वात कमी तापमानाची नोंद झाली असून पुण्यात थंडीची लाट येण्याचा हवामान खात्याचा अंदाज आहे. शहराच्या बाकी भागात तापमान 10-12 अंशावर स्थिर आहे. मात्र पुण्यातील तापमान शिवाजी नगर 8.9 अंश सेल्सिअसवर आले आहे. पाषाणमधील तापमान 8.4 अंश सेल्सिअस इतके आहे. (Weather update)

Weather Update: निफाडचे तापमान 6.1 अंश सेल्सिअस तर नाशिकचा पारा 8.2 

तर नाशिक आणि निफाडमध्ये थंडीचा मुक्काम कायम आहे. नाशिकसह उत्तर महाराष्ट्र मध्ये थंडीचा यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. निफाडचे तापमान 6.1 अंश सेल्सिअस तर नाशिकचा पारा 8.2 अंशावर गेला आहे. पुढील दोन तीन दिवस थंडी कायम राहण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. (Weather update)

Weather Update: सकाळच्या सत्रात तीव्र थंडी 

नागपुरात आज या मोसमातील दुसऱ्या निचांकी तापमानाची नोंद झाली आहे. नागपुरात आज 8.1 डिग्री सेल्सियस एवढ्या किमान तापमानाची नोंद झाली आहे. काल नागपुरात 8 डिग्री सेल्सिअस किमान तापमान होता, जो या मोसमातील सर्वात निचांकी तापमान होते, त्यामुळे आजचा किमान तापमान या मोसमातील दुसरा निचांकी तापमान आहे. विधिमंडळ परिसरात आपापल्या कामासाठी महाराष्ट्रातील वेगवेगळ्या भागातून आलेल्या लोकांना सकाळच्या सत्रात तीव्र थंडीचा सामना करावा लागत आहे. त्यामुळे बहुतांशी लोक विधिमंडळाच्या समोरील भागात उन्हामध्ये उभे राहणं पसंत करत आहे. तर भंडाऱ्यात किमान तापमान 12 अंश सेल्सिअस अतके आहे, तर बुलढाण्यात 12.2 अंश इतके तापमान आहे, गोंदियामध्ये आजचे तापमान 8.4 अंश सेल्सिअस इतके आहे, तर परभणीचे तापमान 5.5 अंश सेल्सिअस इतके आहे.

Weather Update: कोकणातील मिनी महाबळेश्वर गारठले

कोकणातील मिनी महाबळेश्वर गारठलं आहे. दापोलीमध्ये थंडीची लाट पसरली आहे. तापमानाचा पारा सात अंश सेल्सिअसवरती आला आहे. उत्तर रत्नागिरीतील चिपळूण गुहागर आणि खेडमध्ये देखील प्रचंड थंडी पडली आहे. नागरिक शेकोटीचा आधार घेत आहेत. अहिल्यानगरमध्ये तापमान 7.5 अंश सेल्सिअस इतके आहे.

तर हवामान विभागाच्या अंदाजानुसार, राज्यातील किमान तापमानाचा पारा आणखी खाली घसरण्याची शक्यता आहे. मध्य महाराष्ट्रात किमान तापमानात पुढील तीन दिवसांत हळूहळू 2 ते 3 अंश सेल्सिअसने घट होण्याची शक्यता देखील हवामान विभागाने वर्तवली आहे. मात्र, यानंतर लगेचच पुढील दोन ते तीन दिवसांत तापमानात 2 ते 3 अंश सेल्सिअसने वाढ होण्याची शक्यताही वर्तवण्यात आली आहे.

Weather Update: राज्यातील तापमानाची आकडेवारी

रत्नागिरी - १७.६ 
संभाजीनगर - १०.८ 
कोल्हापूर - १४.४ 
डहाणू - १५.२ 
सोलापूर - १३.२ 
पुणे - ७.९ (महाबळेश्वरपेक्षाही पुण्यातील पारा कमी) 
बारामती - ७.५ 
महाबळेश्वर- ११.१ 
नाशिक - ८.२ 
मुंबई कुलाबा - २०.९ 
नंदुरबार - १२.४ 
सातारा - १० 
सांगली - १२.३ 
नांदेड - ८.८ 
सांताक्रुज - १५.६ 
उदगीर - ११ 
अहिल्यानगर- ६.६
परभणी - १०.४ 
धाराशिव - १०.२ 
जेऊर - ५.५
मालेगाव - ८.८

