एक्स्प्लोर

संजय राठोड यांना मंत्रिपद, चित्रा वाघ यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाल्या, लाडक्या बहिणींनाही संधी

महायुती सरकारमध्ये मंत्री राहिलेल्या संजय राठोड यांच्यावर आमदार चित्रा वाघ यांनी गंभीर आरोप केले होते.

मुंबई : राज्य मंत्रिमंडळ विस्ताराची तारीख ठरली असून 15 डिसेंबर रविवारी दुपारी 3 वाजता नागपुरात यंदा मंत्र्यांचा शपथविधी होणार असल्याचे समजते. त्याच पार्श्वभूमीवर महायुतीमधील तिन्ही पक्षाच्या आमदारांची उत्कंठा वाढली असून मंत्रिपदाच्या यादीत कोणाचं नाव येईल, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. तर, महायुती सरकारमध्ये मंत्री राहिलेल्या मंत्र्यांना पुन्हा संधी मिळणार असून आमदार संजय राठोड (Sanjay Rathod) यांनाही संधी दिली जाईल, अशी चर्चा आहे. विदर्भातील शिवसेनेचा कोठा आणि बंजारा समाजाला प्रतिनिधित्व देण्यासाठी राठोड यांना महायुती सरकारमध्ये मंत्रिपद दिले जाऊ शकते. त्याच, अनुषंगाने आमदार चित्रा वाघ (Chitra wagh) यांना प्रश्न विचारला असता त्यांनी प्रतिक्रिया दिली.  तसेच, लाडक्या बहिणींना देखील मंत्रिमंडळात स्थान असेल, असे वाघ यांनी म्हटले.

महायुती सरकारमध्ये मंत्री राहिलेल्या संजय राठोड यांच्यावर आमदार चित्रा वाघ यांनी गंभीर आरोप केले होते. पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणात वाघ यांनी पोलीस स्टेशनला जाऊन पीडित कुटुंबीयांच्या न्यायाची मागणी केली होती. तसेच, संजय राठोड यांचा मंत्रिपदाचा राजीनामा घेण्यासही महाविकास आघाडी सरकारला भाग पाडले होते. मात्र, शिवसेनेतील बंडानंतर संजय राठोड हे एकनाथ शिंदे यांच्यासमवेत पुन्हा भाजपसोबत सत्तेत सहभागी झाले. त्यानंतर, चित्रा वाघ यांची भूमिका मवाळ झाली. तसेच, राठोड यांच्याविरुद्ध त्यांनी घेतलेली भूमिकाही बदलल्याचा आरोप विरोधकांकडून करण्यात आला. आता महायुती सरकारच्या नव्या मंत्रिमंडळातही संजय राठोड यांना स्थान मिळेल, यासंदर्भात चित्रा वाघ यांना प्रश्न विचारण्यात आला होता. त्यावरही त्यांनी सावध प्रतिक्रिया दिल्याचं पाहायला मिळालं.

संजय राठोड यांना तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी क्लीनचीट दिलेली असं एकनाथ शिंदे यांनी सांगितलं होतं. त्यामुळे,  त्यांना गत मंत्रिमंडळात मंत्रिपद देण्यात आलं. माझी लढाई अजून संपलेली नाही, यावेळेस काय होते हे पाहू, असे म्हणत संजय राठोड यांच्या मंत्रिपदावर आमदार चित्रा वाघ यांनी आपली भूमिका मांडली. 

उद्धव ठाकरेंच्या टीकेवर पलटवार

उद्धव ठाकरे यांनी आम्हाला हिंदुत्व शिकवू नये, काँग्रेसच्या मांडीला ते जाऊन बसले आहेत, ज्यांना दादरमधील ते मंदिर रामाचं आहे की हनुमानाचं हेही माहिती नाही, त्यांनी आम्हाला शिकवू नये, असे म्हणत चित्रा वाघ यांनी उद्धव ठाकरेंनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर केलेल्या टीकेवरुन पटलवार केला आहे. 

मंत्रिमंडळात लाडकी बहीण दिसेल

लाडकी बहीण योजनेचे निकष बदलणार हे मुख्यमंत्र्यांनी सांगितलं नाही. ही गरळ संजय राऊत यांनी ओकली आहे, त्यांना ही योजना नको आहे, असे म्हणत लाडकी बहीण योजनेवरही चित्रा वाघ यांनी स्पष्टीकरण दिलं. तर, मंत्रिमंडळात लाडक्या बहिणी पाहायला मिळतील, असा दावाही त्यांनी केला. तसेच, विरोधकांकडून ईव्हीएमवर संशय व्यक्त केला जात असल्याबाबत बोलताना ते म्हणाले की, त्यांचा पराभव झाला आहे. त्यामुळे, ते पराभवच खापर हे ईव्हीएमवरती फोडत आहेत, अशी प्रतिक्रिया वाघ यांनी दिली. 

सुनंदा पवार राजकीय व्यक्ती नाहीत - वाघ

दरम्यान, दोन्ही राष्ट्रवादीने एकत्र यायला पाहिजे, असं वक्तव्य आमदार रोहित पवार यांच्या मातोश्री सुनंदा पवार यांनी केलं होतं. त्यावरही चित्रा वाघ यांनी प्रतिक्रिया दिली. सुनंदा पवार या काही राजकीय व्यक्ती नाहीत, त्या सामाजिक काम करत असतात. त्या कोणत्या उद्देशाने बोलल्या हे माहिती नाही, असे वाघ यांनी म्हटलं. 

