Thane - Diva दरम्यानच्या पाचव्या आणि सहाव्या मार्गिकेचे PM Modi यांच्या हस्ते ऑनलाईन लोकार्पण
ठाणे ते दिवा दरम्यानच्या पाचव्या आणि सहाव्या मार्गिकेचे आज लोकार्पण होणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते ऑनलाईन हा सोहळा पार पडणार आहे. ((या सोहळ्याला राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव उपस्थित राहणार आहेत. जलद, धिम्या लोकल गाडय़ा आणि एक्सप्रेस गाडय़ांना प्रत्येकी दोन मार्गिका उपलब्ध होणार असून यामुळे विनाअडथळा लोकल वाहतूक सुरू राहणार आहे. या मार्गावर 36 लोकलच्या नवीन फेऱ्या सुरु होणार आहेत. यांत 34 एसी लोकल तर 2 सामान्य लोकलचा समावेश असेल. प्रवाशांचा अल्प प्रतिसाद पाहता रेल्वे बोर्ड एसी लोकलचं भाडे कमी करण्याच्या विचारात आहे. या संदर्भात पंतप्रधान मोदी आज घोषणा करण्याची शक्यता आहे. पाचव्या आणि सहाव्या रेल्वे मार्गिकांच्या उभारणीसाठी सातत्याने पाठपुरावा सुरू असल्याचा दावा शिवसेनेचे खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्याकडून केला जातोय. तर दुसरीकडे पालिका निवडणुकांच्या तोंडावर केंद्र सरकारने या मार्गिकांचा लोकार्पण कार्यक्रम घेऊन हा प्रकल्प आपल्या सरकारच्या कार्यकाळात झाल्याचा दावा केलाय. त्यामुळे शिवसेना-भाजपमध्ये श्रेयवादाची लढाई रंगण्याची चिन्हं आहेत.