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

IND vs NZ 1st ODI : टीम इंडियाचा 2026 चा श्रीगणेशा! वडोदऱ्यात भारतीय वाघांची विजयी डरकाळी, किवींचा सुपडा साफ
टीम इंडियाचा 2026 चा श्रीगणेशा! वडोदऱ्यात भारतीय वाघांची विजयी डरकाळी, किवींचा सुपडा साफ
साडे तीनशे वर्षांपूर्वी आपल्या छत्रपती शिवाजी महाराजांनी सूरत लुटली त्याचा राग काहींच्या मनात आजही आहे हे विसरु नका : जयंत पाटील
मुंबईचा महापौर ठाकरे बंधू ठरवतील, ठाकरे बंधूंच्या संयुक्त सभेचं मैदान जयंत पाटील यांनी गाजवलं
Raj Thackery Video: मुंबई वाचवायचीय, ही शेवटची लढाई, त्वेषाने लढा, आज हरलात तर संपून जाल; राज ठाकरे यांचा हल्लाबोल
Raj Thackery Video: मुंबई वाचवायचीय, ही शेवटची लढाई, त्वेषाने लढा, आज हरलात तर संपून जाल; राज ठाकरे यांचा हल्लाबोल
Gold Rate : 2025 मध्ये सोन्याचे दर 65 टक्क्यांनी वाढले, 2026 मध्ये काय घडणार? तज्ज्ञ अंदाज वर्तवत म्हणाले...
2025 मध्ये सोन्याचे दर 65 टक्क्यांनी वाढले, 2026 मध्ये काय घडणार? तज्ज्ञ अंदाज वर्तवत म्हणाले...
Advertisement
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

Aaditya Thackeray Speech ShivajiPark: भरसभेत फडणवीसांची मिमिक्री, कोस्टल रोडवरून हल्लाबोल
Praniti Shinde on BJP :  काँग्रेस खासदार प्रणिती शिंदेची देवेंद्र फडणवीस यांच्यावर सडकून टीका
Prakash Mahajan On Sanjay Raut Thane : संजय राऊत यांच्यावर टीका करताना प्रकाश महाजन यांची जीभ घसरली
Rupali Thombare Pune:Ajit Pawar यांचा एकेरी उल्लेख करणाऱ्या Mahesh Landgeयांच्यावर ठोंबरे संतापल्या
Sanjay Raut Mumbai: फडणवीसांना आव्हान, 11 लाखांचं बक्षीस; ठाकरें बंधूंच्या सभेआधी संजय राऊत काय काय म्हणाले?

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
IND vs NZ 1st ODI : टीम इंडियाचा 2026 चा श्रीगणेशा! वडोदऱ्यात भारतीय वाघांची विजयी डरकाळी, किवींचा सुपडा साफ
टीम इंडियाचा 2026 चा श्रीगणेशा! वडोदऱ्यात भारतीय वाघांची विजयी डरकाळी, किवींचा सुपडा साफ
साडे तीनशे वर्षांपूर्वी आपल्या छत्रपती शिवाजी महाराजांनी सूरत लुटली त्याचा राग काहींच्या मनात आजही आहे हे विसरु नका : जयंत पाटील
मुंबईचा महापौर ठाकरे बंधू ठरवतील, ठाकरे बंधूंच्या संयुक्त सभेचं मैदान जयंत पाटील यांनी गाजवलं
Raj Thackery Video: मुंबई वाचवायचीय, ही शेवटची लढाई, त्वेषाने लढा, आज हरलात तर संपून जाल; राज ठाकरे यांचा हल्लाबोल
Raj Thackery Video: मुंबई वाचवायचीय, ही शेवटची लढाई, त्वेषाने लढा, आज हरलात तर संपून जाल; राज ठाकरे यांचा हल्लाबोल
Gold Rate : 2025 मध्ये सोन्याचे दर 65 टक्क्यांनी वाढले, 2026 मध्ये काय घडणार? तज्ज्ञ अंदाज वर्तवत म्हणाले...
2025 मध्ये सोन्याचे दर 65 टक्क्यांनी वाढले, 2026 मध्ये काय घडणार? तज्ज्ञ अंदाज वर्तवत म्हणाले...
Video: आक्रमक भाषण, दाखव रे तो फोटो, फडणवीसांची दुसऱ्यांदा मिमिक्री; शिवाजी पार्कवर आदित्य ठाकरेंचीही तोफ धडाडली
Video: आक्रमक भाषण, दाखव रे तो फोटो, फडणवीसांची दुसऱ्यांदा मिमिक्री; शिवाजी पार्कवर आदित्य ठाकरेंचीही तोफ धडाडली
भाजप उमेदवारासाठी मतदारांना 3 हजारांचं पाकीट, शिवसेना कार्यकर्त्यांची धाड; डोंबिवलीतील धक्कादायक प्रकार
भाजप उमेदवारासाठी मतदारांना 3 हजारांचं पाकीट, शिवसेना कार्यकर्त्यांची धाड; डोंबिवलीतील धक्कादायक प्रकार
Video: मोठी बातमी! पुण्यात देवाभाऊंचा रोड शो, स्वागताच्या फटाक्यांनी इमारतीला आग; मोबाईल टॉवर जळून खाक
Video: मोठी बातमी! पुण्यात देवाभाऊंचा रोड शो, स्वागताच्या फटाक्यांनी इमारतीला आग; मोबाईल टॉवर जळून खाक
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 11 जानेवारी 2025 | रविवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 11 जानेवारी 2025 | रविवार
Embed widget