Gautami Patil : 100 पोलिस, 7 अधिकारी आणि इतर कर्मचारी, गौतमीच्या कार्यक्रमात सुरक्षेवर 5 लाख खर्च
गौतमी पाटील... नुसतं नाव ऐकलं तरी, अनेकाच्या तोंडी एकच वाक्य येतं, ते म्हणजे सबसे कातील गौतमी पाटील... आता गौतमी येणार म्हटल्यावर गावभर गवगवा तर होणारच... भलं मोठं मैदान, पोलिसांची परवानगी, झगमगाटी लायटिंग आणि काय काय... मग गौतमी स्टेजवर आली आणि नृत्याचा ठेका धरला की, स्टेजवर धुरळा आणि प्रेक्षकांमध्ये पोरांचा नुसता राडा... गौतमीच्या कार्यक्रमात गेल्या काही दिवसांत असा धुडगूस अनेकदा झालाय. त्यामुळे हल्ली गौतमीच्या दिमतीला बाऊन्सरही असतात. पण एका पठ्ठ्यानं असा काही खर्च केलाय, की बोलायचं काम नाय. सांगोल्यामध्ये रासपचे नेते आबा मोठे यांच्या वाढदिवशी गौतमी पाटीलच्या कार्यक्रमाचंं आयोजन कऱण्यात आलं होतं.. सेलिब्रेशनला वादाचं गालबोट नको म्हणून आयोजकांनी पैसे देऊन अतिरिक्त पोलीस सुरक्षा तैनात केली होती...यासाठी आयोजकांनी अतीरिक्त सव्वा पाच लाख रुपये मोजलेत.. अर्थात, गौतमीच्या कार्यक्रमासाठी पेड बंदोबस्त बंधनकारक नाही पण वाद नको म्हणून आयोजकांनी पाण्यासारखा पैसा ओतलाय.. त्यामुळे, गाणं आहे गौतमीचं आणि होऊ दे खर्च... अशी चर्चा आता रंगलीय.