BMC Election: तब्बल 38 वर्षांनंतर मुंबई महापालिकेवर प्रशासक, राज्य मंत्रीमंडळाचा निर्णय
मुंबई : मुंबई महापालिकेचा कारभार नगरसेवक व प्रशासनाच्या माध्यमातून चालवण्यात येतो. मात्र मुंबई महापालिकेच्या निवडणुका लांबणीवर पडण्याची शक्यता असून 7 मार्चला मुंबई महापालिकेची मुदत संपुष्टात येत असल्याने मुंबई महापालिकेवर प्रशासक नियुक्तीला बुधवारी राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत मान्यता देण्यात आली आली आहे.
यापूर्वी महापालिकेची मुदत कधी संपली होती. यापूर्वी 1984 मध्ये मुदत संपुष्टात आली होती. 1 एप्रिल 84 ते 25 एप्रिल 85 या कालावधीत मुंबई महापालिकेवर प्रशासक नेमण्यात आला होता. त्यामुळे, तब्बल 38 वर्षांनंतर मुंबई महापालिकेवर प्रशासक नेमला जात आहे. तर 1990 मध्ये महिला आरक्षणाचा प्रश्न निर्माण झाल्याने 1990 ते दोन वर्षांपासून मुदतवाढ देण्यात आली होती.





















