Young Leader File Nomination : युवा नेते युगेंद्र पवार-अमित ठाकरे उमेदवारी अर्ज दाखल करणार
Young Leader File Nomination : युवा नेते युगेंद्र पवार-अमित ठाकरे उमेदवारी अर्ज दाखल करणार
मुलाच्या प्रचारासाठी वडील प्रचाराच्या मैदानात उतरलेत. युगेंद्र पवार यांची बारामती मधून उमेदवारी जाहीर झाल्यानंतर उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे सख्खे बंधू श्रीनिवास पवार यांनी आज बारामतीच्या काशीविश्वेश्वर मंदिरामधून नारळ वाढवून प्रचाराला सुरुवात केली आहे. बारामती विधानसभे करिता उद्या सोमवार रोजी यूगेंद्रपवार राष्ट्रवादीचे सर्वे सरवा शरद पवार यांच्या उपस्थितीमध्ये अर्ज दाखल करणार आहेत युगेंद्र पवारांचा निवडणूक अर्ज दाखल करण्यासाठी निघालेले सुप्रिया सुळे आणि युगेंद्र पवार अचानक पवार कुटुंबाच्या बारामतीतील आमराई भागातील जुन्या घरी पोहचले. शरद पवारांचे वडील गोविंदराव पवार यांनी हे घर बारामतीत नोकरी करताना घेतलं होतं , त्यामुळे आताच्या पवार कुटुंबातील अनेकांचं बालपण याठिकाणी गेलय. निवडणूकीचा अर्ज भरण्यासाठी इथं आलेल्या सुप्रिया सुळे आणि युगेंद्र पवार हे दोघेही इथं आल्यावर भावनिक झाल्याच पहायला मिळालं. इथ येऊन आपण आपल्या आजी आजोबांचा आशिर्वाद घेतो आहोत असं सुप्रिया सुळे यांनी म्हटलंय.