Priyanka Gandhi Speech : मोदींवर फटकेबाजी... प्रियांका गांधींचं लोकसभेत पहिलं भाषण Special Report
संसदेतला गदारोळ मात्र १४ दिवसांनंतरही कायम आहे. राज्यसभेत आज सभापती जगदीप धनखड आणि काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांच्यात ठिणगी उडाली...या गदारोळातच संसदेत पहिल्यांदाच एन्ट्री केलल्या प्रियांका गांधींचं लोकसभेतलं पहिलंवहिलं भाषण चर्चेत आहे...संविधान, मणिपूर, राजकीय फोडाफोडी, ईव्हीएम या मुद्द्यांवरून प्रियांकांनी मोदी सरकारला धारेवर धरलं...पाहुया याबद्दलचा हा स्पेशल रिपोर्ट...
संसदेच्या हिवाळी अधिवेशनाचा आजचा दिवस अतिशय गरमागरमीचा ठरला.
राज्यसभेत अविश्वास प्रस्तावावरून जोरदार गदारोळ झाला.. उपराष्ट्रपती आणि राज्यसभेचे सभापती जगदीप धनखड आणि विरोधी पक्ष नेते मल्लिकार्जुन खरगे यांच्यात खडाजंगी पाहायला मिळाली..
उपराष्ट्रपती म्हणाले, मी शेतकऱ्याचा मुलगा आहे तर खरगे म्हणाले मी कामगाराचा मुलगा आहे..
आज झोपण्याआधी चिंतन, मनन करा, असा सल्ला सुद्धा उपराष्ट्रपती धनखड यांनी खरगेंना दिला.
इकडे राज्यसभेत उपराष्ट्रपती धनखड आणि विरोधी पक्षाच्या नेत्यांमध्ये शाब्दिक चकमक सुरु होती, तिकडे लोकसभेतही घडामोडींना वेग आला होता. काँग्रेसच्या खासदार प्रियांका गांधी- वाड्रा यांनी लोकसभेतलं आपलं पहिलं वहिलं भाषण केलं. त्या नुकत्याच केरळच्या वायनाड मतदारसंघातून पहिल्यांदाच लोकसभेत पोहचल्या आहेत. संविधान, आरक्षण आणि जातगणना या मुद्द्यांवर त्यांनी जास्त भर दिला. पंतप्रधान मोदींना भारताचं संविधान नाही तर संघाचं विधान माहितीय अशी टीका सुद्धा प्रियांका गांधी-वाड्रा यांनी केली.