एक्स्प्लोर

Devendra Fadnavis Interview Nagpur : शिंदे की दादा , विश्वासू कोण? देवाभाऊची बेधडक मुलाखत ABP Majha

Devendra Fadnavis, नागपूर : "मी विनंती केली होती की, आपण एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्री करु आणि मी सरकारच्या बाहेर राहिल. मी त्याच कारणही सांगितलं होतं. मी मुख्यमंत्री झालो असतो तर लोकांना वाटलं असतं की हा सत्तेचा भुकेला आहे. कालपर्यंत मुख्यमंत्री व्हायचं म्हणत होता आज मंत्रिमंडळात चालला. अशा प्रकारची टीका मला आवडणार नाही. त्यामुळे मी वरिष्ठांना म्हणालो की, पक्षाचं काम द्या. आपण सरकारमधील लोकांना बाहेरुन मदत करु. मी पक्ष वाढवतो. सुरुवातीला हे सगळं ठरलं होतं. मात्र, त्यानंतर पक्षामध्ये तो निर्णय बदलण्यात आला. आज मला वाटतं वरिष्ठांनी जो निर्णय घेतला तो योग्य घेतला. मोदीजी मला म्हणाले होते की, बाहेरुन सरकार चालवलं तर ते चालतं नाही. जो आतमध्ये आहे तोच सरकार चालवू शकतो. कॅबिनेटमध्ये राहून सरकार चालवता येतं, ते बाहेर राहून होणार नाही. मी त्याच क्षणी हो म्हटलं. मनात ही भावना निश्चित होती की, लोक काय म्हणतील. आपण अनेक वेळा लोकांचा विचार करतो. हा किती सत्तापिपासू आहे, असं लोक म्हणतील असं मला वाटतं होतं" असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले. ते नागपुरात दिलेल्या एका मुलाखतीत बोलत होते. यावेळी त्यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी बंड केल्यानंतर झालेल्या पक्षाअंतर्गत घडामोडींबाबत भाष्य केलं. 

देवेंद्र फडणवीस म्हणाले, उपमुख्यमंत्रिपद स्वीकारल्यानंतर देशभरातली कार्यकर्त्यांनी मला मेसेज केले, फोन केले, माझ्याशी बोलले. मी आज हे सांगू शकतो की, मुख्यमंत्री झाल्यानंतर जेवढा मान-सन्मान मिळाला नसता. त्यापेक्षा जास्त सन्मान उपमुख्यमंत्री झाल्यावर मिळाला. आताच्या विधानसभा निवडणुका झाल्यानंतर एकनाथ शिंदेंना मी मुख्यमंत्री होईल, असं वाटतं होतं. कारण ते मुख्यमंत्री राहिले होते. मला देखील कल्पना नव्हती की, मी मुख्यमंत्री होईल. परंतु जनतेने निर्णयच दिला. 132 जागा भाजपच्या आल्यानंतर भारतीय जनता पक्षाचा मुख्यमंत्री न करणे हे जनतेला आणि पक्षाच्या कार्यकर्त्यांना आवडलं नसतं. त्यावेळी माध्यमांमध्ये काही चाललं, पण एकनाथ शिंदेंनी लगेच सांगितलं होतं की, भाजप हाच मोठा पक्ष आहे. भाजपचा मुख्यमंत्री झाला पाहिजे. माझी काही हरकत नाही. 

पुढे बोलताना देवेंद्र फडणवीस म्हणाले, आम्ही ठरवलं होतं की, सगळी चर्चा करुन सरकार स्थापन करु. त्यामुळे थोडा वेळ लागला. त्या कालावधीमध्ये कधी शिंदे साहेब नाराज कधी अजितदादा नाराज...अशा बातम्या सुरु झाल्या. मुख्यमंत्री झाल्यानंतर उपमुख्यमंत्री व्हावं की नाही. असा एकनाथ शिंदेंसमोर प्रश्न होता. मी त्यांना माझा अनुभव सांगितला. मी त्यांना सांगितलं की, तुम्हाला एक पक्ष चालवायचा आहे. पक्ष चालवायचा असेल अशा परिस्थितीत सत्तेच्या बाहेर राहून चावलणं कठिण जाईल. त्यामुळे तुम्ही सरकारमध्ये आलं पाहिजे. ते त्यांनी मान्य केलं. एकनाथ शिंदेंच्या चेहऱ्यावर फार हास्य नसतं. त्यामुळे लोकांना वाटू लागलं ते नाराज आहेत. 

