Suraj Chavan Bail : कथित खिचडी घोटाळ्याप्रकरणी सूरज चव्हाणांची जामिनावर सुटकाच मातोश्रीवर दाखल
शिवसेनेतील फुटीनंतर ठाकरेंसोबत एकनिष्ठ राहिलेले आणि कथित खिचडी घोटाळ्यात कोठडीत असलेले युवासेनेचे नेते सूरज चव्हाण यांना मोठा आज मोठा दिलासा मिळाला आहे.
मुंबई हायकोर्टाने सूरज चव्हाण यांना जामीन मंजूर केला, 1 लाखाच्या रोख मुचलक्यावर त्यांना जामीन मंजूर करण्यात आला आहे. 17 जानेवारी 2024 पासून सूरज चव्हाण यांना अटक करण्यात आली होती. अखेर आज त्यांची जामीनावर सुटका झाली.
आदित्य ठाकरे यांनी सोशल मिडियावर पोस्ट करत सूरज चव्हाण यांची तुलना लढणाऱ्या वाघाशी करत एकनाथ शिंदेंच्या पक्षाला डिवचल्याचं पाहायला मिळालं. एक प्रामाणिक माणूस, आमचा लढणारा वाघ आणि भाऊ... सूरज! अशी पोस्ट त्यांनी लिहली आहे
हायकोर्टातून जामीन मिळाल्यानंतर सूरज चव्हाण आज सायंकाळी 5 वाजता तुरुंगातून बाहेर आले. तुरुंगातून बाहेर येताच त्यांनी शिवसेना नेते आणि आमदार आदित्य ठाकरे यांची भेट घेतली.
कारमधून उतरताच सूरच चव्हाण यांनी आदित्य ठाकरेंना कडकडून मिठी मारली. यावेळी आदित्य ठाकरे यांनीही सूरज चव्हाण यांच्या सुटकेचा आनंद व्यक्त केल्याचं दिसून आलं.
आदित्य ठाकरेंकडून कलिना गेटवर सूरज चव्हाण यांची वाट पाहिली जात होती, तेव्हा कारमधून उतरताच सूरज चव्हाण यांनी आदित्य यांना कडकडून मिठी मारली.
आदित्य ठाकरेंसोबत तिथे थोडी चर्चा झाल्यानंतर आदित्य ठाकरेंच्या कारमधून दोघेही मातोश्रीवर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंच्या भेटीसाठी रवाना झाल्याचं दिसून आलं.























