Manoj Jarange Pune : मनोज जरांगेंचा मोर्चा पुणे शहरात; स्वागतासाठी मोठी गर्दी
Manoj Jarange Pune : मनोज जरांगेंचा मोर्चा पुणे शहरात; स्वागतासाठी मोठी गर्दी मराठा आरक्षणासाठी मराठा आंदोलक मनोज जरांगे मुंबईच्या दिशेने निघालेत... पुढच्या ४८ तासांत मराठ्यांचं वादळ मुंबईत धडकणार आहे... जरांगेंच्या आंदोेलनात ठिकठिकाणी मोठ्या प्रमाणात मराठा आंदोलक जोडले जात आहेत.. त्यामुळे सरकारची डोखेदुखी वाढलीये... त्यामुळे मराठ्यांचं वादळ थोपवण्यासाठी सरकारचेही प्रयत्न सुरु आहेत.. आरक्षणाबाबत सरकार सकारात्मक असल्याने जरांगेंनी आंदोलन थांबवावं असं आवाहन मुख्यमंत्री शिंदेंनी केलंय.. दरम्यान आज पुण्यात पोलिसांनीही मनोज जरांगेंशी चर्चा करुन आंदोलनाचा मार्ग बदलण्याबाबत विनंती केली.. त्यानंतर मोर्चाच्या मार्गात रुग्णालयं असल्याने रुग्णांना त्रास होऊ नये म्हणून मार्गात बदल करण्यात आला.. तर आज मनोज जरांगेंच्या मोर्चाविरोधात सदावर्तेंनी केलेल्या याचिकेवर हायकोर्टात सुनावणी पार पडली..हायकोर्टाने जरांगेंना नोटीसही बजावलीय..