एक्स्प्लोर

Mahayuti Municipal Corporation Election 2025: आगामी महापालिका निवडणुकीसाठी महायुतीचा फॉर्म्युला ठरला; मुंबई, ठाणे, कल्याण-डोंबिवलीत भाजपा-शिवसेना एकत्र; पुणे, पिंपरी चिंचवडमध्ये राष्ट्रवादी-भाजपा वेगवेगळे लढणार

Mahayuti Municipal Corporation Election 2025: महायुतीचा आगामी महापालिका निवडणुकीसाठी फॉर्म्युला ठरल्याची माहिती समोर आली आहे.

Mahayuti Municipal Corporation Election 2025: महायुतीचा आगामी महापालिका निवडणुकीसाठी (Municipal Corporation Election 2025) फॉर्म्युला ठरल्याची माहिती समोर आली आहे. मुंबई, ठाणे, कल्याण-डोंबिवली, नाशिक, नागपुरात भाजपा (BJP) आणि शिवसेना शिंदे गट (Shivsena Shinde Group) एकत्र निवडणुक लढणार आहेत. तर पुणे आणि पिंपरी चिंचवड महापालिकेत राष्ट्रवादी आणि भाजपा वेगवेगळे निवडणूक लढणार असल्याची विश्वसनीय सूत्रांची माहिती आहे. (Mahayuti Municipal Corporation Election 2025)

पुणे, पिंपरी-चिंचवडमध्ये भाजपा आणि राष्ट्रवादीची वेगळी रणनीती- (Shivsena BJP NCP Election 2025)

पुणे, पिंपरी-चिंचवडमध्ये भाजपा आणि राष्ट्रवादीची ताकद समसमान आहे. अशात, कार्यकर्त्यांना संधी मिळावी आणि बंडखोरी होऊ नये, यासाठी भाजपा आणि राष्ट्रवादीने वेगळी रणनीती आखली आहे. पुणे आणि पिंपरी-चिंचवड महापालिकेत वेगळं लढत विरोधकांना बाजूला सारलं जाणार आहे.  नागपुरात भाजपाची ताकद अधिक असली, तरी मित्र पक्ष असलेल्या शिवसेनेला देखील सोबत घेतलं जाणार आहे. नवी मुंबईसंदर्भात अद्यापही निर्णय नाही, मात्र, भाजपा-सेना एकत्र येण्यासंदर्भात हालचाली सुरु आहे.

महापालिका निवडणुकीसाठी उमेदवार आणि रणनीतीचा भाजपाकडून नवा पॅटर्न- (Municipal Corporation Election 2025)

महापालिका निवडणुकीसाठी उमेदवार आणि रणनीतीचा भाजपाकडून नवा पॅटर्न आणला जाणार आहे. नगर परिषद निवडणुकीत अनेक भागांमध्ये भाजपा आमदार, खासदार आणि बाहेरील प्रभारींनी उमेदावारापासून ते रणनीती निश्चितीपर्यंत मनमानी केल्याचं समोर आलं. त्यामुळे नव्या रणनीतीनं महापालिका निवडणुका सामोरे जाण्यासंदर्भात खलबतं सुरु असल्याची विश्वसनीय सूत्रांची माहिती आहे. भाजपाच्या दृष्टीने 100 टक्के निवडून येण्याची खात्री असलेल्या प्रभागात तरुण एकनिष्ठ असलेल्या उमेदवारांना संधी दिली जाणार, आयात उमेदवार लादल्या जाणार नाही.  विजयाचा विश्वास आहे, पण खात्री नाही अशात प्रभागांमध्ये पक्षांबरोबरच अन्य पक्षांतील व्यक्ती किंवा मोठी सामाजिक प्रतिष्ठा असलेल्यांचा विचार होणार आहे. युतीचा विषय बंद नाही, अशात मित्रपक्षाच्या नेत्याने आपल्याविरोधात बोलल्यास प्रतिक्रिया न देण्याच्या सूचना देण्यात येणार आहे.

राज्यासह देश-विदेशातील महत्वाच्या घडामोडी, VIDEO:

Covers Business, Environment and climate change, Health, Science & tech and Policies! Believes in strength of quill!
Read
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Maharashtra Live Blog Updates: महाराष्ट्रातील महापौर आरक्षण जाहीर, कल्याण–डोंबिवलीत सत्तेचा मोठा ट्विस्ट! अनुसूचित जमातीचा महापौर होणार, तर...
Maharashtra Live Blog Updates: महाराष्ट्रातील महापौर आरक्षण जाहीर, कल्याण–डोंबिवलीत सत्तेचा मोठा ट्विस्ट! अनुसूचित जमातीचा महापौर होणार, तर...
KDMC Mayor: बहुचर्चित कल्याण डोंबिवली महापौरपद अनुसूचित जातीसाठी राखीव; या सहाजणांपैकी कोणाला संधी मिळणार?
बहुचर्चित कल्याण डोंबिवली महापौरपद अनुसूचित जातीसाठी राखीव; या सहाजणांपैकी कोणाला संधी मिळणार?
Maharashtra Municipal Corporation Reservation 2026 मोठी बातमी: मुंबई-पुणे ओपन, ठाण्यात SC, कल्याण-डोंबिवलीत ST,...29 महानगरपालिकेतील महापौरपदासाठी आरक्षण जाहीर; A टू Z माहिती
मोठी बातमी: मुंबई-पुणे ओपन, ठाण्यात SC, कल्याण-डोंबिवलीत ST,...29 महानगरपालिकेतील महापौरपदासाठी आरक्षण जाहीर; A टू Z माहिती
अमरावतीच्या अचलपूर नगरपरिषदेत भाजप आणि एमआयएम मांडीला मांडी लावून बसणार; सत्तेसाठी दोन्ही पक्षांची एकमेकांना साथ
अमरावतीच्या अचलपूर नगरपरिषदेत भाजप आणि एमआयएम मांडीला मांडी लावून बसणार; सत्तेसाठी दोन्ही पक्षांची एकमेकांना साथ
Advertisement
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

