Video : फडणवीसांची रावडीस्टाईल... ''देवाभाऊ जो बोलता है वो करता है, जो नही बोलता वो डेफिनेटली करता है''
या मतदारसंघातील पोटनिवडणुकांच्या प्रचारावेळी मी मंगळवेढा-पंढरपुरात आलो होतो. त्यावेळी, मी सांगितले होते, तुम्ही मला 1 आमदार द्या, 106 आमदार होऊ द्या, मी सरकारचा कटेक्ट कार्यक्रम करतो
सोलापूर : राज्याचे उपमुख्यमंत्री आणि भाजप नेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी पुन्हा एकदा मंगळवेढा-पंढरपूर मतदारसंघातील कार्यक्रमात बोलताना सत्ता बदलेचा दाखला दिला. यापूर्वीही त्यांनी काही मुलाखतीत मी दोन पक्ष फोडून पुन्हा आलो, असे म्हटले होते. त्यानतंर, आज पंढरपूर-मंगळवेढा मतदारसंघात आमदार समाधान अवताडे यांनी मेळाव्याचे आयोजन केले होते. यावेळी, देवेंद्र फडणवीसांनी अभिनेता अक्षय कुमारच्या चित्रपटातील डायलॉग व्यासपाठीवरुन म्हटला. त्यावेळी, उपस्थितांनी टाळ्या व शिट्ट्या वाजवत दाद दिली. देवाभाऊ जो बोलता है वो करता है, और जो नही बोलता वो डेफिनेटली करता है .. असा सिनेस्टाईल डायलॉग देवेंद्र फडणवीसांनी म्हटलं. त्यांच्या ह्या डायलॉगचा व्हिडिओ सोशल मीडियातूनह समोर आला आहे.
या मतदारसंघातील पोटनिवडणुकांच्या प्रचारावेळी मी मंगळवेढा-पंढरपुरात आलो होतो. त्यावेळी, मी सांगितले होते, तुम्ही मला 1 आमदार द्या, 106 आमदार होऊ द्या, मी सरकारचा कटेक्ट कार्यक्रम करतो. तुम्ही समाधान अवताडेंना आमदार केले, मी सरकार आणले, असे म्हणत देवेंद्र फडणवीसांनी राज्यातील सत्तातरांचा दाखला दिला. तसेच, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत आपलं सरकार आलं, असेही ते म्हणाले. यावेळी, अक्षय कुमारच्या रावडी राठोड चित्रपटातील डायलॉगही त्यांनी बोलून दाखवला. देवाभाऊ जो बोलता है वो करता है, और जो नही बोलता वो डेफिनेटली करता है .. असे फडणवीसांनी म्हणतात कार्यकर्त्यांनी टाळ्या वाजवून दाद दिली.
राज्यात महायुतीचं सरकार आल्यानंतर तुम्हाला दुष्काळी 24 गावांसाठी पाणी दिले. सातारा जिल्ह्यातील दुष्काळ संपवून दाखवला. सांगोला उपसा सिंचन योजनेतून संगोल्याच्या 50 हजार हेक्टर जमिनीला लाभ झालाय. आता मंगळवेढा येथील 17 हजार हेक्टर जमिनीचा फायदा होत आहे. अनेकजण मला विचारतात तुम्ही पाणी कोठून आणले, जिद्द असेल तर पाण्याचा थेंब थेंब वाचवून पाणी उपलब्ध केले, असे फडणवीसांनी म्हटले.
लाडक्या बहिणींना अॅडव्हान्समध्ये पैसे
हे सरकार शेतकऱ्यांचे सरकार आहे, 1 रुपयात पीक विमा देत शेतकऱ्यांचा 8 हजार कोटींचा फायदा करुन दिला. राज्यात लाडकी बहीण योजना, लेक लाडकी सारखी योजना, महिलांना एसटी बसमध्ये अर्ध्या तिकीटांमध्ये प्रवासाची सवलत दिल्यामुळे एसटी देखील फायद्यात आली. सरकारने मुलींचे उच्च शिक्षण मोफत केल्याची माहिती देवेंद्र फडणवीसांनी दिली. तसेच, ऑक्टोबर व नोव्हेंबर महिन्यातील लाडकी बहीण योजनेची रक्कम अॅडव्हान्समध्येच महिला भगिनींच्या खात्यात जमा होणार असल्याचेही फडणवीसांनी म्हटले.
हेही वाचा
हायकोर्टाचा आदेश पाळला; पोस्टात वाजत गाजत जाऊन उद्धव ठाकरेंना 2 लाख रुपयांचा DD पाठवला