हेही वाचा

बेल रिजेक्टेड... सातारा लाच प्रकरणातील न्यायाधीशांचा जामीन कोर्टाने फेटाळला

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी 'देवाभाऊ' म्हणतात मुख्यमंत्री फडणवीस गोड हसले; शिंदेही खुलले, पाहा फोटो
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी 'देवाभाऊ' म्हणतात मुख्यमंत्री फडणवीस गोड हसले; शिंदेही खुलले, पाहा फोटो
Ladki Bahin Yojna Court Case : मोठी बातमी! लाडकी बहीण योजनेबाबत फडणवीस सरकारची कोर्टात महत्त्वाची माहिती; जनहित याचिकेवर सुनावणी
मोठी बातमी! लाडकी बहीण योजनेबाबत फडणवीस सरकारची कोर्टात महत्त्वाची माहिती; जनहित याचिकेवर सुनावणी
Manoj Jarange : अजित दादा धनंजय मुंडे टोळ्या चालवणारा, उघडा पडला; उपमुख्यमंत्र्यांचं थेट नाव घेत मनोज जरांगेंचा इशारा
अजित दादा धनंजय मुंडे टोळ्या चालवणारा, उघडा पडला; उपमुख्यमंत्र्यांचं थेट नाव घेत मनोज जरांगेंचा इशारा
PM Narendra Modi: पंतप्रधान मोदींचं महायुतीच्या आमदारांना मार्गदर्शन, राज ठाकरेंचा खास उल्लेख; डब्बा पार्टीचा सल्ला
पंतप्रधान मोदींचं महायुतीच्या आमदारांना मार्गदर्शन, राज ठाकरेंचा खास उल्लेख; डब्बा पार्टीचा सल्ला
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

PM Modi Speech ISKON Temple Navi Mumbai भारताला समजून घेण्यासाठी अध्यात्म समजून घेणं महत्वाचं : मोदीPankaja Munde on Beed : बीडमधील तणाव कसा कमी होणार? पंकजा मुंडे म्हणाल्या..Walmik Karad Court Case : महाराष्ट्राच्या गृहमंत्र्याला विनंती आहे! दवेंद्र फडणवीस बीड जिल्ह्यात याWalmik Karad Court : वाल्मिक कराडला कोर्टातून बाहेर आणताच काय घडलं? संपूर्ण व्हिडीओ...

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी 'देवाभाऊ' म्हणतात मुख्यमंत्री फडणवीस गोड हसले; शिंदेही खुलले, पाहा फोटो
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी 'देवाभाऊ' म्हणतात मुख्यमंत्री फडणवीस गोड हसले; शिंदेही खुलले, पाहा फोटो
Ladki Bahin Yojna Court Case : मोठी बातमी! लाडकी बहीण योजनेबाबत फडणवीस सरकारची कोर्टात महत्त्वाची माहिती; जनहित याचिकेवर सुनावणी
मोठी बातमी! लाडकी बहीण योजनेबाबत फडणवीस सरकारची कोर्टात महत्त्वाची माहिती; जनहित याचिकेवर सुनावणी
Manoj Jarange : अजित दादा धनंजय मुंडे टोळ्या चालवणारा, उघडा पडला; उपमुख्यमंत्र्यांचं थेट नाव घेत मनोज जरांगेंचा इशारा
अजित दादा धनंजय मुंडे टोळ्या चालवणारा, उघडा पडला; उपमुख्यमंत्र्यांचं थेट नाव घेत मनोज जरांगेंचा इशारा
PM Narendra Modi: पंतप्रधान मोदींचं महायुतीच्या आमदारांना मार्गदर्शन, राज ठाकरेंचा खास उल्लेख; डब्बा पार्टीचा सल्ला
पंतप्रधान मोदींचं महायुतीच्या आमदारांना मार्गदर्शन, राज ठाकरेंचा खास उल्लेख; डब्बा पार्टीचा सल्ला
मोठी बातमी ! कोर्टात SIT चे 7 खळबळजनक दावे; खंडणीला अडथळा ठरल्याने संतोष देशमुखांचा खून, वाल्मिक कराड गोत्यात?
मोठी बातमी ! कोर्टात SIT चे 7 खळबळजनक दावे; खंडणीला अडथळा ठरल्याने संतोष देशमुखांचा खून, वाल्मिक कराड गोत्यात?
Walmik Karad : गोपीनाथ मुंडेंनी 1999 मध्ये आणला मकोका, परळीच्या वाल्मिक कराडलाच बसला ' दे धक्का'
गोपीनाथ मुंडेंनी 1999 मध्ये आणला मकोका, परळीच्या वाल्मिक कराडलाच बसला ' दे धक्का'
वाल्मिक कराडला 7 दिवसांची कोठडी, बीड कोर्टाबाहेर राडा; निदर्शने, घोषणाबाजी, गृहमंत्री जिल्ह्यात या
वाल्मिक कराडला 7 दिवसांची कोठडी, बीड कोर्टाबाहेर राडा; निदर्शने, घोषणाबाजी, गृहमंत्री जिल्ह्यात या
इकडं भारतात असलेल्या माजी पीएम शेख हसीनांवर गुन्ह्यांचा पाऊस, पासपोर्टही रद्द अन् तिकडं खालिदा जियांची शिक्षा माफ झाली!
इकडं भारतात असलेल्या माजी पीएम शेख हसीनांवर गुन्ह्यांचा पाऊस, पासपोर्टही रद्द अन् तिकडं खालिदा जियांची शिक्षा माफ झाली
Embed widget