Gunaratna Sadavarte Threat Call : गुणरत्न सदावर्तेंना जीवे मारण्याची धमकी
Gunaratna Sadavarte Threat Call : गुणरत्न सदावर्तेंना जीवे मारण्याची धमकी
मराठी बिग बॉस यंदा सूरज चव्हाण, आर्या आणि निक्की तांबोळीने गाजवल्यानंतर आता प्रेक्षकांना उत्सुकता आहे ती, सलमान खान (Salman khan) होस्त करत असलेल्या बिग बॉस 18 च्या हिंदी सिझनची. यावेळी बिग बॉसच्या (Big Boss) हिंदी सिझनमध्ये कोणाला एंट्री मिळणार, सलमान खानसोबत कोण पंगा घेणार, याची चर्चा सुरू असतानाच एक नाव समोर आलंय. डंके की चोटपर म्हणणाऱ्या अॅड. गुणरत्न सदावर्ते यांनी बिग बॉस हिंदीच्या घराचं तिकीट मिळालंय. गुणरत्न सदावर्तेंनीही याबाबत दुजोरा दिला असून सलमान खानसोबत पंगा घेणार का, त्याला घाबरता का या प्रश्नावर लोकच मला घाबरतात असे सदावर्ते यांनी म्हटलं आहे. दुसरीकडे गुणरत्न सदावर्तेंना (gunratna sadavarte) आगामी विधानसभा निवडणुकीतही उतरवण्यात येत असल्याची चर्चा आहे. वरळी विधानसभा मतदारसंघातून त्यांच्या नावाची महायुतीकडून चर्चा आहे.
एसटी कामगारांच्या संपामुळे राज्यात प्रसिद्ध झालेल्या आणि कामगारांची स्वतंत्र संघटना सुरू करुन कामगार नेता बनलेल्या गुणरत्न सदावर्तेंची आता बिग बॉस हिंदीमध्ये एंट्री होत आहे. हिंदी बिग बॉसच्या यंदाच्या सिझनमध्ये अॅड. गुणरत्न सदावर्ते यांनी एंट्री होणार आहे. बिग बॉस हिंदीचे यंदाचा 18 वा सिझन असणार आहेत, त्यामध्ये सदावर्ते यांचाही सहभाग असणार आहे. सलमान खान या शोचे होस्टींग करत असून सलमान खानचं दडपण वाटतं का, या प्रश्नावरही सदावर्तेंनी त्यांच्या स्टाईलने उत्तर दिलंय.
''हमारा नाम ही कॉफी है, हम गुण रतन है, एक गुणरत्न, लाख गुणरत्न आहे. लोकंच मला घाबरतात, मी डंके की चोटवर बोलत असतो. लोकच मला घाबरतात, जोपर्यंत नेचर सांगेल, तोपर्यंत मी बिग बॉसच्या घरात राहिन, असेही सदावर्तेंनी म्हटलं. तर, जयश्री पाटील सदावर्ते यांनीही आनंद व्यक्त केला आहे. तसेच, सदावर्ते हे कायम वरती असतात, ऑलवेज विनर असलेला हा माणूस आहे. बिग बॉसच्या घरात जाताना मी त्यांना चष्मे देणार आहे,'' असेही त्यांनी सांगितले.
![Uddhav Thackeray on Suraj Chavan : सूरज चव्हाण निष्ठावान...सगळेच लोक बिकाऊ गद्दार होऊ शकत नाही](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2025/02/04/15ae83f1132b0dbaef7d30b5be21f17c173868237728290_original.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=470)
![BMC Budget 2025 : मुंबई महापालिकेचे 74 हजार कोटींचं बजेट सादर, भांडवली उत्पन्न वाढलं](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2025/02/04/38fa284c032c1c71ff9243e9fef136c3173868170582090_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=100)
![Suraj Chavan Bail : कथित खिचडी घोटाळ्याप्रकरणी सूरज चव्हाणांची जामिनावर सुटकाच मातोश्रीवर दाखल](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2025/02/04/7028fc352972d9db641d749b3122d7d1173867727623190_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=100)
![Suraj Chavan - Aaditya Thackeray :वर्षभराने सूरज चव्हाण जेलबाहेर..आदित्य ठाकरेंना मारली कडकडून मिठी](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2025/02/04/4aba3f9617c7a10899e158ab8cdc7e63173867574664790_original.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=100)
![Mumbai Municipal Corporation Budget : मुंबई महानगरपालिकेचा अर्थसंकल्प मंगळवारी सादर होणार](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2025/02/02/704467f1f02258e8a94d2abb51c1b68d1738466034226718_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=100)
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)