Maharashtra Superfast News: महाराष्ट्र सुपरफास्ट न्यूज : 6 PM : 7 ऑक्टोबर 2024 : ABP Majha
सोलापुरात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा ताफा अडवत भंडारा उधळण्याचा प्रयत्न, सोलापूर विमानतळाहून मंगळवेढ्याकडे जात असताना धनगर कार्यकर्त्यांकडून ताफा अडवण्याचा प्रयत्न, संबंधितांना पोलिसांनी ताब्यात घेतलं.
रत्नागिरीमध्ये मंत्री उदय सामंतांना काळे झेंडे दाखवले, वक्फ बोर्डाच्या कार्यालयाच्या उद्घाटनावरुन वाद, हिंदुत्ववादी संघटनाने दाखवले काळे झेंडे.
सांगलीच्या तासगावमध्ये आजी - माजी खासदारांमध्ये जोरदार खडाजंगी, तासगाव नगरपालिकेच्या नवीन वास्तू उद्घाटनप्रसंगी खासदार विशाल पाटील आणि माजी खासदार संजयकाका पाटलांमध्ये श्रेयवादावरून राडा.
सांगलीच्या तासगाव नगरपालिकेच्या नवीन वास्तू उद्घाटनप्रसंगी आजी- माजी खासादारांमध्ये वाद, काही जणांकडून आजच्या कार्यक्रमात नौटंकी, जशास तसे वागण्याची भूमिका पुन्हा घेतली, माजी खासदार संजयकाका पाटील यांची प्रतिक्रिया.
कुणीही राजकीय स्टंटबाजी करू नये, सर्वच राजकीय नेत्यांनी मिळून मिसळून एक दिलाने राहावे, तालुक्यात शांतता राखावी, तासगावमधील राड्यानंतर पालकमंत्री डॉक्टर सुरेश खाडेंची प्रतिक्रिया.
श्रेयवादासाठी काही मंडळींनी कार्यक्रमात गोंधळ घातला, तासगाव आणि कवठेमंकाळ तालुक्यात मोगलाई लागली नाही, आजी- माजी खासदारांच्या वादानंतर रोहित पाटलांची प्रतिक्रिया.