नागपूर व्हिडीओ

Devendra Fadnavis Interview Nagpur : शिंदे की दादा , विश्वासू कोण? देवाभाऊची बेधडक मुलाखत ABP Majha
Devendra Fadnavis Interview Nagpur : शिंदे की दादा , विश्वासू कोण? देवाभाऊची बेधडक मुलाखत ABP Majha

शॉर्ट व्हिडीओ

अधिक पाहा..
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

शेतकऱ्याची धावपटू मुलगी घेणार गरुडभरारी, मुख्यमंत्र्यांनी घेतली जबाबादारी, पुण्याच्या बालेवाडीत मिळणार प्रशिक्षण

Video: एकनाथ शिंदे की अजित पवार, विश्वासू कोण?  बेधडक मुलाखतीत देवेंद्र फडणवीस यांचं बिनधास्त उत्तर

क्या बात है... 3100 फूट उंच लिंगाणा सर करणारा 4 वर्षाचा गिर्यारोहक; सुळक्यांवर 'साम्राज्य' गाजवतोय चिमुकला

बुलढाण्यात टक्कल पडण्याच्या आजाराच्या रुग्णांत वाढ; 11 गावातील 51 रुग्णांचे घेतले त्वचेचे नमुने, प्रशासन ऍक्टिव्ह मोडवर

ABP Premium
Advertisement

व्हिडीओ

Devendra Fadnavis Interview Nagpur : शिंदे की दादा , विश्वासू कोण? देवाभाऊची बेधडक मुलाखत ABP MajhaMVA Internal issue : एकमेकांविरोधात आघाडी, महाविकास आघाडीत बिघाडी Rajikya Shole Special ReportSharad Pawar NCP | शरद पवारांच्या राष्ट्रवादीत पुन्हा भाकरी फिरणार? Special Report Rajkiya SholeZero Hour MVA : मविआत एकमेकांवरच तलवारी?पालिकेआधीच मविआ फुटणार? Sushma Andhare EXCLUSIVE

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
शेतकऱ्याची धावपटू मुलगी घेणार गरुडभरारी, मुख्यमंत्र्यांनी घेतली जबाबादारी, पुण्याच्या बालेवाडीत मिळणार प्रशिक्षण
शेतकऱ्याची धावपटू मुलगी घेणार गरुडभरारी, मुख्यमंत्र्यांनी घेतली जबाबादारी, पुण्याच्या बालेवाडीत मिळणार प्रशिक्षण
Video: एकनाथ शिंदे की अजित पवार, विश्वासू कोण?  बेधडक मुलाखतीत देवेंद्र फडणवीस यांचं बिनधास्त उत्तर
Video: एकनाथ शिंदे की अजित पवार, विश्वासू कोण? बेधडक मुलाखतीत देवेंद्र फडणवीस यांचं बिनधास्त उत्तर
क्या बात है... 3100 फूट उंच लिंगाणा सर करणारा 4 वर्षाचा गिर्यारोहक; सुळक्यांवर 'साम्राज्य' गाजवतोय चिमुकला
क्या बात है... 3100 फूट उंच लिंगाणा सर करणारा 4 वर्षाचा गिर्यारोहक; सुळक्यांवर 'साम्राज्य' गाजवतोय चिमुकला
बुलढाण्यात टक्कल पडण्याच्या आजाराच्या रुग्णांत वाढ; 11 गावातील 51 रुग्णांचे घेतले त्वचेचे नमुने, प्रशासन ऍक्टिव्ह मोडवर
बुलढाण्यात टक्कल पडण्याच्या आजाराच्या रुग्णांत वाढ; 11 गावातील 51 रुग्णांचे घेतले त्वचेचे नमुने, प्रशासन ऍक्टिव्ह मोडवर
मंत्री धनंजय मुंडे एक्टीव्ह मोडवर; आधी भुजबळांची भेट, नंतर मंत्रालयात कामकाज सुरू

Sania Mirza : सानिया मिर्झाला मिळालं नवं कुटुंब
सानिया मिर्झाला मिळालं नवं कुटुंब
मोठी बातमी! अखेर राहुल गांधी न्यायालयात हजर; पुणे कोर्टाकडून 25 हजारांच्या जातमुचलक्यावर जामीन

90 तासांच्या कामाची चर्चा! जगातील कोणत्या देशात सर्वात जास्त वेळ लोक काम करतात?  

Embed widget