Sahyadri Hospital Vandalised : पुण्यातील सह्याद्री रुग्णालयात तोडफोड प्रकरणी 7 जणांवर गुन्हा दाखल; रूग्णालयाने दिलं घटनेबाबत स्पष्टीकरण, नेमकं प्रकरण काय?
Sahyadri Hospital Vandalised : सह्याद्री रुग्णालयामध्ये ज्येष्ठ नागरिकाचा उपचारादरम्यान मृत्यू झाल्याने, संतप्त नातेवाइकांनी रुग्णालयाचे प्रवेशद्वार फोडून साहित्याची तोडफोड केली.

पुणे: चुकीच्या उपचारांमुळे मृत्यू झाल्याचा आरोप करत रुग्णांच्या नातेवाइकांनी सह्याद्री रुग्णालयाच्या प्रवेशद्वारासह साहित्याची तोडफोड केल्याप्रकरणी हडपसर (Sahyadri Hospital In Hadapsar Vandalised) पोलिसांनी सात जणांवर गुन्हा दाखल केला आहे. सह्याद्री रुग्णालयामध्ये ज्येष्ठ नागरिकाचा उपचारादरम्यान मृत्यू झाल्याने, संतप्त नातेवाइकांनी रुग्णालयाचे प्रवेशद्वार फोडून साहित्याची तोडफोड केली. घटनास्थळी पोलिसांनी (Sahyadri Hospital In Hadapsar Vandalised) धाव घेऊन, नातेवाईकांशी संपर्क साधला. ‘कायदा हातात घेऊ नका, या घटनेबाबत कायदेशीर कारवाई केली जाईल. रुग्णालय प्रशासनाच्या विरोधात पोलिस ठाण्यात तक्रार द्या, तुमची तक्रारही घेतली जाईल’, असे पोलिसांकडून सांगण्यात आले. (Sahyadri Hospital In Hadapsar Vandalised)
Sahyadri Hospital Vandalised : तोडफोड करणाऱ्या चौघांना ताब्यात घेतले
सह्याद्री रुग्णालयाची तोडफोड प्रकरणी सात जणांवर गुन्हा दाखल केला आहे. हडपसरमधील सह्याद्री रुग्णालयात उपचारादरम्यान ज्येष्ठाचा मृत्यू झाल्यानंतर संतप्त नातेवाईकांनी रुग्णालयाची केली होती. डॉक्टरांनी ट्रीटमेंट व्यवस्थित केली नाही, त्यामुळे मृत्यू झाल्याचा आरोप करत ही तोडफोड करण्यात आली. पोलिसांनी माहिती मिळताच तत्काळ घटनास्थळी दाखल होत, तोडफोड करणाऱ्या चौघांना ताब्यात घेतले. तर सात जणांवर गुन्हा दाखल केला. याप्रकरणी हडपसर पोलिस ठाण्यात शुभम सकपाळ, गौरव सकपाळ, विश्वजीत कुमावत, कुणाल सकपाळ यांच्यासह इतरांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.(Sahyadri Hospital In Hadapsar Vandalised)
तर या घटनेनंततर सह्याद्री हॉस्पिटलने म्हटले आहे, "रुग्णाच्या निधनाबद्दल आम्हाला अत्यंत दुःख झाले आहे. हा ७६ वर्षीय रुग्ण २८ नोव्हेंबर रोजी आमच्या रुग्णालयात गंभीर वैद्यकीय स्थितीमुळे दाखल झाला होता. त्याचे मल्टी-ऑर्गन फेल्युअर झाले होते. शहरातील दुसऱ्या रुग्णालयात प्राथमिक उपचार घेतल्यानंतर त्याला आमच्याकडे दाखल करण्यात आले होते."
"आमच्या तज्ज्ञ डॉक्टरांच्या टीमने केलेल्या व्यापक प्रयत्नांनंतर आणि सर्व योग्य, पुराव्यावर आधारित वैद्यकीय प्रोटोकॉलचा वापर करूनही, रुग्णाची स्थिती अत्यंत गंभीर असल्यामुळे आणखीन बिघडत गेली आणि दुर्दैवाने आज त्यांचे निधन झाले. सर्व वैद्यकीय हस्तक्षेप आणि क्लिनिकल निर्णय राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय मार्गदर्शक तत्त्वांनुसार अतिशय काटेकोरपणे घेण्यात आले होते."
"आम्ही शोकाकुल कुटुंबीयांप्रती मनःपूर्वक संवेदना व्यक्त करतो. या कठीण काळात आम्ही त्यांच्या दुःखात सहभागी आहोत.कुटुंबाला शक्य त्या सर्व प्रकारे मदत करण्यास आम्ही कटिबद्ध आहोत. तथापि, रुग्णालयात घडलेल्या हिंसक प्रकारांचा आम्ही तीव्र निषेध करतो. याशिवाय मालमत्तेच्या नुकसानीबाबत आम्ही पोलिसांत तक्रार दाखल करत आहोत, कारण अशा वर्तनामुळे रुग्ण, त्यांचे कुटुंबीय आणि आमचे आरोग्य कर्मचारी यांना गंभीर धोका निर्माण झाला."























