Mega Block : ठाणे - दिवा दरम्यान 72 तासांचा Jumbo Block, कोकणात जाणाऱ्या एक्सप्रेस 3 दिवस रद्द
मुंबई रेल विकास कॉर्पोरेशन आणि मध्य रेल्वे मिळून तब्बल 72 तासांचा जम्बो मेगाब्लॉक घेणार आहेत. हा मेगा ब्लॉक मध्य रेल्वेच्या ठाणे ते दिवा या दोन स्थानकांच्या दरम्यान असेल आणि आज रात्रीपासून म्हणजेच शुक्रवारी रात्री बारा वाजल्यापासून तो सुरू होईल. तर हा मेगाब्लॉक थेट सोमवारी रात्री बारा वाजता संपुष्टात येईल. या दरम्यान मध्य रेल्वेच्या कल्याण ते मुलुंड या स्थानकांच्या दरम्यान जलद मार्गावरून लोकल किंवा मेल एक्सप्रेस धावणार नाहीत. मात्र त्याच वेळी धीम्या मार्गावरुन लोकल सेवा आणि काही एक्सप्रेस या चालवल्या जातील. तसंच या जम्बो मेगाब्लॉक मुळे तीन दिवसांच्या कालावधीत तब्बल 100 पेक्षा जास्त एक्सप्रेस गाड्या रद्द करण्यात आलेले आहेत. तर 350 हून जास्त लोकल च्या फेऱ्या देखील रद्द करण्यात आलेल्या आहेत. याचा खूप मोठा फटका हा प्रवाशांना बसणार आहे. त्यासाठीच ठाणे महानगरपालिका ठाणे आणि मुंब्रा या स्थानकांच्या दरम्यान 205 विशेष बस सेवा चालवणार आहे. त्यामुळे या शनिवारी रविवारी आणि सोमवारी मध्य रेल्वेने प्रवास करताना थोडे नियोजन करून घराबाहेर पडावे लागणार आहे. दरम्यान या जम्बो मेगा ब्लॉकचा आढावा घेतला आहे आमचे प्रतिनिधी अक्षय भाटकर यांनी.