Pune Crime News: दहशत पसरवण्यासाठी 50 वाहनांची तोडफोड; पोलिसांनी आरोपींना घडवली चांगलीच अद्दल, त्याच भागात नेलं अन्...
Pune Crime News: पुण्यातील बिबवेवाडी भागातील अपर इंदिरानगर, दुर्गामाता गार्डन, आई माता मंदिर, अप्पर डेपो, सोळा एकर, सुवर्ण मित्र मंडळ, राजीव गांधी नगर, तय्यबा मस्जिद मेन रोड परिसरातील अनेक चारचाकी, दुचाकी वाहनांची तोडफोड करण्यात आली आहे.

पुणे: पुणे शहर परिसरामध्ये पुन्हा एकदा हातात धारदार शस्त्र घेऊन दहशत माजवल्याचा आणि गाड्यांची तोडफोड केल्याची घटना समोर (Pune Crime News) आली आहे. पुण्यातील बिबवेवाडी भागातील अपर इंदिरानगर, दुर्गामाता गार्डन, आई माता मंदिर, अप्पर डेपो, सोळा एकर, सुवर्ण मित्र मंडळ, राजीव गांधी नगर, तय्यबा मस्जिद मेन रोड परिसरातील अनेक चारचाकी, दुचाकी वाहनांची तोडफोड करण्यात आली आहे. या घटनेमुळे परिसरात दहशतीचं (Pune Crime News) वातावरण निर्माण झालं होतं, पोलिसांनी या प्रकरणी तिघांना ताब्यात (Pune Crime News) घेतलं आहे. तर पोलिसांनी त्यांची भीती कमी करण्यासाठी या आरोपींना त्या परिसरात नेऊन त्यांची वरात काढली आहे.
बिबवेवाडीतील अप्पर इंदिरानगर परिसरातील दुर्गा माता मंदिर परिसरात मध्यरात्री एका टोळक्याने दांडक्याच्या सहाय्याने रस्त्याच्या कडेला लावलेली दुचाकी, टेम्पो आणि रिक्षांची तोडफोड केली. टोळक्याने शिवीगाळ करत दहशत माजवली. वाहन तोडफोडीचा आवाज ऐकल्यानंतर परिसरातील नागरिकांनी आरडाओरडा केला, त्यामुळे टोळके तेथून पसार झाले. घटनेची माहिती मिळताच बिबवेवाडी पोलिसांनी त्वरित घटनास्थळी धाव घेतली. पसार झालेल्या आरोपींचा शोध सुरू असून, पोलिसांनी सांगितले की, या प्रकरणी टोळक्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू आहे.
वाहनांची तोडफोड केली तर कंबरडे मोडू, पोलिसांचा इशारा
पुण्यात बिबवेवाडी परिसरात वाहनांची तोडफोड केल्याप्रकरणी पोलिसांनी तीन तरुणांना अटक केली आहे. वेल्हे तालुक्यातील पाबे गावातून या तिघांना अटक (Pune Crime News) करण्यात आली. कुठले ही कारण नसताना भागात दहशत निर्माण व्हावी या उद्देशाने या तिघांनी मोठ्या प्रमाणावर गाड्यांची धारधार शस्त्राने तोडफोड केली, असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. यातील एका तरुणावर याआधी एक गुन्हा दाखल असून एक जण अल्पवयीन असल्याचे तपासातून निष्पन्न झाले आहे. या परिसरात इथून पुढे असे कृत्य करणाऱ्यांचे कंबरडे मोडू असा इशारा सुद्धा यावेळी पोलिसांनी आता दिला आहे.
त्याबरोबर ज्या ठिकाणी या तीन आरोपींनी कुठलाही कारण नसताना जवळपास 50 हून अधिक गाड्या फोडल्या त्याच ठिकाणी पोलिसांनी तात्काळ या आरोपींना घेऊन तिथेच त्यांची वरात काढली. पुण्यातील बिबेवाडी परिसरातील अप्पर या ठिकाणी जवळजवळ 50 वाहनांची तोडफोड या आरोपींनी केली आहे. परिसरात लोकांमध्ये भीतीचं वातावरण होतं, ते कमी व्हावं यासाठी पोलिसांनी त्यांची परिसरात धिंड काढली आहे. पुण्यातील बिबवेवाडी परिसरात ज्या मुलांनी वाहनांची तोडफोड केली आहे ते दृश्य सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाले आहेत.























