Maharashtra Bogus Drugs Scam : बनावट औषधांचं विषारी रॅकेट; रुग्णांच्या जीवाशी खेळ Special Report
राज्यात बोगस औषध पुरवठा करून सर्वसामान्य रुग्णांच्या जिवाशी खेळ सुरु आहे. या प्रकरणात रोज नवनवीन माहिती समोर येतेय. अशात बीडनंतर आता नांदेड जिल्ह्यातदेखील बनावट औषध आढळून आल्यामुळं खळबळ उडालीय. धक्कादायक बाबा म्हणजे ज्या कंपनीने यापूर्वी बनावट औषध शासकीय रुग्णालयाला पुरवली होती, त्याच कंपनीला पुन्हा पुरवठा करण्याची मुभा देण्यात आलीय.
राज्यात रुग्णांच्या आरोग्याशी कसा खेळ सुरु आहे, याची धक्कादायक उदाहरणं सध्या समोर येतायत. आधी नागपूर, नंतर बीड आणि मग नांदेडच्या शासकीय रुग्णालयातही बनावट औषधांचा पुरवठा केला जात असल्याचं समोर आल्यामुळं एकच खळबळ उडालीय. नांदेडच्या जिल्हा रुग्णालयाला पुरवठा करण्यात आलेलं Meclav 625 हे औषध बनावट असल्याचं अन्न आणि औषध प्रशासनाच्या अहवालातून समोर आलंय. या औषधाचा पुरवठा लातूरच्या जया एंटरप्रायजेसकडून करण्यात आला होता.
नांदेडच्या जिल्हा रुग्णालयात गेल्या वर्षी लातूरच्या जया इंटरप्राईजेसकडून औषध पुरवठा करण्यात आला.
यातील औषध बनावट असल्याचे समोर आलं
याप्रकरणी नांदेडच्या वजीराबाद पोलीस ठाण्यात १९ ऑगस्टला गुन्हा दाखल झाला.
पुढे अन्न औषध विभागाने नोटीस देऊन २५ सप्टेंबर २०२४ रोजी जया इंटरप्राईजेसचा विक्री परवाना रद्द केला.
९ ऑक्टोबरला शासनानं आदेश काढून परवाना रद्द करण्याच्या आदेशाला स्थगिती दिली.
त्यामुळे पुन्हा जया इंटरप्राईजेसकडून औषधांचा पुरवठा सुरू झाला.