Sunil Kedar Jail : काँग्रेस नेते सुनील केदार यांना 5 वर्षांची जेल,नागपूर जिल्हा बँक घोटाळ्यात शिक्षा
Sunil Kedar Jail : काँग्रेस नेते सुनील केदार यांना 5 वर्षांची जेल, नागपूर जिल्हा बँक घोटाळ्यात 5 वर्षांची शिक्षा ..
Sunil Kedar : नागपूर जिल्हा बँक घोटाळा प्रकरणी काँग्रेसचे नेते सुनिल केदार (Congress Leader Sunil Kedar) यांना मोठा धक्का बसला आहे. कोर्टाने त्यांना दोषी ठरवल्यानंतर शिक्षाही सुनावली. जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या 150 कोटी रुपयांच्या घोटाळा प्रकरणी अतिरिक्त मुख्य न्यायदंडाधिकारी यांनी सुनिल केदार आणि इतर दोषींना 5 वर्षांची शिक्षा ठोठावली आहे. कोर्टानं सुनील केदार( तत्कालीन बँक अध्यक्ष) यांच्यासोबत केतन शेठ (मुख्य रोखे दलाल), अशोक चौधरी (तत्कालीन बँक मॅनेजर) या तिघांसह आणखी तिघे रोखे दलाल अशा एकूण सहा जणांना दोषी ठरवलं होते.
सुनील केदार यांना दोषी ठरवण्यात आल्यानंतर सुनील केेदार यांना सौम्य शिक्षेची मागणी त्यांच्या वकिलांनी केली होती. सुनिल केदार हे लोकप्रतिनिधी असल्याने त्यांना कमीत कमी शिक्षा द्यावी असा युक्तीवाद केदार यांच्या वकिलांनी केला होता. मात्र, कोर्टाने केदार यांना 6 वर्षांची शिक्षा सुनावली आहे.