KDMC Mayor Reservation : कल्याण डोंबिवलीत अनुसूचित जमाती प्रवर्गाला आरक्षणाला
KDMC Mayor : कल्याण डोंबिवलीत मनसेने घेतलेल्या निर्णयामुळे उद्धव ठाकरे नाराज?
Sanjay Raut Shivsena : सत्तास्थापनेसाठी श्रीकांत शिंदेंच्या मनसे नेत्यांसोबत बैठका, राऊत काय म्हणाले?
KDMC Thackeray vs Thackeray : कल्याण डोंबिवलीत मनसेने घेतलेल्या निर्णयामुळे उद्धव ठाकरे नाराज?
Sarita Mhaske Mumbai : काल शिंदे गटात, आज पुन्हा सरिता म्हस्के ठाकरे गटात, नेमकं काय घडलं?

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Maharashtra Live Blog Updates: महाराष्ट्रातील महापौर आरक्षण जाहीर, कल्याण–डोंबिवलीत सत्तेचा मोठा ट्विस्ट! अनुसूचित जमातीचा महापौर होणार, तर...
Maharashtra Live Blog Updates: महाराष्ट्रातील महापौर आरक्षण जाहीर, कल्याण–डोंबिवलीत सत्तेचा मोठा ट्विस्ट! अनुसूचित जमातीचा महापौर होणार, तर...
KDMC Mayor: बहुचर्चित कल्याण डोंबिवली महापौरपद अनुसूचित जातीसाठी राखीव; या सहाजणांपैकी कोणाला संधी मिळणार?
बहुचर्चित कल्याण डोंबिवली महापौरपद अनुसूचित जातीसाठी राखीव; या सहाजणांपैकी कोणाला संधी मिळणार?
Maharashtra Municipal Corporation Reservation 2026 मोठी बातमी: मुंबई-पुणे ओपन, ठाण्यात SC, कल्याण-डोंबिवलीत ST,...29 महानगरपालिकेतील महापौरपदासाठी आरक्षण जाहीर; A टू Z माहिती
मोठी बातमी: मुंबई-पुणे ओपन, ठाण्यात SC, कल्याण-डोंबिवलीत ST,...29 महानगरपालिकेतील महापौरपदासाठी आरक्षण जाहीर; A टू Z माहिती
अमरावतीच्या अचलपूर नगरपरिषदेत भाजप आणि एमआयएम मांडीला मांडी लावून बसणार; सत्तेसाठी दोन्ही पक्षांची एकमेकांना साथ
अमरावतीच्या अचलपूर नगरपरिषदेत भाजप आणि एमआयएम मांडीला मांडी लावून बसणार; सत्तेसाठी दोन्ही पक्षांची एकमेकांना साथ
Shivsena : मोठी बातमी : राजूल पटेल ते प्रतिमा खोपडे, तुमच्या बंडखोरांमुळे आमचे 11 उमेदवार पडले, शिंदेसेनेने भाजपला खडसावलं, आकडेवारीच दाखवली
मोठी बातमी : राजूल पटेल ते प्रतिमा खोपडे, तुमच्या बंडखोरांमुळे आमचे 11 उमेदवार पडले, शिंदेसेनेने भाजपला खडसावलं, आकडेवारीच दाखवली
BJP mayor : पुण्याचा कोण होणार कारभारी? भाजपकडून महापौरपदासाठी प्रबळ दावेदारांची नावं चर्चेत, कोणाला मिळू शकतं पद
पुण्याचा कोण होणार कारभारी? भाजपकडून महापौरपदासाठी प्रबळ दावेदारांची नावं चर्चेत, कोणाला मिळू शकतं पद
Share Market : अखेर शेअर बाजारातील घसरणीला ब्रेक, डोनाल्ड ट्रम्प यांच्या एका भूमिकेनं सेन्सेक्स- निफ्टीत तेजी, गुंतवणूकदारांना दिलासा
अखेर शेअर बाजारातील घसरणीला ब्रेक, डोनाल्ड ट्रम्प यांच्या एका भूमिकेनं सेन्सेक्स- निफ्टीत तेजी
कल्याण डोंबिवलीत 'स्थानिक' पातळीवर दिलेला पाठिंबा काढून घेण्यास राज ठाकरेंना सांगणार का? उद्धव ठाकरेंना हा प्रकार माहीत होता का, ते बोलणार का? संजय राऊत काय म्हणाले?
कल्याण डोंबिवलीत 'स्थानिक' पातळीवर दिलेला पाठिंबा काढून घेण्यास राज ठाकरेंना सांगणार का? उद्धव ठाकरेंना हा प्रकार माहीत होता का, ते बोलणार का? संजय राऊत काय म्हणाले?
Embed widget