Nitin Gadkari Birthsay Ladoo Tula Nagpur : वाढदिवसानिमत्त नागपुरात नितीन गडकरी यांची लाडू तुला!
Nitin Gadkari Birthsay Ladoo Tula Nagpur : वाढदिवसानिमत्त नागपुरात नितीन गडकरी यांची लाडू तुला!यवतमाळच्या आर्णी आणि महागाव तालुक्यातील तिवरंग,चिखली, मलकापूर या गावांना वादळाचा तडाखा, जवळपास 25 घरांची पडझड, अनेक ठिकाणी झाडं पडल्याने रस्ते बंद. केंद्रीय मंत्री व नागपूरचे खासदार नितीन गडकरी यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांची खास लाडू तुला करण्यात आली.. खासदार सांस्कृतिक महोत्सव समितीच्या वतीने ही लाडू तुला करण्यात आली... त्यासाठी मोठ्या संख्येने शुद्ध तुपाचे मोतीचूरचे खास लाडू बनवण्यात आले होते... गडकरी यांच्या वाढदिवसानिमित्त नेत्यांच्या अभिष्टचिंतन करण्यासाठी गडकरी यांच्या घरी महाराष्ट्रातील कानाकोपऱ्यातून हजारो भाजप कार्यकर्ते पोहोचले होते... आज संध्याकाळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस नागपुरात पोहोचून गडकरी यांची वाढदिवस निमित्त भेट घेऊन शुभेच्छा देणार असल्याची माहिती आहे....
बुलढाणा जिल्ह्यातील शेगाव, खामगाव तालुक्यात विजांच्या कडकडाट आणि वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस, अनेक घरांवरील छत उडाले.
अकोल्याच्या अकोटमध्ये वादळी वाऱ्यासह मान्सूनपूर्व पाऊस, पणज गावात धान्याच्या गोदामावरील पत्रे उडाले, तर अनेक ठिकाणी घरांवरील पत्रे उडाल्याने मोठं नुकसान.
पंढरपूर तालुक्यात कासेगाव सह अनेक ठिकाणी विजांच्या कडकडाटासह मुसळधार पाऊस, उन्हाळी पिकांचं नुकसान होण्याची भीती.
वादळी वाऱ्यामुळे बीडच्या अंबाजोगाई तालुक्यातील पूस येथील एका मंदिराची स्वागत कमान कोसळली, कोणतीही जीवीतहानी नाही, जवळच उभ्या असलेल्या कारचा मात्र चुराडा.
जळगाव जिल्ह्यात वादळी वाऱ्यासह पाऊस, केळी पिकासह अनेक घरांचं मोठ्या प्रमाणत नुकसान, मंत्री गिरीश महाजनांकडून घरांची पाहणी.
जळगावच्या रावेर आणि जामनेर तालुक्याला अवकाळी पावसाचा तडाखा, केळी बागांचं मोठं नुकसान, तसंच घरावरील पत्रेही उडाले.
धाराशिवमध्ये वादळी वाऱ्यासह पाऊस, उमरगा तालुक्यातील व्हांताळ गावतल्या शेतकऱ्याचा वीज पडून मृत्यू, तर अनेक दुकानांची छतं उडून गेल्यामुळे व्यावसायिकांचं मोठं नुकसान.
३१ मे दरम्यान केरळात तर १० जूनदरम्यान मुंबईसह कोकणात मान्सूनचं आगमन होणार, १५ जूनदरम्यान ((सह्याद्रीचा घाटमाथा ओलांडून)) उर्वरीत महाराष्ट्रात मान्सून दाखल होईल,हवामान तज्ज्ञ माणिकराव खुळे यांची माहिती.